मी आणि तू (प्रणय कविता)
रेखीव भृकुटी तुझ्या ललाटी
मी चंद्रकोर सुबक नेटकी
वसतो तुझ्या मृगनयनी
मी गोड आनंदाश्रू मिलनी
रसरशीत तुज गोड ओठात
मी ऐन मोरपिशी यौवनात
रेशमी तुझ्या धुंद श्वासात
मी जन्मतो नव्याने सतत
शिंपूनी लाली तुझ्या गाली
मी विणतो तारूण्य मलमली
मन माझे तुझ्या पावली
जसा नाद नाजूक पैंजणी
गुंफूनी गजरा तव कुंतलात
मी रंगवितो बेधुंद रात
गुंतूनी तुझ्या मादक यौवनी
मी चेतवतो प्रणय अनादी
पोर्णिमेचा चन्द्र मी आणि
शुक्राची तू ग चांदणी
काव्यरस
मिसळपाव
नेहमीप्रमाणेच पहाटफुटणीला साखर झोपेतून जाग आली. परसदारातली कोकीळ दापंत्ये आणी बांग देणारा कडकनाथ अजून साखर झोपेतच होते.
विठ्ठल भक्त, मंदिरात कमळापतीची आराधना करत होते.(उगाच राजकीय संदर्भ शोधू नये.) पाण्याची बाटली,भ्रमणध्वनी आणी थोडा आळसावलेला,थोडा सुखावलेला देह घेऊन बाहेर बाल्कनीत येवून बसलो.
-