बाइक, पाऊस आणि कोकण
रात्रीचे ८.३० वाजून गेलेले सततच्या पावसामुळे आधीच शांत असलेले कोकण गुडूगुप होऊन झोपून जायच्या मार्गावर होतं. स्वरुपानंद स्वामींच्या पावसच्या आश्रमातून बाहेर पडून समोरच आईस्क्रीम खात उभे होतो. पाउस पडतच होता. दुकानदार काळजीपोटी म्हणाला आता नका जाऊ पुढे रत्नागिरीत. मधल्या रस्त्याला बिबट्याने दोघा तिघांना जखमी केलंय. मी फक्त हं म्हटल आणि आईसक्रिम खाऊन झाल्यावर बाईक ला स्टार्टर मारला.
पहिला दिवस
गणपती सुटीमध्ये कोकणात बाईकवर जाउया असा विचार मी आणि बायकोने केला होता.
मिसळपाव