Skip to main content

ऐलान

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी रविवार, 09/12/2018 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या रणांगणात होतच राहतील स्वाऱ्या वाघासारख्या चढाया कर संकट परतविणाऱ्या जरी होतील किती वार तरी हार नकोस मानु पराभवाचा विचारसुद्धा तू मनात नकोस आणु घोंगावणारी वादळेही शिकवण देतात नवी नवं त्यातुन शिकण्याची तुझी दृष्टी मात्र हवी बेडरपणे तुटुन पड संकटांवर आता थांबु नको येईल म्हणत वाचविण्याला त्राता झेलत राहा पाऊसवारा कणखर बनत जाशील हार मानेल संकटसुद्धा सक्षम असा होशील नसेल जरी जगात साऱ्या आज तुझे काही तरी नसेल भविष्यातही असे मुळीच नाही थकु नकोस लढत राहा निधडेपणाच शान आहे मदमस्त या दुनियेविरुद्ध हा लढ्याचा ऐलान आहे - शार्दुल हातोळकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3083
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान आहे कविता, आवडली... पैजारबुवा,

सहमत .. पैंबुकाकांशी .. मस्त कविता आहे ... एक ठिणगी कुठेतरी आत लपलेली धगधग धगधग चालू होती थोडीशी बावरलेली कौल वाऱ्याचा हवा तिला मिळता मिळता राहिला आतल्याआत विझून गेली वणवा नाही पहिला

मस्त लय भारी. आवडली. हिंदीतील " कोशिश करनेवालों की कभी हार नाही होती" सारखी मराठीतली कविता . प्रत्येक आत्महत्या करणार्याचा विचार मनात येणाऱ्या शेतकऱ्यानं एकदा तरी वाचावी. निराशा पळून जाईल त्याची.

In reply to by प्रमोद देर्देकर

एका कवीसाठी यापेक्षा अधिक सन्मान काय असु शकेल कि ज्याची कविता एखाद्या निराश माणसाचा जीव वाचविण्याइतपत प्रेरणादायी समजली जावी !! पैजारबुवा, खिलजि, नंदिनी, पद्मावती, प्रमोदजी सर्वांचे मनापासुन आभार !! __/\__