द फॉगी माउंट्न बॉईज उर्फ (जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...)
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात.
लेखाचा पूर्वार्ध:
रोज आपण एखादे तरी छापील वृत्तपत्र चाळतो. त्यात बातम्या आणि जाहिरातींव्यतिरिक्त काही नियमित सदरे असतात. वृत्तपत्रानुसार सदरांचे स्वरूप वेगवेगळे असते. पण बहुतेकांत समान असणारी एक गोष्ट म्हणजे शब्दकोडे. शब्द्कोड्यांचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे काळ्यापांढऱ्या चौकटीयुक्त शोधसूत्रे दिलेले कोडे. त्यात उभ्या आणि आडव्या रांगेत शोधायच्या शब्दांचा सुरेख संगम होतो. ही कोडी नियमित सोडविताना सामान्यज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान, संस्कृती आणि समाज अशा अनेक क्षेत्रांत विहार करता येतो.