Skip to main content

[शशक' १९] - संधी

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 16/02/2019 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
" शेसुकाका लवकर चला, आमच्या कोकराला कायतरी चावलंय, तोंडातून फेस येतोय". मागच्या मळ्यात घर असलेला छोटा युवराज काकुळतीला येऊन सांगत होता, युवराजचा त्या कोकरावर खूप जीव. दारुडा असला तरी शेसुला झाडपाल्याचे बऱ्यापैकी ज्ञान होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याने शेवटचा उपाय म्हणून कोकराचा अर्धा कान कापून काहीतरी औषध कोकराच्या तोंडात कोंबले, कान कापल्यानंतर कोकराचा आवाज शेसूच्या घरात ऐकू आला तसा शेसूच्या बायकोने मसाला वाटायला घेतला. शेसुकडे राहिलेली बॅटरी मागायला संध्याकाळी युवराज पुन्हा शेसूच्या अंगणात गेला तेव्हा तिथूनच डोळ्यात पाणी घेऊन निपचित घरी येऊन पडला , शेसु खाटेवर झोपून मस्तपैकी बिड्या ओढत होत

संदीप खरे यांची माफी मागून....

लेखक उपेक्षित यांनी शनिवार, 16/02/2019 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरे यांची माफी मागून.... पुर्वी कधीतरी २६/११ च्या आठवणीत खरडले होते आज दुर्दैवाने परत आठवायची वेळ आली आहे. आज पुन्हा मेणबत्तीवाल्यांचा धंदा तेजीत येणार. २/४ फोटो आपणही शेयर करून देशप्रेम आहे हे दाखवून देणार. षंढासारखे आपण राजकारण्यांना शिव्या घालून ५/५० टाळ्या मिळवणार. म्हराटी/ दाक्षिणात्य/ उत्तर भारतीय माणूस शहीद झालेले सैनिक आमच्या प्रदेशातील होते सांगून कॉलर ताठ करणार. मग हिंदू-मुस्लीम तेढ कसे आणि किती वाढवता येईल याची गणिते बांधली जाणार. या गुंत्यात गरीब अजून पिचला जाणार, मध्यमवर्गीय आपण या गावचेच नाहीयोत असे समजून वागणार आणि श्रीमंत पुन्हा एकदा इथल्या व्यवस्थेला भिकार ठरवून परदेशा

ते दोघे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 16/02/2019 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीने रेखीव झालेल्या त्या प्रचंड वृक्षातळी ते दोघे होते मघामघाशी तर! मी पाहीले त्यांना बराच वेळ खाली मान घालून एकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना, कुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना, अन् तेव्हा रस्ता हसताना... मी पाहिले त्या दोघांना , हात हातात घेताना 'बाहों के बाहर नजरों से ओझल होना ही लकिरों पे लिखा है तो वो लकिरे ही मिटा देते हैं' त्याने एवढेच म्हणलेले मला ऐकायला आले नंतर मला ते दिसले नाहीत... पानगळीने रेखीव झालेल्या प्रचंड वृक्षामागे मला नंतर कुणीच दिसले नाही... -शिवकन्या

[शशक' १९] - गारेगार

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 15/02/2019 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी उलगडून बसतो, तुझे फोटो पाहताना अन हात थरथरतात, जुने मेसेजेस वाचताना फोटोज डिलीट करताना, उसवलेल्या जाणिवांना जपताना, तुझा नंबर ब्लॉक करतो, नंबर पाठ असताना तुझ्या आठवणींच्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला असतो मी त्या वटवृक्षाखाली का बरं फुलं शोधत बसतो? मी गॅलरीतून बघतो नभी ढग मोजतो परत एकदा कॉफी प्यावी म्हणून किचनकडे वळतो मी फ्रिजचा दरवाजा उघडतो तुला डोळे भरून बघतो तुझ्या डोळ्यांभोवती जमलेल्या बर्फाला हलकेच काढून टाकतो तुझ्या बोटातली अंगठी काढतो तुझा हात हातात घेतो अशीच अवघडून राहशील का? असं स्वतःलाच विचारतो. मी जुन्या बाजारातून फ्रिज विकत घेतला, त्या फ्रिजच्या आतमध्ये चोळाबोळा केलेला काग

पुलवामा CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निमित्ताने....

लेखक सत्य धर्म यांनी शुक्रवार, 15/02/2019 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
पुलवामा CRPF जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निमित्ताने... काल 14 फेब्रुवारीला काश्मीर मध्ये पुलवामा येथे शहीद झालेल्या भारत मातेच्या सर्व वीर सुपुत्रांना त्रिवार सलाम. या हल्ल्याला येणाऱ्या काळात आपली तिने सैन्यदले कृतीतून योग्य उत्तर देतीलच हे सर्व चालू घडामोडी वरून सांगता येते. या हिंदुस्तानचा एक सजग आणि जबाबदार हिंदू नागरिक म्हणून माझ्या बौद्धिक कुवतीप्रमाणे या भ्याड हल्याचा अन्वयार्थ लावण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही जर कोणाला असे वाटत असेल तर त्यांनी या पुढे वाचू नका. आपल्या अखंड हिंदुस्थानावर परक्यांचे हल्ले होने ही तशी नवीन बाब नाही.

आयटी मध्ये बॉस चे रक्त कसे प्यावे ?

लेखक एकुलता एक डॉन यांनी शुक्रवार, 15/02/2019 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यनाना असतो तसा मला पण बॉस त्रास देत आहे जास्त काम असेल त्यावेळी आजारी पडणे ,उशिरा येणे ,आळस करणे वगैरे सगळे करून झाले आहे पण पठ्या काही सुधरत नाही मुद्दाम छोट्या चुका काढणे चालूच आहे sr मानजमेंट काही कामाचे नाही ना HR apprisal होणार नाही ह्याची खात्री आहे ,काढले कामावरून तरी फरक नाही पण ह्या नालायकाचे रक्त प्याचे आहे जालीम उपाय सुचवा ,रात्री पण स्वप्नात मी दिसायला पाहिजे

सिम्पल इज ब्यूटिफुल !!! - बंडू गोरे भोजनालय, वाई

लेखक सरनौबत यांनी शुक्रवार, 15/02/2019 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
महाबळेश्वरला २-३ दिवस ग्रील्ड सँडविच, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि पंजाबी जेवणावर यथेच्छ ताव मारल्यावर कधी एकदा पुण्याला घरी जाऊन वरण -भात खातोय असं होतं. असंच एकदा ट्रीप संपवून सकाळी उशिरा पुण्याला परत जायला निघालो. संकष्टी चतुर्थी होती म्हणून वाटेत वाईला महागणपतीच्या दर्शनाला थांबलो. १ वाजून गेला होता आणि एव्हाना पोटात कावळे चांगलेच कोकलत होते. चौकशी केल्यावर 'बंडू गोरे खानावळीत' घरगुती जेवण मिळतं असं समजलं. मंदिरापासून अगदी जवळ आहे म्हणून तिकडे मोर्चा वळवला. ‘खानावळ’ ह्या नावाला अजिबात न शोभणारी स्वछता आणि टापटीप दिसत होती.

भाषा जपण्यासाठीचे प्रयत्न

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/02/2019 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे उत्तर महाराष्ट्रात- खानदेशात आणि आसपासच्या परिसरात अहिराणी बोलीभाषा बोलली जाते. अहिराणी भाषेचा इतिहास इसवी सनाच्या दुसर्‍या तिसर्‍या शतकापासून दिसून येतो. तरीही अहिराणी भाषेला स्वतंत्र लिपी नाही. कारण जगातल्या अनेक भाषा आपल्या आसपास अस्तित्वात असलेल्या लिपीचा आधार घेत आविष्कृत होत राहतात. आणि ज्या भाषा मौखिक असतात त्या प्राचीन असूनही लिपीचा अट्टहास धरत नाहीत. म्हणून काही शिलालेखात, ताम्रपटात वा लिखित काव्यात अहिराणी दिसून येत असली तरी ती स्वतंत्र लिपीत नाही. अहिराणीने देवनागरी लिपी स्वीकारली आहे. अहिराणी ही मूळ अभिर लोकांची भाषा.

[शशक' १९] - वारसदार

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 15/02/2019 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो पप्पा, बीपीच्या गोळ्या संपल्या होत्या ना? कृष्णा आहे ना ड्रायव्हिंगला? " "हो सूरजबेटा, सेशन आटोपले कि निघतो" "रात्री जागु नका. उद्याचा युवामेळावा करतो हॅन्डल मी. डोन्ट वरी. बाय" .......... "कृष्णा, किति लांबय फार्महाऊस? त्या टॅब्लेट कुठायत? हाय ना सगळे मॅनेज? उद्या सकाळी मिटिंगय कॅबिनेटची. थांब तू. "हा सर, भईर हाव. गोळ्या ह्या घ्या" ......... "सूरजबेटा, सॅड न्युज आहे. पप्पाची बीपी शूट होऊन अ‍ॅटॅकने डेथ झालीय. व्हायग्राचा ओव्हरडोस होता. जरा क्रिटिकल सिच्युशनमध्ये सापडलेत. तुलातर माहीती आहे त्यांचे.