Skip to main content

माझं आजोळ बेळगाव

लेखक स्वप्निल रेडकर यांनी रविवार, 22/04/2018 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल मध्ये परीक्षा संपता संपताच वेध लागायचे ते बेळगावला पळायचे.. नक्की आठवत नाही पण साधारण ७/८ तारिखला परीक्षा आटोपत आलेल्या असायच्या आणि पेपर सोपा गेल्याच्या आनंदापेक्षा मामाच्या गावाला जायचंय हाच आनंद मनात साठायला लागायचा .तयारी सुरु व्हायची. एसटी लागण्याची भीती हे एकच कारण मनात धाकधूक निर्माण करायचं. वेंगुर्ला ते बेळगाव साधारण तीन साडे तीन तासाचा प्रवास करायला फक्त बेळगावच्या ओढीपोटी तयार असायचो .नाहीतर एसटी नुसती बघितली तरी एक विचित्र गोळा पोटात तयार व्हायचा. दुपारी जेऊन एप्रिल मधल्या भर दुपारी वेंगुर्ला बेळगाव एसटी पकडायचो बस स्टॅन्डवर जाऊन .

ईबुक/ईपुस्तक म्हणजे काय? ईपुस्तकाचे वाचक आणि लेखकांना फायदे - ब्रोनॅटो

लेखक कौशिक लेले यांनी रविवार, 22/04/2018 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या तंत्रज्ञानाची माहिती मराठी माणसाला मराठीतून उपलब्ध करून देण्याचा माझा आणखी एक छोटा प्रयत्न. https://scontent.fbom1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/31100442_10155729232395910_8765591096479711232_n.jpg?_nc_cat=0&oh=79e1ab6ce62c31952dd62ae4313093ed&oe=5B53901D उद्या २३ एप्रिल अर्थात जागतिक पुस्तक दिन. या निमित्ताने मराठी ईपुस्तक प्रकाशक शैलेश खडतरे यांच्याशी मी (कौशिक लेले) संवाद साधला.

कमी बजेट मध्ये कुठली गाडी घ्यावी ??

लेखक राहुल करंजे यांनी रविवार, 22/04/2018 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार.. मला कुटुंबासाठी म्हणजे चार व्यक्तींसाठी कार घ्यायची आहे , माझे रोजचे फिरणे नाही पण मला लाँग ड्राईव्ह ला जायला आवडते कुटुंबासमवेत , मला सर्वात जास्त पर्यटन आवडते , माझे नाशिक जळगाव कोल्हापूर जाणे होते , कोल्हापूर हे आवडते ठिकाण म्हणून , पण मला सीएनजी कार घ्यावी की नको त्याचे फायदे तोटे तसेच कुठली गाडी घ्यावी कमी बजेट मध्ये ??? याचे मार्गदर्शन झाले तर मला खूप मदत होईल...

दिवसातून छप्पन वेळा

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 22/04/2018 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसातून छप्पन वेळा माझा चेहेरा बदलत असतो अस्थिर अचपळ पारा माझ्या नसानसात दौडत असतो दोन देतो दोन घेतो चेहेरा तेव्हा निब्बर होतो अचाट ऐकतो अफाट बघतो तेव्हा चेहेरा कोकरू होतो कोsहं प्रश्न छळतो तेव्हा मुमुक्षूचा होतो भास टपरी चहा भुरकताना मीच टपोरी टाईमपास जुनी गाणी, जुने छंद, वार्‍यासंगे विस्मृत गंध, दर्वळतात भोवती जेव्हा चेहेरा कवळा होतो तेव्हा तोच लोलक, तिरीप नवी जुना पडदा, हुरहूर नवी अनंतरंगी अद्भुत खेळ बघायचा तर हीच वेळ
काव्यरस

“आॅपरेशन स्मिअर” आणि “निद्रिस्त भारत”

लेखक गब्रिएल यांनी रविवार, 22/04/2018 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉसपवर एक म्येसेज फिर्तो आहे. आमाला लई इचार करनारा वाट्ला. फकस्त आप्ल्या फायद्याकडं नजर आसलेल्या बुद्दीमान लोकांला जरा तरी बुद्दी यावी या कारनाने या टिकानी द्येत हाहे. ================================================= “आॅपरेशन स्मिअर” आणि “निद्रिस्त भारत” ©कल्पेश गजानन जोशी देशातली आजची एकंदरीत परिस्थिती पाहता ब्रिगेडीअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा एक सत्य भाकित वर्तविणारा लेख आठवतोय. गेल्या वर्षी डोकलाम प्रश्नी मा. महाजन सरांचा “आॅपरेशन स्मिअर आणि भारत” हा लेख दैनिक पुढारीला वाचण्यात आला होता. त्यात त्यांनी स्वत:च्या सैनिकी पेशाला शोभेल असे एक गुढ सत्य मांडले होते.

दोन भिकारी भीक मागती, पुलाखाली करिती वस्ती

लेखक खिलजि यांनी शनिवार, 21/04/2018 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
दोन भिकारी भीक मागती पुलाखाली करिती वस्ती नेहेमी नेहेमी करुन याचना भुलवी फसवी पांथस्थांना एके दिवशी सांज वेळी अशीच होती रीती झोळी कोसुनी त्या चंद्रमौळी करिती याचना भरण्या झोळी धूर प्रकटला, डोळे दिपले शिवशंभोने दर्शन दिधले दोघांसी तीन अंडे दिले इच्छा धरुनी फोड तयासी इप्सित मिळेल त्वरित तुम्हांसी दोघेही ते खुश जाहले परतीच्या प्रवासा निघाले दोघांच्याही दोन वेगळ्या वाटा जाण्यापूर्वी गळाभेटा वर्षानंतर भेटू पुन्हा आपण देऊ यथेच्छ एकमेका आलिंगन काळ लोटला एक वर्षाचा शोधत शोधत पहिला आला त्याच जागेवर दुसरा नव्हता पुलाखाली तो उभा सापडला तीच याचना तीच झोळी तोच भि

शीर्षक नाही

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 21/04/2018 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णा करु आता काय लागे अबलांची हाय शील प्राण आता जाय नका करु आता गय दुर्जनांचे पुन्हा कौरव मातले कृष्णे करीतसे धावा देवा आता तरी पावा ज्योतिलाही तेल आता आसवांचे पुन्हा देवा घे अवतार कर पुन्हा चमत्कार तूच देशी न्याय भार आण तुला आता आहे रगताचे

एस्टी कार्यशाळा भेट-चित्रफित

लेखक आलमगिर यांनी शनिवार, 21/04/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
एस्टी कार्यशाळेच्या भेटीची व्हिडियोलिंक https://m.youtube.com/watch?v=VS4z2KLqPf0 लेखाची लिंक http://www.misalpav.com/node/42039 अल्प ओळीच्या धाग्यासाठी क्षमस्व आलमगिर (प्रणव जोशी)

आत्मताडनाची कविता.....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/04/2018 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मताडनाची कविता लिहू नये... यात होते असे, कि आत्मा सोडून बाकी सगळे दुखावतात यात काय हशील आहे, सांग! काय कामाची असली कविता? माणूस जोडत नाही, ती कविता नाही ही घे चिकन बिर्याणी, तुला सांगतो, कविता म्हणजे बिर्याणी मसालेदार, स्वादिष्ट! बोन प्लेट तयार ठेवायची होय, होय... तसेच होते.. आत्मताडनाच्या कविता शेवटी बोनप्लेट मध्येच पडतात... मी म्हणतो, मुळात कशाला करून घ्यायचे आत्मताडन? कशाला? तुझे आज काय, तर स्वतःच स्वतःचे अपहरण उद्या काय तर स्वतः च स्वतः चा तुरुंग बांधायचा... कशासाठी म्हणतो मी?

"शिळा"लेख....

लेखक ss_sameer यांनी शुक्रवार, 20/04/2018 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कडे कधीच शिळ उरत नाही. कारण ज्या दिवशी जेवण मला आवडतं ते अन्न तिला आवडत नाही, आणि तिला आवडलेलं मी पोटभर खाऊ शकत नाही. आठवड्यातले तीन दिवस कोणीतरी एक पोटापेक्षा जास्त खाऊन तृप्त असतो तर उरलेले तीन दिवस दुसरा, कारण स्वयंपाक सरासरी एक दिवसाआड चांगला बनवला जातो. अर्थात माझ्या दृष्टीने उत्तम म्हणजे तिच्या दृष्टीने बेचव ह्या व्याख्येप्रमाणे. आठवड्याचे उरलेले तीन दिवस मी कमी जेवतो याची दोन कारणे, एक म्हणजे आमची अन्नपूर्णा इतकी देखील वाईट स्वयंपाकिण नाही की पूर्ण उपाशी राहावे लागेल.