Skip to main content

उदासगाणी

लेखक समयांत यांनी बुधवार, 29/11/2017 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
चार महिने या खोलीत मी राहतो आहे, तितक्या रात्री मी इथे जागवल्या आहेत. आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे, तरी पण, हा ‘पण’ जमा केलेल्या इथल्या आठवणींना माझ्या मनात उभा करतो आहे. मला माझं गवसण्याच्या अडनिड्या प्रयत्नात ही खोली आता एक भाग झाली आहे. कित्येक गाणी इथे मी ऐकली असतील, ठराविक गाण्यांच्या रिंगणात रात्री गेल्या खऱ्या, त्यातून मला उदास गाण्यांचेच वेड लागले आणि मग त्या जोडीला पैसे कमवायला काही कामे मिळवता येतात का, त्यासाठी कित्येक गोष्टींना नेटवर जोखून पाहिले असेल. सप्टेंबरच्या परीक्षेचा पास निकाल इथेच पाहिला.

मनोविकारशास्त्र(psychiatry)--आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक मिथक!!

लेखक सिंथेटिक जिनियस यांनी बुधवार, 29/11/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणतः २००६ साली मी कॉलेजमधून पास आऊट झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न करु लागलो.इंटरव्ह्युसाठी लांब ठीकाणी जायचे ,तिथे जाण्यासाठी तयारी करायची ,इंटरव्युला सामोरे जायचे असा प्रकार सुरु होता.इंटरव्युला जाताना सुर्वातीला मजा वाटायची नंतर त्याचे दडपण यायला सुरवात झाली.

न्याय झाला, पण...!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी बुधवार, 29/11/2017 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय झाला, पण..! मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली.

आप्पा

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 29/11/2017 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
हुश्श करीत सगळ्यांनी एकदाची आप्पांची तिरडी खाली ठेवली. बबन्या लाकडं रचायला लागला. गावात धड रास्ता नव्हता. एवढ्या लांब कुणाकुणाच्या परड्यातून, कुणाच्या गडग्यावरून तिरडीसकट चढउतार केल्याने सगळेच वैतागले होते. खरंतर बाळ्याच्या वावरातून आणलं असतं तर एवढा लांबचा पल्ला पडला नसता. पण सांगणार कोण ? बापूची जीभ चांगलीच वळवळत होती. "तरी बरा, आप्पा वजनानं हलको व्हतो. भाऊ तू आसतस तर आमचा काय खरा नव्हता." अवाढव्य आकाराच्या भाऊकडे बघत बापू बोलला आणि सगळे चेकाळले. मग कुणाकुणाच्या मयताच्या गजाली चालू झाल्या. बबन्या मात्र गपगुमान लाकडं रचत होता.

शेजाऱ्याचा डामाडुमा - हायो धुआ सलाम - मालदीव भाग २

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 29/11/2017 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग येथे वाचता येईल : http://www.misalpav.com/node/41427 भारताच्या दक्षिण-पश्चिम दिशेला श्रीलंकेजवळ ११९० मोजलेल्या आणि बाकी काही उथळ आणि आकाराने फारच लहान असल्यामुळे मोजता न येऊ शकणाऱ्या अश्या काही प्रवाळ (कोरल) बेटांचा समूह म्हणजे मालदीव हा आपला शेजारी देश. अलौकिक निसर्गसौंदर्याचे दान भरभरून मिळालेला.

डेस्टिनेशन - देवभूमी अर्थात हिमाचल प्रदेश मु. पो . सांगला , किन्नर कॅंप्स भाग २

लेखक मालविका यांनी मंगळवार, 28/11/2017 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
चंदिगढ ला भीमसिंग ने आम्हाला वेलकम केले . तिथून पुढे सुरु झाला आमचा सांगला पर्यंतचा प्रवास गाडीने . साधारणपणे १० तासाचा प्रवास आहे . पण आम्ही पूर्ण प्रवास एका दिवशी न करता मध्ये एक रात्र नारकंदाला विश्रांती घेऊन केला . चंदिगढ ते सांगला हे अंतर साधारण ३३५ किमी आहे . दिसायला हे अंतर कमी दिसलं तरी जास्तीत जास्त प्रवास हा अवघड वळणे आणि अरुंद आणि कठीण अशा घाटातून असल्याने प्रवासाला वेळ लागतो . आम्ही गाडीत बसलो आणि आमच्या या लांबलचक प्रवासाला सुरवात झाली . भीमसिंगअतिशय व्यवस्थितपणे , कोणत्याही नियमांचे उल्लंघन ना करता गाडी चालवत होता . एकीकडे आम्हीच त्याच्याशी गप्पा सुरु केल्या .

माचू पिक्चू - भाग ५

लेखक उदय यांनी मंगळवार, 28/11/2017 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १...भाग २...भाग ३...भाग ४...भाग ५...भाग ६ दिवस ४ आज आम्ही पहाटे ३ वाजताच उठलो आणि ३:३० ला चेकपोस्टला जाऊन बसलो आणि तिथेच सकाळचा नाश्ता केला. आमच्या ग्रुपचाच नंबर पहिला होता. चेकपोस्ट ५:३० उघडतात आणि तेव्हाच इंका ट्रेलचा शेवटचा टप्पा सुरू होतो.

एक कागद

लेखक गबाळ्या यांनी सोमवार, 27/11/2017 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
एक कागद कस्पटासम, रद्दीमध्ये फरपटला जसा जीव हा आप्तांमधुनी, गर्दीमध्ये भरकटला एक कागद कस्पटासम ||धृ ।। 
 एक बालक हाती घेई, मायेने मग आकार देई, बनता त्याचे जहाज हवाई, उंच तया उडविला ।। १ ।। 
 उंच विहरता मन स्वच्छंदी, हीन भासली भुतल रद्दी, वाटे मनासी खाशी शक्ती, दैवचि अर्पि मजला ।। २ ।। 
 वाटे त्यासी उंच उडावे वादळ वारे यांसी भिडावे कांबीटाचा कणा देउनी, पतंग सुंदर केला ।। ३ ।। 
 इतकी उंची तये गाठली साद मनीची नभी आटली ढील देण्या जाता बालक, मांजा संपून गेला ।। ४ ।। 
 गगन ठेंगणे खुणवी तारे मांजा परी तो रोखुनी धरे दृढनिश्चय तो मनी करुनी, तोडी त्या नाळेला ।। ५ ।। 
 उंच उंच तो जातच राही स्वानंदी मग