Skip to main content

पदर

लेखक कहर यांनी मंगळवार, 05/06/2018 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
युष्या मला तुझी खबर मिळू दे केलेल्या सर्व नोंदीची बखर मिळू दे प्रेमरोगी कधी होत नाही बरा औषधाच्या नावावर जहर मिळू दे जन्म जावो उभा वाळवंटी फिरून अंत समयी परी तुझे शहर मिळू दे काट मारल्या स्वप्नांची खाडाखोड सारी कागद कोरा कराया रबर मिळू दे नको ती ठाम काळ्या धोंड्यावरली रेष मिळणारा हर क्षण जर-तर मिळू दे वाट पंढरीची सरता सरे ना झाली विठुनामी अमृताचा गजर मिळू दे मंजूर आहे मरण अगदी या क्षणीही एक तुझी हळहळती नजर मिळू दे किनाऱ्यावर आता नाही राहिली मजा खोल आत ओढून नेणारी लहर मिळू दे सात जन्म संपत आले गोष्ट तरी बाकी सोबतीचा अजून एखादा प्रहर मिळू दे काहीच यातले वा नको तुझ्या कुशीत लपायला तु
काव्यरस

राजयोग - ९

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 05/06/2018 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
मंदिरात कोलाहल झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आषाढ चतुर्दशी होती. आजच रात्री मंदिरात चौदा देवतांची पूजा संपन्न होणार होती. सकाळी ताडाच्या झाडांमागून सूर्य उगवला तेव्हा आकाशात कुठेही ढगांचा मागमूस नव्हता. सोनेरी किरणांनी उजळून निघालेल्या मंदिराभोवतीच्या बागेत जयसिंह जाऊन बसला. लहानपणी त्यानं इथं घालवलेले सुखद क्षण त्याच्या मनात रुंजी घालू लागले. याच मंदिराच्या दगडी पायऱ्यांवर, इथेच गोमतीच्या घाटावर, या सुंदर बागेच्या थंडगार सावलीत त्यानं जो काही काळ घालवला होता, तो आता त्याला एखाद्या गोड स्वप्नाप्रमाणे वाटू लागला.

अंड्याचा रस्सा

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 05/06/2018 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
चावट रश्श्याच्या धाग्यात बर्याच लोकांनी माझ्या आजीची ही रेसिपी देण्याचा आग्रह केला सो काल केला अंड्याचा रस्सा ! जमवाजमव एकदम सिंपल. हा एक झटपट रस्साच आहे म्हणा ना :) तर एक (च) अंडे, बोटाच्या पेराएवढं आलं, ४-५ लसूण पाकळ्या, ४-५ चमचे ओले खोबरे, १ चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे, एक मध्यम कांदा बारीक चिरून. कोथिंबीर बारीक चिरून. १ चमचा कोल्हापुरी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, आणि थोडी हळद. फोडणीसाठी तेल, जिरे मोहरी. झाले साहित्य. सगळी मापे आजीच्या हिशेबाने दिलीत बरं ;) आता पहिले अंडं भरपूर फेसून ठेवायचं.

पेठ / कोथळीगड

लेखक milindd1782 यांनी मंगळवार, 05/06/2018 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा गुलाबी थंडीच्या रविवारी आमच्या अंगातली मस्ती उफाळून आली आणि आम्ही सकाळच्या ६ . १८ च्या कर्जत ट्रेन ने कर्जत गाठले ह्या वेळेला आम्ही गड निवडला (पेठ/कोथळीगड) … ट्रेन बरोबर ८. ०० वाजता कर्जत ला पोहचली…आणि तिथून कर्जत इस्ट ला ५ मिनिटांवर असलेले S. T stand धावत धावत गाठले तेव्हा समजले गडा जवळ जाणारी पहिली बस ८. ३० ची आहे … तो पर्यंत मग नाश्ता करून घेतला आणि मग ८. ३० ची जामरुख S.T पकडली आणि आंबिवली गाठले….

अंक, वेंक, अंग, वेंग, वेंगुर्ले, वेंगसर, बेंगलूर, वेंकटेश

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 05/06/2018 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचा मुख्य विषय महाराष्ट्र : वेंगसर, वेंगणी (पालघर-ठाणे) , वेंगगाव, वेंग गाव , वेंगरुल, वेंगुर्ले यात वेंग म्हणजे काय ? बेंगलूर, वेंकटेश या शब्दांच्याही व्युत्पत्ती संबंधीत असू शकतील का ? लेखात नव्याने मांडण्याचा प्रयत्न केलेली थेअरी * मराठीत वेंघणें To climb : also to mount or ascend (विदर्भात येंगणे चढणे अशा अर्थाचा शब्द आहे .

कोंडा, कोंडाणा; कोंड, कोंडके, कोंडदेव

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 05/06/2018 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
आंध्र तेलंगांणातली कोंडा शब्द असलेली स्थल नावे चटकन आठवता, गोळकोंडा, नागार्जुन कोंडा अजून बरीच आहेत. पण महाराष्ट्रातपण बरीच आहेत हे माहित नव्हते. महाराष्ट्राचा डाटाबेस धुंडाळल्या नंतर अनेक मिळाले आणि नंतर कोंडाणा आठवले. ईंग्लिश आल्फाबेट सर्च असला की कोंढवा सारखाही शब्द सूटत नाही. मग कोंडके आणि कोंडदेव हे पण मिळतात . अर्थात 'कोंडदेव' साठी जरासे लांब आणि जरासे अधिक जुन्या ईतिहासापर्यंत पोहोचावे लागेल. समुद्र किनारी आंध्रप्रदेशाचा गोदावरी मुख ते कृष्णा नदी मुखा दरम्याच्या पट्ट्यातील प्रदेशास वेंगीनाडू म्हणत.

नाचणीचे लाडू

लेखक manguu@mail.com यांनी मंगळवार, 05/06/2018 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
नाचणीचे लाडू साहित्य - नाचणीचे पीठ अर्धी वाटी ओले खोबरे किसुन २ चमचे शेंगदाण्याचा कूट ४ चमचे गूळ गरजे नुसार नाचणीच्या पिठात पाणी घालून त्याची भाकरी / टिक्की करुन घ्यायची. ती तव्यावर भाजून घ्यायची. मिक्सरमध्ये भाकरीचे तुकडे, ओले खोबरे , कूट आणि गूळ घालून मस्तपैकी फिरवावे. मिश्रण तयार होते. त्याचे लाडू बांधावेत. एखादा चमचा तूप टाकल्यास चालेल. वेलची, ड्राय फ्रूट , तीळ , भाजलेली मेथीदाणे एखादा चमचा , खजूर इ इ इ अ‍ॅड करता येईल. नाचणीच्या पिठाच्या लाडवाच्या अनेक पद्धती दिसतात. पीठ भाजणे, त्यात गूळाचा पाक करुन घालणे. गुळाच्या पाकात नाचणी पीठ घालून तव्यावर गोळा करणे .

अनवट वाट ३

लेखक अनाहूत यांनी मंगळवार, 05/06/2018 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
" तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . " " अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . " " म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत .

बोलकी पुस्तकें

लेखक साहना यांनी मंगळवार, 05/06/2018 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय भाषांतून असलेली अनेक पुस्तके, कथा, स्तोत्रें मंत्र इत्यादी श्राव्य स्वरूपांत गोळा करून एका ठिकाणी उपलब्ध (विनामूल्य) करण्याचा उपक्रम काही मित्रांनी राबविला आहे. सगळ्याच लोकांकडे पुस्तके विकत घेण्यासाठी पैसे नसतात, खूप लोकांकडे वेळ सुद्धा नसतो त्याशिवाय आमच्या देशांत अंध लोकांसाठी विशेष ब्रेल साहित्य सुद्धा बनवले जात नाही. त्याशिवाय अनेक लोक अशिक्षित असल्याने त्यांना वाचता येत नाही पण एखादा अभंग, भजन इत्यादी ऐकले तर समजते. येत्या काही दिवसांत व्हॉइस आर्टिस्ट वापरून नानाविविध विषयावर छोटी छोटी बोलकी पुस्तके करण्याचा मानस आहे.

कोलाज

लेखक दमामि यांनी सोमवार, 04/06/2018 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
खिलजी साहेबांची माफी मागून__/\__ कोलाज १ "(साहेब असेच) ठोकत राहा, लाल करा ओ माझी लाल करा" दोन भिकारी भीक मागती, तप्त झाली धारा सारी , दहाही दिशा त्या पेटल्या बाई पलंगावर बसून होती तिने पेन मागितलं, मी हात दिला कशी वाटली आमची दहा बाय दहा ? उगाच वणवा भडकलेला, गजरेवालीने त्यात टाकली माती.. "एक दिवस तरी लहान "बाबू" बनून बघावे," च्या मायला बॅट हातात घ्यायची होती ... ... परत पेटेल मेणबत्ती? कोलाज २ माझ्यासारखं प्रेम कुणी केलंच नाही. तुझ्यासाठी म्या काय नाय केलंय जालफ्रेझीची सोय , लवंगी चहा प्रेमळ दूध स्कॉसपूस प्येग बालाशिष स्तोत्र... जे घडलं प्रेमात माझ्या , ते तुला सांगूनही कधी कळलंच नाही माझ्
काव्यरस