Skip to main content

हा संभ्रम माझा

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 23/07/2019 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
नकळत ओढून नेतो मिचकावत सोडून देतो स्वतःशीच खिन्न हसतो हा संभ्रम माझा स्वप्नांच्या झुळूकी मनाला तप्त पाऊलवाटा पायाला अनवाणी चालू पाहतो हा संभ्रम माझा अवखळ विचारांच्या वाऱ्यात दात-ओठांच्या माऱ्यात क्षणासाठी मलम होतो हा संभ्रम माझा - संदीप चांदणे

बनपाव की करवंट्या.......?

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 23/07/2019 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
(पुरुषोत्तम बोरकर, तुम्ही 'परकारातील मल्ल' या तुमच्या आगामी पुस्तकात काय लिहिले असते, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण तुम्ही गेलात आणि विचारवंतांचे एक छद्मरूप डोळ्यांसमोर तरळून गेले. श्रद्धांजली.) बनपाव की करवंट्या.......? त्यांचा ‘भूमिका’ या शब्दावर जीव. अतोनात. मग ती घ्यायची असो, करायची असो वा वठवायची असो. पण ते पडले पुरुष, बाईच्या भूमिकेची त्यांना दांडगी हौस. बरं, आता भूमिका घ्यायला, वठवायला किंवा करायला बायका आहेत हे सांगूनही त्यांना पटत नसे. भूमिकेचा प्रसंग आला रे आला की ते बनपाव वापरत. मेकअपमन सांगे, ‘करवंटी वापरा.’ तर ते म्हणत, ‘तिला वजन नसते. भूमिका म्हणजे वजन पाहिजे.

शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या काळातील झालेल्या शिक्षा किंवा चुकांबद्दल झालेली कान उघाडणी

लेखक srahul यांनी मंगळवार, 23/07/2019 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या काळातील झालेल्या शिक्षा किंवा चुकांबद्दल झालेली कान उघाडणी १)बाबाजी भिकाजी गुजर (आपण सारे त्याला इतिहासात “रांझ्याचा पाटील” म्हणून ओळखतो.) , विवाहीत स्त्री सह “बदअमल” केला म्हणून कोपरा पासून दोन्ही हात तोडले , गुडघ्या पासून दोन्ही पाय तोडले. “चौरंग “ केला...ही शिक्षा शिवाजी महाराजांनी दिली तेव्हा त्यांचे वय अवघे १६ वर्षांच्या आसपास होते. २) छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान अथवा पंतप्रधान (पेशवे) शामराजपंत निळकंठ पद्मनाभी उर्फ रांझेकर यांनी एका प्रकरणात एकाचे कुलकर्णी पद जबरदस्तीने (आपल्या अधिकाराचा गैर वापर करून) आपल्या नावावर करून घेतले.

चित्रपट परीक्षण ताशकंद फाइल्स

लेखक हस्तर यांनी मंगळवार, 23/07/2019 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
खरा स्पेलिंग tashkent आहे पण इतिहासाच्या पुस्तकात ताशकंद किंवा तास्कंद असे आहे एकसिडेंटल prime मिनिस्टर पेक्षा काई पटीने उजवा नुसत्या एखाद्या पुस्तकांवर आधारित प्रोपोगांडा मूवी नाही तर चित्रपट स्वतः एक पात्र सांगते ते त्याच्या प्रोपोगांडा साठी केस वॉर काम करतेय पल्लवी जोशी ला बर्याच दिवसाने पाहून बरे वाटले ,ती पण निर्मिती मागे आहे पण रोल पण चांगला आहे तलवार ह्या मेघनाने गुलजार च्या चित्रपटाची पुढची पायरी पहिला भाग किंचित रटाळवाणं पण शेवट एकदम जोर पकडतो ,मला वाट नाही कोणी लौकर चित्रपटगृहाच्या बाहेर जाईल चित्रपट उल्लेख केलेले बुक ऍमेझॉन वरून नक्की मागवेन राजकारणाहून पण काही अवघड आह

किलबील किलबील पक्षी बोलती...

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 23/07/2019 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
"सुंदर अक्षर हा एक सुरेख दागिना आहे, हा दागीना मिरवायचा की मोडायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे" फळ्यावर हा सुविचार लिहून डोंगरे सर थाम्बले. फळ्यावरच्या त्या अक्षरांकडे पुन्हा एकदा पाहिलं. ओल्या फडक्याने पुसलेल्या काळ्याकुळकुलीत फळ्यावर ती पांढर्‍या खडूने काढलेली अक्षरे टिप्पूर चाम्दण्यासारखी दिसत होती. अक्षरे पहात असताना त्यांना का कोण जाणे रफीचे " फलक पे जितने सितारे है वो भी शरमाये…" हे गाणे आठवले. या फळ्यालाही फलक म्हणतो, आणि त्या आकाशालाही फलक असेच म्हणतो. गंमत आहे ना?

झरझर झरझर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 23/07/2019 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
झरझर झरझर झरणाऱ्या कातरवेळी मुलीला घेऊन मुलाने खेळायला जाऊ नये... तिचे धावते पाय थबकतात, घरातच विलांटी घेऊन मैदानाकाठचे गवत डोळ्यांनी खुडत राहतात...

वाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार

लेखक जालिम लोशन यांनी सोमवार, 22/07/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
उत्सव बालपणीचा मीरा फाटक माझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्हा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच! म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप! पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत.

युगांतर आरंभ अंताचा भाग ६ व ७

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 22/07/2019 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रह्मदेवांचा क्रोध ! ज्यामुळे त्यांनी स्वपुत्री मृत्यूलोकात धाडली ! देव - देवतांना भोगाव्या लागलेल्या या शापप्राप्त यातनांच्या अग्निकुंडात बळी पडला अजून एका अप्सरेचा! अद्रिका! मृत्युलोकी मस्य रुप धारण करण्याचा ब्राह्मदेवांचा शाप भोगण्यासाठी ती धरेवर अवतरली. धरेवरून पहटेच्या काषायवर्ण सुर्यदेवांचे रुप पाहून तिला मनोमन आनंद झाला. सुर्यदेवांचे प्रतिबिंब यमुनेच्या जलप्रतलावर पडलेले होते. नदी प्रवाहावर येणाऱ्या अलगद लाटांनी त्या प्रतिबिंबाला अस्थिर करत सर्व जलास केशरी छटा दिली होती. सुर्यदेवाच्या त्या लोभस रुपाकडे पाहत अद्रिकेने नमन केले आणि यमुनेच्या जलप्रवाहात प्रवेश केला.

रात्र थोडी..

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 22/07/2019 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
"अब बोल भी कुत्ते" चकचकीत रिवॉल्व्हर माझ्या छाताडावर रोखत तो उग्रपणे म्हणाला. अशावेळी भल्याभल्यांची फाटते. नव्हे फाटायलाच पाहिजे. कपाळावर घाम जमा होतो. आणि भरपूर तहान लागते. "आपण बस यहापे पिक्चर देखने आया था" नुकताच मारलेला गांजा अशावेळी कामाला येतो. "मुझे नही लगता.." रात्रीच्या एक वाजता हा माणूस गॉगल घालून बोलतोय. हि गोष्ट खरं बघितलं तर डोक्यात तिडीक जाणारी आहे. "ये सुलेमान का आदमी है साब.." जीपमध्ये बसलेला लुकडा हवालदार माझ्याकडे हात दाखवत जोरात म्हणाला. खरं तर तिथे दोन हवालदार होते. दुसरा मिशावाला होता. जाडजूड. बहुतेक त्याला झोप वगैरे आली असावी. "गांजा तो हम भी पीते है.

युगांतर - आरंभ अंताचा भाग ४ व ५

लेखक मृणालिनी यांनी रविवार, 21/07/2019 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वेला लाली शिंपडत पहाट हरित तृणांवर दवाचा वर्षाव करू लागली. पक्षांनी किलबिलाट सुरु केला आणि हस्तिनापुर नगराला जाग आली. महालात दास-दासींचा वावर चालू झाला. महाराज दास महराजांच्या कक्षेत फलाहार घेऊन गेला. पण महाराज तिथे होतेच कुठे? संपूर्ण रात्र अस्वस्थपणामुळे जागा राहिलेला शंतनू. तिचे रूप, डोळे, लाघवी हास्य त्याला बोलवत होते. तो तरी कसा थांबवू शकणार होता स्वतःला? शंतनूचा रथ नदीतटावर थांबला. सुर्यदेव अंबरात पसरलेल्या लाल रंगावर केशरी-पिवळ्या रंगाचे लेपन करत होते. नदी प्रवाहात त्याचे पडणारे प्रतिबिंब, हवेतला आल्हाददायक गारवा, अंबरातली केशरी रंगाची उधळण....