Skip to main content

नाचणी

नाचणीचे लाडू

लेखक manguu@mail.com यांनी मंगळवार, 05/06/2018 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
नाचणीचे लाडू साहित्य - नाचणीचे पीठ अर्धी वाटी ओले खोबरे किसुन २ चमचे शेंगदाण्याचा कूट ४ चमचे गूळ गरजे नुसार नाचणीच्या पिठात पाणी घालून त्याची भाकरी / टिक्की करुन घ्यायची. ती तव्यावर भाजून घ्यायची. मिक्सरमध्ये भाकरीचे तुकडे, ओले खोबरे , कूट आणि गूळ घालून मस्तपैकी फिरवावे. मिश्रण तयार होते. त्याचे लाडू बांधावेत. एखादा चमचा तूप टाकल्यास चालेल. वेलची, ड्राय फ्रूट , तीळ , भाजलेली मेथीदाणे एखादा चमचा , खजूर इ इ इ अ‍ॅड करता येईल. नाचणीच्या पिठाच्या लाडवाच्या अनेक पद्धती दिसतात. पीठ भाजणे, त्यात गूळाचा पाक करुन घालणे. गुळाच्या पाकात नाचणी पीठ घालून तव्यावर गोळा करणे .

नाचणीचे शेंगोळे

लेखक manguu@mail.com यांनी मंगळवार, 22/05/2018 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
नाचणीचे शेंगोळे १. एक वाटी नाचणीचे पीठ घेऊन, तेल, पाणी, मीठ , थोडे तिखट घालून मळून घ्यावे. त्याचे शेंगोळे करुन ताटात ठेवावेत. २. वरण करण्यासाठी अर्धी वाटी तुर डाळ कुकरमधून अर्धवट शिजवून घ्यावी. ३. पॅनमध्ये फोडणी करावी. त्यात आले, लसुण, कांदा , कढीपत्ता , कोरड्या मिरच्या वापराव्यात. नंतर अर्धवट शिजलेली डाळ घलुम्न थोडे घोटावे, पाणी वाढवून शेंगोळे सोडावेत व भरपूर शिजवावेत. शेवटी चिंचेचा कोळ व गूळ घालून हलवुन पुन्हा शिजवावे. sh