Skip to main content

प्रातःस्मरण

लेखक शरद यांनी शुक्रवार, 08/12/2017 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रात:स्मरणम् पूर्वी सकाळी उठल्यावर प्रथम पुढील श्लोक म्हणावयाची सवय होती समुद्रवसने देवी पर्वत:स्तनमंडळे ! विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पाद: स्पर्शं क्षमस्व मे !! आता सकाळी उठल्यावर सोडाच पण दिवसाभरात सुद्धा भूमीला पादस्पर्श होत नाही.तेव्हा हा श्लोक संपला. सकाळी उठोनी देवाला भजावे ! गुरूला नमावे प्रेमभावे !! हे काही प्रात:स्मरण नव्हे व ही कविता आम्हाला नव्हती. लक्षात कशी राहिली देव जाणे. तेव्हा तीही नाही. पुढे संस्कृत वाचावयास सुरवात्र केली आणि विष्णु, श्रीराम, शिव, सूर्य इत्या॒दि अनेक देवांची प्रात:स्मरणे वाचनात आली.

|| गुरु महिमा ||

लेखक गबाळ्या यांनी शुक्रवार, 08/12/2017 06:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज असे हा वार गुरु महिना चालू डिसेम्बरू सप्त तारीख कॅलेंडरू लेखणी माझी झाली सुरु कित्ती विशेष हा असे दिनु सहा वर्षांतूनी आगमनु पहा अचंबूनी जाई मनू कवीस पुरेसे हे कारणु टाकुनी मागे त्या 'बुधि'या धाव धावतो हा जरीया धाव संपवी तो 'शुक्रि'या शब्द वाकवी मी लीलया एकेक दिन हा महामेरू वाटे कविता त्याची करू बसलो घेऊन मी बोरू हवा कागदा स्पॉन्सरु

शेजाऱ्याचा डामाडुमा - मास..अहारू... गारुनु.... - मालदीव भाग ३

लेखक अनिंद्य यांनी गुरुवार, 07/12/2017 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
मालदीव मालिकेतील आधीचे भाग येथे वाचता येतील :- http://www.misalpav.com/node/41427 http://www.misalpav.com/node/41552  जगाच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या कालखंडात मानवी संस्कृती नांदतात-बहरतात आणि मग कालौघात ह्या ना त्या कारणाने नाश पावतात. ह्या सर्व संस्कृती मागे काही ना काही ठेवा सोडून जातात.

एक कविता

लेखक रामदास यांनी गुरुवार, 07/12/2017 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
अरे , उधार माग , देतो ना चार करकरीत नोटा कधी देणार परत असं न पुटपुटता ... अरे, हिशोब माग , देतो मुकाट सगळ्या सोळभोगाचा इत्थंभूत , पण उंबरठ्यावर अडकण घालून , एक गाणं दे , एक गाणं दे असा, धोशा लावणाऱ्या दिवसाला कसं माघारी पाठवायचं ??
काव्यरस

एका कथेची गोष्ट

लेखक दर्शना१ यांनी गुरुवार, 07/12/2017 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
उबदार पांघरुणाखाली पडल्या पडल्या श्रेयसीनं खिडकीतून बाहेर पाहिलं. आभाळ भरून आलेलं. अंधार पडायला सुरुवात झालेली. जरा पडू अजून म्हणता म्हणता संध्याकाळ उलटून गेलेली. घाईघाईनं उठताना खोकल्याची एक उबळ आली. तशी ती एकटीच होती घरी पण तरीही जणू काही ती खोकल्यावर भिंती कुरकुरतील म्हणून तिनं ती आतच दाबून टाकली. तिनं उठून टेबल लॅम्प लावला आणि खुर्चीवरची शाल ओढणीसारखी अंगावर घेत चहा करायला किचनकडे निघाली. पण त्याआधी टेबलवर विखुरलेल्या कागदातून ती लिहीत असलेल्या पुस्तकाचं शेवटचं पान उचलून, एक भिरभिरती नजर टाकून तिनं वाचलं. चहा करता करता तिच्या कथेतल्या पात्रांचा विचार करू लागली.

मराठी शाळांतील घटती पटसंख्या

लेखक ss_sameer यांनी बुधवार, 06/12/2017 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी शाळांतील घटती पटसंख्या हा कोण्या चर्चेचा विषय होऊ शकतो असे आम्हास बिलकुल वाटत नाही. किंबहुना त्यात चर्चा करण्यासारखे काय आहे असाच विचार आमच्या मनात येतो. तसे पाहता मराठी ही फार प्राचीन भाषा आहे. कित्येक मराठी भाषाकोविदांप्रमाणे संस्कृत पश्चात जी भाषा जन्मास आली ती मराठीच. यापेक्षा पुढे जाऊन काही (अतिरेकी) मराठी प्रेमी मराठी ही अश्मयुगीन कालखंडापासून असल्याचे पुरावे देखील सादर करू शकतील. (सध्या तर या अशाच अतिरेक्यांचे पेव फुटलेले दिसते. कालांतराने ही मंडळी मंडळांतून फुटतात किंवा यांना कोणीतरी हातापायाने फोडते ती गोष्ट वेगळी). असो.... तर मुद्दा आहे मराठी शाळांतील घटती पटसंख्या.

ते दोघे टू रॉनीज

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 06/12/2017 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तर अंशीच्या दशकातला बीबीसीवरचा कॉमेडी शो, तोही सलग सतरा वर्षे आणि करनारे फक्त दोघे, कमाल आहे ना, कमलाच आहे आणि त्या दोघांनी ही कमाल करुन दाखविली होती. १९७१ ते १९८७ या सतरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी लोकांना खळखळून हसविले. ते दोघे होते टू रॉनीज, रॉनी बार्कर आणि रॉनी कॉर्बेट. या शोचे मुख्य वैशिष्ट म्हणजे दोघांचे विरुद्ध व्यक्तीमत्व, एक उंच, बऱ्यापैकी अंगात तर दुसरा बुटका, असे व्यक्तिमत्व असल्यावर त्यावर विनोद होनारच He can't think deeper किंवा I am the same person but TVs got wider. टू रॉनीज शोच्या १२ मालिका आणि ९३ एपिसोड झाले.

(तिखले)

लेखक सूड यांनी बुधवार, 06/12/2017 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
बंद जाहला वाजून वाजून, गजराचे चुकले कठीण दिलीसे नेमून कसरत, ट्रेनरचे चुकले मध्ये उपटला कुठून जन्मदिन, पेस्ट्रीचे चुकले वामकुक्षीला विसावला त्या, खाटेचे चुकले बुडून गेला दुलईमध्ये, झोपेचे चुकले शर्ट दाटला पोटाला अन टेलरचे चुकले तडफडला पण गेला नाही, ट्रेकिंगचे चुकले रांजणापरी उदरी ढकले, माशाचे तिखले... (गजब)

पुन्हा एकदा मोढेरा सूर्यमंदिर

लेखक DAGDU यांनी बुधवार, 06/12/2017 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
अहमदाबाद ला ऑफिस च्या कामानिमित्त बऱ्याच वेळा जायचा योग येतो, मग वेळ मिळाला कि जवळपासच्या प्राचीन ठिकाणांना भेट देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो, अशीच एक भेट मोढेरा येथील प्राचीन सूर्य मंदिराची.