Skip to main content

[शशक' १९] - संधी

शनिवार, 16/02/2019 या दिवशी प्रकाशित केले.
" शेसुकाका लवकर चला, आमच्या कोकराला कायतरी चावलंय, तोंडातून फेस येतोय". मागच्या मळ्यात घर असलेला छोटा युवराज काकुळतीला येऊन सांगत होता, युवराजचा त्या कोकरावर खूप जीव. दारुडा असला तरी शेसुला झाडपाल्याचे बऱ्यापैकी ज्ञान होते. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याने शेवटचा उपाय म्हणून कोकराचा अर्धा कान कापून काहीतरी औषध कोकराच्या तोंडात कोंबले, कान कापल्यानंतर कोकराचा आवाज शेसूच्या घरात ऐकू आला तसा शेसूच्या बायकोने मसाला वाटायला घेतला. शेसुकडे राहिलेली बॅटरी मागायला संध्याकाळी युवराज पुन्हा शेसूच्या अंगणात गेला तेव्हा तिथूनच डोळ्यात पाणी घेऊन निपचित घरी येऊन पडला , शेसु खाटेवर झोपून मस्तपैकी बिड्या ओढत होता, चुलीवरच्या मटणाचा सुगंध पसरला होता आणि कोकराचे कातडे दोरीवर वाळायला घातले होते

वाचने 4932
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

+१

+१

अरे रे बिचारा निरागस युवराज, पैजारबुवा,

बिचारा निरागस युवराज आणि बिचारं कोकरू!

+१

+१

:( +१

+१

+१

1+

बिचारं कोकरू आणि युवराज

+1

आईग