Skip to main content

समाज आणि काम

लेखक लेखनवाला यांनी गुरुवार, 28/05/2020 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
वाशी नाकावरच्या मेन रस्त्यावर ती म्हातारी मागच्या दोन दिवसांपासून भीख मागत बसली होती, राहायची चेंबूरला…. म्हातारीचा नवरा वारला बाई जवानीत असताना, एकुलता एक मुलगा मस्त सिंधी कॉलनीजवळच्या सरळ रेषेत असलेल्या म्हाडाच्या ब्लिडिंगच्या शेवटच्या टोकाला लागून पसरलेल्या वीस-पचवीस घराच्या बैठया चाळीपैंकी एका घरात राहतो, एकच रुम त्यात पडदा टाकून किचन आतल्या बाजूला, सलग मोरी, तरी ही म्हातारी इथं अशी रस्त्यावर का? अशी दीनवाणी…. अंगावरचं लुगडं ते तसचं, दोन दिवस झाले….. अंगाला पाणी नव्हतं….

कोविड-19 माझी डायरी

लेखक एक_वात्रट यांनी गुरुवार, 28/05/2020 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
07 मार्च एस. पी. कॉलेजमधे एकत्र शिकलेले आम्ही मित्र आज (ब-याच दिवसांनी) भेटतो. प्रभात रस्त्यावरच्या एका हॉटेलात बसून आम्ही रात्रीचं जेवण घेतो, नंतर सुजाता मस्तानीत मस्तानी हाणतो. (आंबा मस्तानीला तोड नाही!) ब-याच गप्पा होतात, पण मला आठवतं तसं करोनाव्हायरसचा विषय निघत नाही. 13 मार्च आज आम्ही जेवायला बाहेर जायचं ठरवतो. मॉडर्न कॅफे हे आमचं आवडतं हॉटेल आहे. तिथलं व्हेज कटलेट आणि उपवासाची कचोरी आम्हाला विशेष आवडतात. भरपेट जेवण करायचा कुणाचाच मूड नसतो (आणि तसंही त्या पंजाबी जेवणाला आम्ही जाम कंटाळलोय) तेव्हा मॉडर्न कॅफेवर पटकन एकमत होतं. आज हॉटेलात गर्दी नेहेमीपेक्षा कमी दिसते.

।। मातृदशक ।।

लेखक अमोल_००३ यांनी गुरुवार, 28/05/2020 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
आता वंदितो आईसी | जिने धरिले उरासी | जेव्हा आलो जन्मासि | वात्सल्याने || १ || नवमांस गर्भ वाढविला | सोसूनि सर्व यातना-कळा | न जाणो तूज किती वेळा | दुखावले मी || २ || हाती धरोनि चालविले | बोल बोबडे बोलविले | शहाणपण शिकविले | जगण्याप्रती || ३ || कलागुणांचा वारसा | दिला आम्हां छानसा | स्वयें दाखविला आरसा | योग्य वेळी || ४ || निरपेक्षभावे मनासि | दिले अखंड ज्ञानासि | अज्ञानी या मुलासि | शहाणे केले || ५ || जैसी घार पिलांसि | जैसी वेल फुलांसि | तैसे जपले मुलांसि | सावधपणे || ६ || घडल्या चुका जरी हातून | मार्ग दाखविला त्यातून | जेणेंकरुन त्या परतून | न होणे कधी || ७

बायका...

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 27/05/2020 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
काल ते म्हणाले, सगळ्याच बायका तशा असतात. तशा म्हणजे नेमके कशा, म्हणून शोधु लागलो, बायका. पुराणात, प्राचीन ग्रंथात, ऑफिसात, समोर- मागे, इथे तिथे. गुगलवर. अगदी मिपावरही. असतात बायका, हळव्या, खंबीर,धीट आणि तितक्याच कर्तबागरही. बायका असतात, पुरुषां प्रमाणेच. सोशिक, शोषित आणि बंडखोरही काहींनाच जाणवतात, खोल-खोल श्वास, अन् ते शब्द. काहींना नाही इतकाच, फरक असतो त्या, मुक-संवादाचा. बायकात असते एक बाई, अन आईही. बायको- प्रेयसी, मैत्रीण आणि एक मुलगीही. आदिम काळापासून सोबत आणि शिवाय, सुरु असलेल्या बायकांचा समर्थ प्रवास अव्याहतपणे. बायका म्हणजे अस्वस्थ तगमग. लिहिता येत नाही त्यावर कविता, लेख.
काव्यरस

चक्र

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 27/05/2020 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
झुंजूमुंजू आभाळात किती सांडले केशर सोनसळत्या सकाळी निळे झळाळे अंबर तळपत्या माध्यान्हीची वितळती काचधार धूसरशा संध्याकाळी अदृष्टाची हुरहूर नि:शब्दाच्या चाहुलीने जागे रात्र काळीशार प्रहरांच्या रंगी रंगे बिलोरी हे कालचक्र चक्रनेमिक्रम त्याचा अनादि नी निरंतर
काव्यरस

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा) ०१.११.२०१९ बंगलोर ते सेलम

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी मंगळवार, 26/05/2020 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस आठवा) ०१.११.२०१९ बंगलोर ते सेलम बंगलोरच्या सिंदूरी हॉटेल मधून सकाळी सहा वाजता सेलमसाठी सायकल राईड सुरू झाली. कनकपुरा विभागातून मधून बाहेर पडून नाईस हायवे जवळ यायला अर्धा तास लागला. आज सुद्धा नाईस टोल नाक्यावर आम्हाला अडवले. कालचा सीन पुन्हा रिपीट झाला. दिपकने फोनाफोनी सुरू केली आणि दहा मिनिटात रवी साहेबांनी पाठविलेली पोलीस व्हॅन आमच्या मदतीला हजर झाली. या पोलीस व्हॅनचे एस्कॉर्ट घेऊन आम्ही सर्वजण हायवे वरून रुबाबात निघालो. बंगलोरमध्ये असलेल्या दिपकच्या ओळखीमुळेच बंगलोर शहरातून आम्ही सर्व सहजपणे बाहेर पडलो.

तिचा काहीच दोष नसतो..

लेखक चिनार यांनी मंगळवार, 26/05/2020 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेचे दिवस. आठवी-नववीत असेल. "ती तुझ्याकडेच बघते रे" असे शपथेवर सांगणारे मित्र भरपूर होते. नालायकांनी अश्या शपथा घेऊन कितीवेळा स्वतःच्याच म्हातारीचा जीव धोक्यात घातलाय त्याला गणतीच नाही. एक मित्र तर काहीही झालं की गजानन महाराजांची शपथ घ्यायचा. पण ती माझ्याकडे बघायची हे खरं होतं.कारण मी खिडकीजवळ बसायचो. मग खिडकीबाहेर बघण्यासाठी तिला माझ्या दिशेने बघण्याशिवाय पर्याय नव्हता! आता मित्रांनी त्याचे भलते अर्थ काढले ह्यात तिचा आणि गजानन महाराजांचा काहीच दोष नव्हता. आणि ऍक्च्युअली, तिचा कधीच दोष नसतो! तिचा शाळेला,ट्युशनला वगैरे येण्याजाण्याचा रस्ता ठरलेला होता.

आणि अश्या वेळी

लेखक कौस्तुभ भोसले यांनी मंगळवार, 26/05/2020 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अश्या वेळी, चंद्राने लपायला हवं ढगांआड... अन लपेटून घ्यायला हवं आपण, भोवतालचं गुलाबी धुकं... एकमेकांच्या श्वासांमधून उधळायला हवीत, प्रितीची गंधफुले... घट्ट मिटायला हवीत, डोळ्यांची नक्षत्रं... टेकवायला हवेत गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे, ओठ एकमेकांवर... आणि मग पहावं, श्वास रोखले जातात की; हृदय धडधडायचं थांबतं..? -कौस्तुभ

लाल पिवळी ब्रेकिंग न्यूज..

लेखक आजी यांनी मंगळवार, 26/05/2020 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या टीव्हीवर नव्या मालिका प्रक्षेपित होत नाहीत, त्यामुळे सगळेच जण बातम्याच बघतात. बातम्या सगळ्या कोरोनाच्याच असतात. "एक मोठी बातमी येतेय" किंवा लालभडक पार्श्वभूमीवर "ब्रेकिंग न्यूज" असं म्हणत प्रत्येक गावात, जिल्ह्यात,मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात, जगात (कंटाळा आला ना लिस्ट वाचून) रोज किती रुग्ण वाढताहेत, बळी पडताहेत, किती बरे होताहेत, याची आकडेवारी सांगितली जाते. ते महत्वाचं असेल, पण रिपीट रिपीट तेच बघायचा खरंच कंटाळा येतोय हेही खरं. या माध्यमांनीच आपल्याला सतत कुठल्या कुठल्या ब्रेकिंग न्यूज देऊन शेफारून ठेवलंय. आपल्याला आता बातम्यांतही नावीन्य पाहिजे.

आत्तापर्यंत काय केलं?

लेखक मनिष यांनी सोमवार, 25/05/2020 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ मिळालाच आहे अनायसे, तर संपवूया कितीतरी वाचायची राहिलेली पुस्तकं, अर्धवट लिहिलेल्या कविता, काही लेख. असंच खूप काही, मनापासून ठरवलं. धावपळीत रोजच्या, बरंच राहून गेलं. डायरीच्या पानांनी मग हक्काने खडसावलं, आत्तापर्यंत काय केलं? अपूरी स्वप्नं दूरुनच खुणावत राहिली दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली झाडांची पानं गळून गेली, धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली. निष्पर्ण पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला, आत्तापर्यंत काय केलं? ज्यांच्या अंगा-खांद्यांवर खेळलो, त्यांनाच खांदा देऊन आलो. सरणावर थोडा, मीही जळून गेलो. पोरकेपण नि पोक्तपण सोबत राहिले. नकळत अशीच कित्येक वर्
Taxonomy upgrade extras