Skip to main content

नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे

लेखक aanandinee यांनी सोमवार, 10/12/2018 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे थोडं वैतागून, थोडं निराशेने मी फोन ठेवला. एका एजन्सीची नवीन ब्रांच आमच्या शहरात उघडणार होती. वेगवेगळ्या मेंटल हेल्थ एजन्सीसबरोबर काम करणं मला सोयीचं वाटतं. एकाच ठिकाणी पाच दिवस काम करण्यापेक्षा हे variation मला आवडतं. एकाच जागी बांधल्यासारखं वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव मिळतात आणि flexibility ही राहते. या नवीन एजन्सीबरोबर काम करणंही मला आवडलं असतं. पण ते होण्यातलं दिसत नव्हतं. या घोळात घरून निघायलाही उशीर झाला. पेशंट्सबरोबर सेशन सुरू करण्याआधी थोडा वेळ पोहोचलं तर मला स्वतःचं मन शांत करायलाही काही वेळ मिळतो.

नाना करा व्हाटस ॲप गृप

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/12/2018 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या माझ्या दिलाचा करा व्हाटस ॲप गृप मुक्यामुक्याने करु आपन दोघे चॅटींग || नाना हिचं लवकर ऐका अन गृपचं घ्या मनावर पोर पार सुटली, था-यावर नाही हिचं मन ||को|| गुड मार्निंग करा सकाळी, उठल्यावरून माझी आटवन काढा, विडीओ कॉल करुन नका लावू...अहो नका लावू साधा कॉल, खर्च करा डेटा, टाका सारा रिचार्ज संपवून || मी झाली मेंबर त्याचं अन तुमी आडमिन दोघचं गृपमधी राहू नको तिसरं कोन शेल्फी बघा तुमी अन तुमीच बघा स्टेट्स प्रायव्हेट मेसेज टाका मीच ते वाचन || - पाभे
काव्यरस

अतृप्त आत्मा 11

लेखक प्रमोद पानसे यांनी रविवार, 09/12/2018 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
खुप कंटाळुन आम्ही टेबलवरुन उडी मारली .आणी खुर्ची शेजारी उभं राहुन एक हात नान्याच्या खांद्यावर ठेवत दुसऱ्या सहाताने टेबलवरचं रजिस्टर उचललं. "नान्या हरामखोर ! मुडद्याच्या टाळुवरचं पण चाटतोस ? साल्या लाज वाटली पाहिजे तुला ." त्याचं मानगुट पकडत आम्ही ओरडलो. दचकलेला नाना एकदम भयभीत नजरेने बघु लागला. डायरी ,कॕलेंडर सगळं बंद करुन त्याने ड्रॉवर उघडुन 100/- च्या नोटांच बंडलच काढुन टेबलवर ठेवलं. "हे घे बाबा ! आणी सोड मला .तुझा तीन महिन्याचा पगार घे आणी जा एकदाचा इथुन " नान्या गयावाया करु लागला. " हे मी घेउन काय करु ?

उदासी

लेखक शब्दबम्बाळ यांनी रविवार, 09/12/2018 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
सभोवताली उदासी साचून राहीली आहे तीचा परीघ केवढा हे माहीत नाही माहीती करुन घेण्याची गरजही वाटत नाही इथे फक्त मी आहे आणि माझ्यामध्येही ती आहे अगदी तुझ्यासारखीच... ती सुद्धा हल्ली कधीतरीच येते भेटायला, पण येते... मग मी सुद्धा तीच्यासोबत काही क्षण घालवतो ती लवकर जाऊ नये म्हणुन मुद्दाम एकटाच राहतो आता तर वाटतं तीच मला जास्त जवळची आहे अगदी तुझ्यापेक्षाही... ही उदासी मला बर्याच ठिकाणी फिरवते त्यातल्या काही जागा अजुनही ओळखीच्या वाटतात मग तिथले गंध, आवाज मनात दाटतात पण खरतर त्या सार्याच आता अनोळखी आहेत, अगदी तुझ्यासारख्याच... मला माहीत आहे ही जास्त वेळ राहणार नाही, पण तरीही मी तीची मनधरणी करत र

मोदीजी गडकरीजी नेहरूजी पटेलजी ...

लेखक mrcoolguynice यांनी रविवार, 09/12/2018 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा राजकारणी हा अर्थतज्ज्ञ असलाच पाहिजे असं नाही. त्याचप्रमाणे तो इन्फ्रास्ट्रक्चर नियोजन वा नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन यातही तो वाकबगार असेलच असं नाही. मात्र राजकारणी हा निश्चितच असा असला पाहिजे की भारताच्या नैसर्गिक संसाधनांचं सुयोग्य व्यवस्थापन करून, जो या देशाला त्याच्या पूर्ण क्षमतेचा लाभ उठविता यावा, व शहरी निमशहरी , कृषी तसेच ग्रामीण क्षेत्राला त्यांचं देणं देऊन, या दृष्टीने या देशापुढचे वेगवेगळे प्रश्न व्यवस्थित हाताळू शकेल. देशाला पुढे जाण्यापासून रोखणार्या त्रुटींचं विश्लेषण करताकरता त्यावर मात करून पुढे जाण्याचा मार्गही दाखवेल.

ऐलान

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी रविवार, 09/12/2018 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या रणांगणात होतच राहतील स्वाऱ्या वाघासारख्या चढाया कर संकट परतविणाऱ्या जरी होतील किती वार तरी हार नकोस मानु पराभवाचा विचारसुद्धा तू मनात नकोस आणु घोंगावणारी वादळेही शिकवण देतात नवी नवं त्यातुन शिकण्याची तुझी दृष्टी मात्र हवी बेडरपणे तुटुन पड संकटांवर आता थांबु नको येईल म्हणत वाचविण्याला त्राता झेलत राहा पाऊसवारा कणखर बनत जाशील हार मानेल संकटसुद्धा सक्षम असा होशील नसेल जरी जगात साऱ्या आज तुझे काही तरी नसेल भविष्यातही असे मुळीच नाही थकु नकोस लढत राहा निधडेपणाच शान आहे मदमस्त या दुनियेविरुद्ध हा लढ्याचा ऐलान आहे - शार्दुल हातोळकर
काव्यरस

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):५. बार्शी ते बीड

लेखक मार्गी यांनी शनिवार, 08/12/2018 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा....: ५. बार्शी ते बीड १६ नोव्हेंबर, आज ह्या प्रवासाचा पाचवा दिवस. कालचा दिवस सायकलिंगच्या दृष्टीने फारच मस्त गेला. आता सायकल चालवणं खूप सोपं झालंय. आता किलोमीटरची अंतरं जाणवतच नाही आहेत. काल चर्चाही छान झाली होती. आज बार्शीवरून बीडजवळच्या पाली इथल्या बाल गृहात जायचं आहे. आजचं अंतर जवळपास ९५ किलोमीटर असेल. रोजच्या प्रमाणेच पहाटे बार्शीतून निघालो. बार्शी‌ बरंच मोठं शहर आहे. कँसर रुग्णालयाच्या पुढे आगळगांवचा रस्ता विचारत निघालो. इथून पुढे थोडं अंतर साधारण दर्जाचा रस्ता आहे. आणि अगदीच आतला असल्यामुळे मध्ये मध्ये तुटलेलाही असणार!

जीव झोपला (विडंबन)

लेखक चांदणे संदीप यांनी शनिवार, 08/12/2018 18:03 या दिवशी प्रकाशित केले.

विडंबनाचे निमित्त: परवा, एका बॅचलर मित्राकडे कामानिमित्त जाणं झालं. कामाचं बघता बघता रात्री उशीर झाल्यावर त्याला म्हटलं, आता घरी जातो, उद्या बघू. तर, पठ्ठ्या आपला, "झालं रे! किती वेळ लागतोय! पाचच मिनिटे अजून." असं म्हणून दुसऱ्याच नवीन कामाला सुरूवात करीत होता. मलाही मग डुलु डुलु डुलक्या सुरू झाल्या. झोप अनावर झाल्यावर मी तिथेच झोपायचं हे दोघानुमतें ठरलं. आता, बॅचलरची रूम म्हणजे, जास्त काही सांगायलाच नको. पांघरायला दिलं त्याने पण त्याचा असा काही सुगंध येत होता की, मी कुडकुडून मरायचं मरण निधड्या छातीने अंगाशी कवटाळलं!