मैत्री!
टीप: 'केयलफिड्डी' या कवितेशी आशयात्मक साम्य भासल्यास योगायोग समजावा बरं का!
'केयलफिड्डी' दुवा https://www.misalpav.com/node/46119
------
मैत्री!
बाईचे दो सख्खे मैतर
पहिला काका दुसरा अप्पा
रोज मारते अलटुन पलटुन
हाटसापवर गुलुगुलु गप्पा
मैतर दोघे पक्के डांबिस
बाई त्यांचा नाजुक बिंदू
आव परंतू आणिति ऐसा
विनयाचे जणु साती सिंधू
रोजरोजच्या गप्पा ओल्या
खूष जाहती अप्पा काका
पाहु लागती स्वप्ने चावट
मनात बांधुन "वाडा" पक्का
परंतु बाई आहे खमकी
दाद कशी ती लागू देइल!
झुलवत ठेवी दोघांनाही
धाडुन चावट बदाम, स्माइल
दोघांमंध्ये संख्या छत्तिस
तोंड पाहणे पसंत
माझा कृष्णा मामा
माझा कृष्णा मामा
कांही कांही माणसाना परमेश्वर फार सुंदर रूप देतो. माझ्या कृष्णामामाला पाहीले कि मला हॉलीवूडच्या चित्रपटातील धिप्पाड हिरोची आठवण यायची. स्वच्छ पांढरे धोतर ,त्यावर तीन बटणाचा पांढरा हाफ शर्ट, अंगाबाद्याने धिपाड,भक्कम मजबूत शरीरयष्टी ,उंचापुरा,कुरळे केस ,रंगाने गोरापान ,पायात जाडजूड कोल्हापुरी चप्पल ,कपाळावर कायम अष्ट्गंघ .कदाचित धोतर नेसणारी हि त्याची शेवटचीच पिढी असावी .सकाळ असो कि रात्र असो त्याच्या चेहऱ्यावरील हस्य मात्र कधिच ओसरत नसे.
मेळघाट १: शहानूर-धारगड सफारी
आतापर्यंत गड-किल्ले, लेणी, मंदिरे पाहण्यासाठी बरीच भटकंती झाली होती. पण खर्या अर्थाने जंगल भ्रमंती अशी झाली नव्हती. नाही म्हणायला एकदा कॅम्प कोयना आणि एकदा आंबा घाटात प्रत्येकी २/३ दिवस मुक्कामी होतो. आंबा ते विशाळगड रस्त्यावर गव्याचे दर्शनही झाले होते. सह्याद्रीतील ह्या जंगलांचा प्रकारच वेगळा. गच्च हिरवी, काट्याकुट्यांची ही जंगले. इकडील जंगलांत वन्य प्राण्यांचा वावर फारसा नाहीच. अशातच मित्राने मेळघाट जंगल बघायला जायचा विचार मांडला. मेळघाट हे अमरावती जिल्ह्यात. अभयारण्याचा भाग प्रचंड विस्तृत, सातपुडा रांगेच्या दर्याखोर्यांनी भरलेला.
मीनाकुमारी की बेटी? भाग २
मीनाकुमारी की बेटी?
भाग २
व्हिडीओ क्लिप पाहून अनेकांनी विचारणा केल्या की सध्या ती कुठे आहे? काय करते? चमन जीवित आहेत का?
डी एन ए टेस्ट केली का? वगैरे... काहींना खरे आहे याची खात्री झाली... काहींनी सगळे ढोंग आहे असे काही नव्हते असे म्हटले …
प्रत्येकाची आपापली मते…
फेब्रुवारी २०२०मधे …
अमीर हुसेन चमन कराचीत असतात. त्यांना त्यांच्या मुलीने अमेरिकेतून पाहून ही क्लिप लिंक दिली.उंटावरल्या प्रा.डॉ. दा.ता.
प्रा.= प्राध्यापक डॉ. = डॉक्टर
दा.= दादा ता. = ताई
उंटावरल्या प्रा.डॉ.
मीनाकुमारी की बेटी ?
मीनाकुमारी की बेटी?
मीनाकुमारी की बेटी?
एकदा लाहोरच्या गल्लीतील एका फुटपाथवर एक चोपडे एकाच्या नजरेस पडले. घरी आल्यावर ते फाटके पुस्तक चाळून 'काहीच्या बाही लोक लिहितात' असे मनात म्हणत ते पुस्तक रद्दीत टाकून दिले. रद्दी विकताना ते पुस्तक वाचायची इच्छा झाली म्हणून तो वाचायला लागला. खरे कि खोटे याची शहानिशा करण्यासाठी त्याने शोध घ्यायला सुरवात केली. नंतर जे समोर आले ते तो सादर करत आहे.
सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मीनाकुमारीची जीवन कहाणी लेखी स्वरूपात उपलब्ध आहे. माहजबीन नावाने जन्मलेली अलिबक्षची ती मुलगी.आकाशफुले...
आकाशफुले!
एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहाते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो...
अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी पुण्यात गेलो होतो. थोडा मोकळा वेळ मिळाला, म्हणून सहज चक्कर मारण्यासाठी बाहेर पडलो, आणि गल्लीतल्या गुलमोहोरांच्या सावलीतून पुढे जात असताना अचानक एका बंगल्याच्या पाटीवर नजर स्थिरावली. मन क्षणभर मोहरलं... 'प्रख्यात कथाकार जी. ए.
हात, जंतू, पाणी आणि साबण
‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता.
आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात.
मिसळपाव