Skip to main content

व्यवसाय कल्पना फिनान्शिअल टेकनॉलॉजि

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 18/05/2020 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मिपावर सध्या आणि पुढंही आपल्याला व्यवसाय म्हणून काय करता येईल? यावर उलट सुलट चर्चा चालू आहे ..

रत्नाकर मतकरी यांना आदरांजली

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 18/05/2020 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
a ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले. रत्नाकर मतकरींचे लेखन जरी चतुरस्त्र असले तरी मला सर्वात जास्त आवडल्या त्या त्यांच्या गूढकथा. काय एकाहून सरस गूढकथा लिहिल्यात त्यांनी. धारपांच्या भयकथा लेखनात प्रामुख्याने अतिंद्रिय शक्ती, सुपरनॅचरल पॉवर्स असंत.

प्रॉन्स स्टू ......

लेखक किल्लेदार यांनी सोमवार, 18/05/2020 04:44 या दिवशी प्रकाशित केले.
पटकथेत फारसा दम नसला, दिग्दर्शक नवखा असला तरीही फक्त आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनुभवी नटांनी एखादा चित्रपट ओढून न्यावा तशीच ही एक पाककृती आहे. यातले प्रमुख अभिनेते म्हणजे कोळंबी आणि नारळाचे दूध आणि बाकी बरेच सहाय्यक व चरित्र अभिनेते.

स्वैपाकातले प्रयोग-दलिया बिर्याणी

लेखक Prajakta२१ यांनी रविवार, 17/05/2020 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज रविवार काहीतरी वेगळे करायचे होते पण घरात काहीच नव्हते आणि दुकाने पण बंद. फ्रिज मध्ये असाच एवरेस्ट शाही बिर्याणी मसाला सापडला पाकिटावरची कृती आणि उपलब्ध साहित्याचा मेळ बसत नव्हता मग असेच दलिया ला हा मसाला वापरून बघण्याचे ठरवले आणि करून पहिले बऱ्यापैकी जमली कसुरी मेथी चे मोठे पाकीट आणल्यामुळे आजकाल प्रत्येक पदार्थात घातली जाते थोडी कडवट चव येते पण ह्या रेसिपीला नाही आली कदाचित टोमॅटो सॉस घातल्यामुळे असेल साहित्य १. दोन वाट्या दलिया २. एक कांदा चिरून ३. दोन चमचे दही (चवीनुसार ) ४. एवरेस्ट शाही बिर्याणी मसाला किंवा कुठलाही बिर्याणी मसाला एक चमचा (टेबलस्पून ) ५.

कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ४

लेखक स्टार्क यांनी रविवार, 17/05/2020 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - १ कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - २ कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ३ दादाजानना जाऊन आता हप्ता होत आला होता. त्यांचा जनाजा निघाला तेव्हा सारा मुहल्ला जनाज्याच्या मागून कब्रस्तानपर्यंत चालत गेला. त्या दुपारी पाहिला तसा आजिबात चहलपहल नसलेला सुनसान मुहल्ला मी कधीच पाहिला नव्हता.

कोण जमूरा कोण मदारी..

लेखक सेफ्टीपिन यांनी रविवार, 17/05/2020 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
कोण जमूरा कोण मदारी तीन पायांची शर्यत न्यारी कोण जमूरा कोण मदारी बुद्धिबळाच्या या पटावर इथे नांदते घराणेशाही लोकशाही टांगून खुंटीवर प्रजेस बोलायची चोरी लोण्यावरती ठेवूनि डोळा इमानाच्या खोट्या शपथा सरड्यासंही वाटावा हेवा वजीराची तर बातचं न्यारी हत्ती, घोडे आणि उंटही फिरता वारे चाल बदलती मोह-मायेचे हे पुजारी कसली निष्ठा अन कसली भक्ती प्याद्यांची पण कथा निराळी निसुगपणाची दाट काजळी 'संकटाच्या' तव्यावर देखील शेकती स्वार्थाची पोळी कोरड्या घोषणा भाबडी आशा प्रजा बिचारी केविलवाणी सावळ्यासंही गहिवर येई सावळा गोंधळ दरबारी स्वतःभोवती गिरक्या घेत राजा सांगे प्रजेस कहाणी 'मी', 'माझे', 'पूर्वज माझे'
काव्यरस
Taxonomy upgrade extras

HTML आणि CSS कोड वापरून लेखन सादर करणे.

लेखक कंजूस यांनी रविवार, 17/05/2020 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
लेखन सादर करताना ते जरा आकर्षक दिसावे यासाठी हे कोड आहेत. मी काही नेटवरचे लेख वाचून हे जमवले आहेत. करून पाहा. HTML आणि CSS कोड वापरून लेखन सादर करणे.
HTML FORMATTING



अनुक्रमणिका

१ ) गाभा

२ ) परिच्छेदाची पहिली ओळ पुढे सुरू करणे

३ ) रंगीत परिच्छेद

४ ) उभा फोटो आणि बाजूला लेखन

५ ) आडवा फोटो आणि बाजूला लेखन

पाऊस सांजवेळी डोळ्यांत दाटलेला (आनंदकंद वृत्त)

लेखक कौस्तुभ भोसले यांनी रविवार, 17/05/2020 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला, वाराच काळजाच्या, ओघात साठलेला. पाळीव हस्तकांनी, मागून वार केले, त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला. माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले, त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला. प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी, रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला. आभाळ रुक्ष झाले, शोकात चंद्रवेली, झाडांत खोल गेला, अंधार फाटलेला. -कौस्तुभ वृत्त -आनंदकंद

जातं

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 17/05/2020 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस जात्यात पडतो किंवा टाकला जातो. जातं फिरत राहतं निरंतर स्वत:च किंवा नियंत्याकडून. दोन भागांच्या मध्ये तितकीशी जागा नसते ऐसपैस आणि नसते अगदीच कमी सुद्धा. कुणी सहज सामावून जातो किंवा कुणी अडून बसतो. जातं अडत नाही, फिरत राहतं. स्थिरावलेल्यांची सोलतं कातडी आणि हिसकावून घेतं जास्तीची जागा. फटीतली जागा बदलत राहते आणि बदलतात सोबती, सुख-दु:ख दोन्हींतले. जातं तेच राहतं. मार्ग तोच राहतो पण बदलते गती. दिशा एकच असते नेहमी, वळणं ओळखीची नसतात. जात्याला असतात खाचाखोचा घडवलेल्या किंवा घडलेल्या. त्या अवघड जागा आकार देतात जीवनाला चांगला‌ किंवा वाईट, पण‌ नवा.

ब्लूबेरी ,रास्पबेरी ,ब्लॅकबेरी आणि चेरी उलटा केक

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 17/05/2020 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लूबेरी ,रास्पबेरी ,ब्लॅकबेरी आणि चेरी उलटा केक साहित्य: - वरील फळे फ्रोझन किंवा ताजी (फ्रोझन असतील तर ती तशीच वापरावी आधी फ्रीझर मधून बाहेर काढून ठेवू नयेत) १.५ कप - १.५ कप सेल्फ रेझिंग फ्लावर ( किंवा मैदा + बेकिंग सोडा+ बेकिंग पावडर ) - १२० ग्राम लोणी ( कोमट झालेले ) -२ अंडी - ३/४ कप दूध - ३/४ कप कॅस्टर शुगर कृती लोणी आणि कॅस्टर शुगर इलेकट्रीक बिटर ने फेसून घयावीत त्यात अंडी एक एक करून घालावीत .. वेग कमी करून मैदा आणि दूध हळू हळू घालावे ३० सेकंड अजून फेटावे - केक पात्रात खाली बटर पेपर घालून त्यावर थिजलेल्या बेरी पसराव्या आणि त्यावर मैद्याचे मिश्रण पसरावे १८०° अंश से .