Skip to main content

(तू मतदार माझा)

लेखक नाखु यांनी रविवार, 21/04/2019 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - विळखा पाहू तू मतदार माझा भोट, भोंगळ अजीजी तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा मस्तवाल नेता मी .... घेऊन जमेस तुला निव्वळ उगी तुंबडी भरावी बोभाटा करावा मी एव्हढा की लाभावी मज(समोरची) वाटणी सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित. वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

कट्टा

लेखक वरुण मोहिते यांनी शनिवार, 20/04/2019 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांना. खूप दिवस भेट झाली नाही. तर ह्या वेळी एक कट्टा करण्याचे ठरवले आहे. पुणे आणि मुंबई साठी मध्यवर्ती कर्जत बरे पडेल असे वाटते. माझ्या घरी. व्हेज - नॉनव्हेज पर्याय आहेतच. व्हेज जेवणासाठी फक्त मेनू सांगावा. नॉनव्हेज चे पर्याय माझ्याकडे आहेतच. जवळपास भटकता पण येईल. मोरबे धरण, एन डी स्टुडियो इत्यादी. अष्टविनायक चा बाप्पा पण 10 किलोमीटर वर आहे. बाकी ड्रिंक असेल तर खर्च ज्याचा त्याचा. घरची लोकेशन पाठवीन. बाबा डेरी पासून 1 मिनिटं वर. संपर्क करा. होऊन जाऊदे कट्टा एक. कुटुंबासाहित आलात तरी उत्तम. 25 किंवा 26 मे ला करायचा आहे. सूचनांसाठी धन्यवाद. बदल केला जाईल. भेटूया मग.

इंग्रजी मालिका - ब्रॉडचर्च

लेखक nishapari यांनी शनिवार, 20/04/2019 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रॉडचर्च ही मालिका पूर्ण पाहून झाली ... बरीच गंभीर होती .. पण काही हलकेफुलके सीन्सही होते .. 3 सिजन्स मध्ये 3 वेगळ्या केसेस होत्या . पहिल्या एपिसोड मधल्या खुनाच्या गुन्ह्याचा गुन्हेगार आठव्या एपिसोड मधे समजतो ... दुसरा सिजन पूर्ण त्याची कोर्टात केस आणि दुसरी एक सेपरेट इन्वेस्टीगेशन केस .. तिसरा सिजन एक वेगळी केस असं आहे ... आधी पाहिलेल्या सगळ्या सिरिअल्स पेक्षा वेगळी होती .. गुन्ह्यांचा खोलवर शोध हे तर वैशिष्ट्य आहेच पण ते क्राईमच्या अनेक मालिकांमध्ये दिसून येईल कदाचित..... त्यात फार विशेष काही नाही ... अर्थात तेही गुंगवून ठेवणारं होतंच .

सुरनोळे

लेखक यशोधरा यांनी शनिवार, 20/04/2019 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे जिन्नस: कलिंगडाच्या सालीचा आतील पांढरा गर - १ वाटी तांदूळ - १वाटी चिरलेला गूळ - २ टेस्पू खवलेले खोबरे - साधारण पाव वाटी, थोडे कमी असले तरीही चालेल. चवीप्रमाणे मीठ क्रमवार पाककृती:  पूर्वी आज्जी असताना काही अगदी टिपिकल पाकृ ती बनवत असे. कलिंगड आणले की एकदा तरी हे सुरनोळे बनत असत. एकदा कलिंगड आणले होते, तेव्हां ही पाकृ आठवली. नीटशी आठवेना म्हणून रसचंद्रिका ह्या पुस्तकाचाही आसरा घेतला. साधारण तशीच कृती पुस्तकातही दिलेली आहे. तर, ही कृती - १. एक वाटी तांदूळ ४-५ तास भिजत ठेवावे.

क्रिमिनल जस्टीस

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 19/04/2019 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या कोणत्याही सिरीज मध्ये ड्रग्स, सेक्स पंकज त्रिपाठी यांची फोडणी मारली कि ती हमखास यशस्वी होते असा सिरीज बनवणाऱ्यांचा समज आहे. मग कथा कितीही कच्ची असो पंकज त्रिपाठी आहे ना तो हमखास अभिनयाच्या जोरावर सिरीज तारून नेतो. The Night Of चं भारतीय रूपांतर असलेल्या 'क्रिमिनल जस्टीस' या 'क्राईम-कोर्टरूम ड्रामा' मध्ये सशक्त कथा सोडून वरच्या तिन्ही गोष्टी आहेत. पण शेवटी जो धक्का दिलाय फक्त त्यासाठी हि सिरीज पहावी. कॅब चालावणारा एक मुलगा त्याच्या कॅब मध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या मुलीचा फोन गाडीत राहतो म्हणून परत करायला जातो.

कथा - सुरवात ?

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 19/04/2019 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
कथा - सुरवात ? ---------------------------------------------------- " सुरवात ! " रणदीप ओरडलाच . आम्ही सगळे त्याच्याकडे पाहायला लागलो. " ठरलं तर , आपल्या संघटनेचं नाव - सुरवात ! " तो म्हणाला. आम्ही माना डोलावल्या. वरच्या झाडाच्या फांद्याही हलल्या . ------------------ रणदीपला सतत काहीतरी करायला हवं असायचं. म्हणजे चार लोकांच्या नजरेत भरेल असंच काहीतरी. ..लाइमलाईट !... पुढारीपणा करायला अन गाजवायला त्याला भलतंच आवडायचं. तो आमच्या भागातल्या नगरसेवकाचा मुलगा होता.

पुनरागमनाय च

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 19/04/2019 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त नव्या आणि जुन्या मिपाकरांना नानबाचा नमस्कार. ४.५ वर्षांच्या विश्रांतीनंतर मिपावर पुनरागमन करण्याचे योजिले आहे. लवकरच भटकंती सदरात एक लेखमाला सुरू करतोय. सध्या सुट्टीवर भारतात असल्यामुळे भरपूर मोकळा वेळ हाताशी आहे म्हणून पुनश्च लिखाणाचा योग जुळून आला आहे. सर्व नव्या जुन्या मंडळींचा वरदहस्त डोक्यावर असावा..

तू ट्रोल माझा

लेखक चामुंडराय यांनी शुक्रवार, 19/04/2019 07:21 या दिवशी प्रकाशित केले.
वरिज्नल प्रेर्ना क्र. १ https://www.misalpav.com/node/44410 प्रेर्ना क्र. २ https://www.misalpav.com/node/44413 प्रेर्ना क्र. ३ https://www.misalpav.com/node/44417 तू ट्रोल माझा गुप्त, मास्क्ड, चोम्बडा पिंक टाकण्या मज मागे उडणारा उठवळ टोळ तू .... करुनि ब्लॉक तुजला असुरी आनंद मनी भरावा दुर्लक्ष करावे मी एव्हढे की नामशेष व्हावी टोळधाड तुझी....

पाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 19/04/2019 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
इतक्या पाण्याचे शरीरमन बनवताना विचार करायचा देवा, पाण्याला इतके झोके देताना उसंत घ्यायची देवा.... उसळून पुन्हा आदळते पाणी खडक द्यायचा देवा... दोन डोळे पुरत नाहीत पाण्याचा संसार पेलताना... देवा, आता पाण्याचे तीर्थ करा अन् पाण्यातून मुक्ती द्या.... शिवकन्या

किरमीजी शिडे

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 18/04/2019 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
उपकार त्या युट्युबाचे. काय नाही दिले त्याने? जगाच्या कोपर्‍यात कुणा हौशाकडे असलेल्या क्लिपा, व्हिडिओ अपलोड केल्या जातात, दुसर्‍या कोपर्‍यात कुणाच्या तरी आठवणीत त्या पुसट झालेल्या पुन्हा ताज्या होतात. काय, कुठे, कसे मिळून जाईल सांगणे मुश्कील. कलर कोड चेक करताना अचानक एका रंगाचे नाव दिसले क्रिम्सन. कोण जाणे पण क्रिम्सन नावाची आठवण ताजी झाली. नुसत्या क्रिम्सन शब्दाने किती मोठी सफर घडवली. क्रिम्सन सेल्स. शाळेतला मी उन्हाळ्याच्या सुट्टीत हमखास मोठ्या आत्याकडे राहायचे वेध लागलेले. मोठ्या आत्याचे यजमान एअरफोर्स रिटायर्ड. कुटुंबाचा बराचसा काल पठाणकोट, अंबाला अशा ठिकाणी गेलेला.