Skip to main content

गरम आणि ‘ताप’दायक

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 19/10/2020 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
सस्तन प्राणी या वर्गानुसार आपण प्राणिमात्रांत उत्क्रांतीच्या सर्वोच्च पातळीवर आहोत. पृथ्वीवर आपण वेगवेगळ्या खंडांत राहतो. विशिष्ट खंडानुसार आपल्या सभोवतालचे तापमान ऋतूनुसार बदलते असते. कडाक्याच्या थंडीतील उणे ४० C ते भर उन्हाळ्यातील ५२ C हून अधिक, एवढा त्याचा व्यापक पल्ला आहे. आपण बाह्य तापमानाच्या एवढ्या विविधतेने गुरफटलेले असूनही आपल्या शरीराचे तापमान मात्र कायम स्थिर असते. शरीरातील विशिष्ट दमदार यंत्रणेमुळे आपल्याला हे अचंबित करणारे वैशिष्ट्य मिळाले आहे. निरोगी अवस्थेत आपण आपले तापमान सरासरी ३७ C ( ९८.६ F) इतके ठेवतो. विविध आजारांमध्ये हे तापमान वाढते.

इव्हेंट होरायझोन : खूप चांगला भयपट

लेखक साहना यांनी सोमवार, 19/10/2020 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्पेस होरर हा भयपटांचा प्रकार मला विशेष प्रिय आहे. नेहमीच्या भूता खेतांच्या चित्रपटा पेक्षा येथील भय हे वेगळ्या प्रकारचे असते. आवर्जून बघावे असे स्पेस हॉरर चित्रपट अनेक आहेत ह्यांतील एलियन हि सिरीज मला विशेष प्रिय आहे. पण इव्हेंट होरायझोन हा चित्रपट (एलियन सिरीज मधला नसला तरी) खरोखर सुरेख आहे. इव्हेंट होरायझोन हे पृथ्वीवरील एक स्पेस क्राफ्ट दुसऱ्या आकाशगंगेंत पाठवले जाते आणि अचानक गायब होते. सात वर्षांनी सौरमालिकेच्या बाहेर अचानक हे यां प्रकट होते आणि पृथीवर एक सिग्नल पाठवते. ह्या यानाची चौकशी करण्यासाठी एक टीम पाठवली जाते.

नवरात्र बेंगळुरूची - संपूर्ण

लेखक पॉइंट ब्लँक यांनी रविवार, 18/10/2020 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
बंगळुरूला व्हाईटफिल्डमध्ये देवीचं एक मंदिर  आहे -पिलेकाम्मा देवी मंदिर . दरवर्षी  नवरात्री मध्ये  ह्या मंदिरात पिलेकाम्मा (दुर्गा ) आणि चौडेश्वरी  ह्या दोन्ही देवींची  नऊ वेगवेगळ्या स्वरूपात पूजा केली जाते. नऊ दिवस ह्या नऊ स्वरुपाची आरास इथे प्रकाशित करण्याची इच्छा आहे. ( हाच धागा रोज एडिट करता येईल का?

ऑस्कर ग्रोएनिन्ग-ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 17/10/2020 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
ऑस्कर ग्रोएनिन्ग-ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक) Simple, Free Image and File Hosting at MediaFire नुकतीच नेटफ्लिक्स वर The Accountant Of Auschwitz ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)हि डॉक्यूफिल्म पहिली. ज्यांना दुसऱ्या महायुद्धाबद्दल थोडेफार तरी माहिती असते त्यांना ऑश्वित्झ छळ छावणीबद्दल वेगळे सांगायची गरज नसते पण ज्यांना काहीच कल्पना नाही त्यांच्या करता म्हनुन थोडक्यात सांगायचे तर दुसऱ्

नंदादीप

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शनिवार, 17/10/2020 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
नंदादीप..!! सकाळपासून माझी गडबड सुरू होती. आठवेल तशी पूजेची तयारी, हार, माळ, एकेक नेऊन एकत्र ठेवत होते. खरतर देवीची कापसाची वस्त्रं करणं, भिजवलेल्या फुलवाती बघणं, पितळेची मोठी समई उजळून ठेवणं, असं काही ना काहीतरी गेल्या आठवड्यापासून उत्साहानं चालू होतंच. काही मनात आलं, आणि सासूबाईंना विचारायला गेले, की त्या म्हणत,.. गेली पंधरा वर्ष करतेस ना.. काळजी करू नकोस, देवी करून घेईल सगळं...!! यांचा डबा भरून तयार होता. ते ऑफिसला गेले, की लगेच अंघोळीला जायचं, असा विचार मी करत असताना, बेल वाजली. दार उघडलं तर शेजारची प्रिया रडत उभी...!! आत ये. बस इथे. काय झालं ते सांग.. मी म्हणाले.

भाजे लेणी

लेखक गोरगावलेकर यांनी शनिवार, 17/10/2020 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठून दोन्ही मुली ऑफिसला जाण्याच्या आधी डबे तयार केले. शिल्लक राहिलेली भाजी पोळी बांधून घेतली. मोठीला रेल्वे स्टेशनला सोडले. आता दिवसभर विशेष असे काही काम नव्हते. नवऱ्यानेही सुटी घेतली होती. कुठेतरी फिरायला जायचे मनात होते. गाडी लोणावळ्याच्या दिशेने वळवली. वाटेत वरद विनायकाचे दर्शन घेऊया असे वाटल्याने महडला गाडी थांबवली. अजिबात गर्दी नव्हती. पटकन दर्शन झाले.दहा-पंधरा मिनिट सभामंडपात बसलो. मन अतिशय प्रसन्न झाले.

तुझ्यासवे रूजताना...

लेखक हजारो ख्वाईशे ऐसी यांनी शुक्रवार, 16/10/2020 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
तू पाणी द्यावंस अशी माझी अपेक्षा नव्हतीच कधी.. बाहेर फोफावून वाढणाऱ्या मला तू तुझ्या बागेत रूजवलंस तरी आभाळातून पाणी येतं आणि त्यावर वाढत राहणं हेच माझ्या जगात मला ठाऊक होतं त्या आधीहि लाखो वर्ष.. पण तू.... माझं एखादं पान जरी वाळलं तरी कोमेजतेस येता जाता पाहत असतेस मला काही होतंय का उन्हं उतरतात त्या खिडकीतून माझ्याकडे बघत राहतेस माझ्या अंगावर फुलणारी फुलं तुझ्या नजरेत हसू फुलवतात माझ्या पानांवरुन हात फिरवत राहतेस मला जणू वाटतं कोणीतरी बोलतंय माझ्याशी खूप काही सांगावं वाटतं पण नाही सांगू शकत मी मी न्याहाळत राहतो तुला इतकी कशी तू वेडी...

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 15/10/2020 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?