Skip to main content

पुनश्च टेबल माऊंटन

लेखक पिशी अबोली यांनी शनिवार, 09/12/2017 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी केप टाऊनला कामानिमित्त जाऊन आले, त्यानंतर परत लगेच जाता येईल असं वाटलं नव्हतं (झैरात-http://www.misalpav.com/node/38109). पण पुन्हा एकदा मला नेण्यापुरता प्रोजेक्टकडे फंड आहे, हे सांगत दीडेक महिन्याभरानंतरची तारीख नक्की करणारा तिथल्या प्रोफेसरचा मेल आला, आणि तयारीची गडबड सुरू झाली. मागच्या वेळेस भेटलेल्या लोकांना कळवणे, वर्षभरातल्या कामाचा आढावा घेणे या सगळ्या धामधुमीत दसरा-दिवाळी पार पडली. माझ्या नशिबाने व्हिसा वेळेत आला, पण जाण्याच्या दिवशी पर्यंत करन्सी मिळालेली नव्हती.

पुणे ते लेह (भाग ५ - जम्मू ते श्रीनगर)

लेखक अभिजीत अवलिया यांनी शनिवार, 09/12/2017 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
२९ ऑगस्ट काल रात्री ज्याने रूम दिली तो लॉजच्या काउंटरवर बसलेला मालक का मॅनेजर जो कोणी असेल तो आणि अजून एका व्यक्तीचे जोरजोरात भांडण. का संभाषण ? बहुतेक भांडणचं. भाषा... बहुतेक उर्दू सतत खालून वरच्या आणि वरून खालच्या मजल्यावर दोघांचेही धावत जाणे. त्यामुळे भयानक वाजणारा लॉजचा लाकडी जिना. आणि हा सगळा बिनडोकपणा मध्यरात्री २ ते २:३० ह्या गाढ झोपेच्या वेळेत जर कुणी करत असेल तर तुम्ही काय करू शकता?

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १८: फूड फोटोग्राफी

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/12/2017 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. काही अवधीनंतर आज याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - 'फूड फोटोग्राफी' किंवा 'खाद्यपदार्थांचे छायाचित्रण'. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या खाद्यपदार्थाचे नेत्रसुखद छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे.

होट्टल

लेखक DAGDU यांनी शनिवार, 09/12/2017 11:54 या दिवशी प्रकाशित केले.

वैद्यकीय 'मेवा'

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी शनिवार, 09/12/2017 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
वैद्यकीय 'मेवा' ! डॉक्टरांना देव मानण्याचा आपल्या समाजात प्रघात आहे.. प्रचंड विश्वास आणि वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव यामुळे हि उपाधी डॉक्टरांना मिळाली. असं म्हटलं जातं, देवानंतर जर कुणाचा नंबर लागत असेल तर तो म्हणजे डॉक्टरांचा..कारण, देव आपल्या प्राणाचं रक्षण करतो, हि जशी श्रद्धा आहे. तसाच डॉक्टर आपले प्राण वाचवू शकतो हा विश्वास समाजाचा आहे. त्याचमुळे डॉक्टरांना समाजात सन्मानाचे स्थान दिल्या जाते..त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो. मात्र अलीकडच्या काळात या पवित्र क्षेत्रातही काही अपप्रवृत्तीनी शिरकाव केला आहे.

कवि बिल्हणाची 'चौरपंचाशिका' - एक शृंगाररसपूर्ण काव्य.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शनिवार, 09/12/2017 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
११व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या 'बिल्हण' ह्या काश्मीरी कवीच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या 'चौरपंचाशिका' ह्या कमीअधिक ५० श्लोकांच्या काव्यामागची कथा अशी आहे. काव्याचा कर्ता एका राजकन्येचा शिक्षक म्हणून कार्यरत असतांना तरुण शिक्षक आणि त्याची शिष्या हे परस्परांवर अनुरक्त झाले आणि कवि गुप्ततेने रात्री आपल्या प्रियशिष्येच्या सहवासामध्ये प्रणयक्रीडा करण्यात घालवू लागला. अनेक रात्री ही गोष्ट गुप्त राहिली पण अखेरीस राजाच्या कानावर ही गोष्ट पडली. संतप्त राजाने अपराधी कवीस मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

(बघ जरा पोळीत माझ्या काय आहे….)

लेखक गबाळ्या यांनी शनिवार, 09/12/2017 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्णा - http://www.misalpav.com/node/41514 अनंत यात्री - प्रथम तुमची क्षमा मागतो. आज विडंबनाचा मूड आहे. या नादान बालकाला क्षमा करून तुमच्या अनंत यात्रेमध्ये सर्वांसोबत मलाही सामावून घ्याल अशी अपेक्षा करतो. बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. भू नकाशा लांघणारे चित्र आहे टोचण्याला चांगलेची शस्त्र आहे तप्तसूर्याने जळाले सर्वत्र आहे सक्तीच्या खाण्यात गलीत गात्र आहे कवळी शाबीत गळती नेत्र आहे शत्रूला कापेल ऐसे अस्त्र आहे अंत ना आदि असे अजस्त्र आहे प्राण लवकर घोटणारा मंत्र आहे बघ जरा पोळीत माझ्या काय आहे…. घ्या मला टोळीत तुमच्या हे ध्येय आहे ....

मृतदेह, संधीकाळ आणि सह्याद्री

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 08/12/2017 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
जगदीश्वराच्या प्रासादाचे शिखर स्पष्ट दिसत होते, कारण त्याच्यामागेच सुर्य हळुहळु मावळत होता. मावळतीच्या केसरी रंगाच्या पार्श्वभुमीच्या अलीकडे, जगदीश्वराच्या कळसाची गडद आकृती इतक्या लांबुन देखील समजत होती. पुर्वेकडुन चंद्रप्रकाश हळुहळु आकाश व्यापत होता. सुर्य आणि चंद्राच्या दरम्यानचे आकाश मात्र धुकटसे झाले होते. मध्येच एखादासा इवलासा ढगुला, कदाचित वाट चुकलेला ही असेल, आकाशात तरंगत दिसत होता. त्या ढगांच्या ही वर आकाशात घिरट्या घेणारे तीन भले मोठे गरुड कमी अधिक उंची वर एका विशिष्ट कक्षेत फिरत होते.

हिवाळी भटकंती: चंदेरी ( Chanderi )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 08/12/2017 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई - पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना उजवीकडे एक डोंगररांग दिसते, ती म्हणजे बदलापूर डोंगररांग .नाखिंड, चंदेरी, म्हैसमाळ, नवरी, बोयी, पेब , माथेरान ही शिखरे याच डोंगररांगेत येतात.