Skip to main content

मकरसंक्रमण!

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 14/01/2008 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मि.पा.वासियांना मकरसंक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा! तीळगूळ घ्या, गोड बोला!

रिमझिम झरती श्रावण धारा

लेखक मानस यांनी सोमवार, 14/01/2008 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बर्‍यांच दिवसांनी हे गीत ऐकलं, एक छान घरगुती मैफल जमली होती. मिपावर नियमीत असणार्‍या 'मुक्तसुनित' ने सुद्धा दोन-तीन सुंदर गीते सादर केली. असो,मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे, हे गीत बरेच जण सदर करताना "झिमझिम झरती श्रावण धारा" असे करतात. नक्की शब्द काय आहेत? मूळ गाणं ऐकल्यावर असं वाटतं की सुमन कल्याणपूर म्हणताना "झिमझिम" म्हणतात. पण मधुकर जोशी ह्यांची कविता "रिमझिम झरती श्रावण धारा" अशीच आहे. तज्ञांनी खुलासा करावा. धन्यवाद मानस

पुरंदर आणि मी

लेखक झकासराव यांनी सोमवार, 14/01/2008 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
चालत्या गाडीतुन फोटो काढलाय शिवाय झूम वापरल होतच त्यामुळे तेवढा छान नाही आलेला. तरिही मनातल लिहाव म्हणून टाकलाय.... कोल्हापुरला जाणं सारखच होतं. अगदि ठरवुन महिन्यातुन एकदा जायचच असही जवळजवळ वर्षभर केल होतं. जाताना नेहमी रात्रीच जायचो. येताना दिवसा येत असे. असच पुण्याला येताना जर झोपलो नाही तर आजुबाजुला बघत बसे खिडकीतुन बाहेर काय दिसत ते.

'मराठी बाण्या'च्या निमित्ताने....१

लेखक माझी दुनिया यांनी सोमवार, 14/01/2008 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
काल 'मराठी बाणा' पहाण्याचा योग आला. योगच म्हणायला हवा. कारण बोरिवलीत आमच्या ठाकरे नाट्यगृहात महीन्यातून ४ ते ५ वेळा हा कार्यक्रम होतो. म्हणजे साधारणत: आठवडयाला एकदा. या कार्यक्रमाच्या ऍडव्हान्स बुकिंगची सूचना २ दिवस आधीपासूनच वृत्तपत्रात झळकायला लागते. हा कार्यक्रम हाऊसफुल्ल जात असल्याने...ऍडव्हान्स बुकिंग सुरू होण्याच्या दिवशी सकाळी ८.३० ला खिडकी उघडल्यावर पहिले आपण असू याची यापुर्वी किमान ८ ते १० वेळा काळजी घेतली तरीही खिडकीवरचा माणूस खिडकी उघडल्या उघडल्या प्रयोग हाऊसफुल्ल असल्याचे सांगतो ?

शिघ्रकविता

लेखक बहुरंगी यांनी सोमवार, 14/01/2008 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेचा रचयीता(शिघ्रकवी) मी नाही, तसेच तो कोण आहे हे देखिल मला माहित नाही. चु.भु.द्या.घ्या. ... मि रानात ............... तु वनात मि वनात ............... तु झाडात मि झाडात ............... तु फ़ांद्यांत मि फ़ांद्यांत ............... तु पानांत मि पानांत ............... तु फ़ुलात मि फ़ुलात ............... तु कळ्यात मि कळ्यांत ............... तु .. . . . . . . . . . . *तु बुचकळ्यात ...* :))))))

आजच्या मुली

लेखक छत्रपति यांनी सोमवार, 14/01/2008 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
इश्श…" म्हणुन मान खाली घालतच नाहित, हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत "नविन ड्रेस का ग?" विचारले तर ह्यांना येतो संशय "नाहि रे जुनाच आहे", म्हणुन बदलतात विषय नकट्या नाकावर लटका राग दिसतच नाही हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत मी घा-या डोळ्यांचे कौतुक करावे मग तिनेही खुदकन हसावे कशाचे काय….आजकाल गालांना खळ्या कशा पडतच नाहि हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत उद्या घोड्यावर होऊन स्वार येईल एक उमदा तरूण होशिल का माझी राणी विचारेल हात हातात घेऊन गोड गॊड स्वप्ने यांना आता पडतच नाही हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत पोर लग्नाची झाली म्हणुन, घरी आई-बाप काळजीत "माझा नवरा मी कधीच शोधलाय" त्या डीक्लअर
Taxonomy upgrade extras

जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं

लेखक सनिल पांगे यांनी रविवार, 13/01/2008 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
कशाला घरं तू नीटनीटकं सजवलं होतं कुंपणा बाहेरचं जग चिखलानं बरबटलं होतं का पाहतेस स्वप्न सुखी संसाराचे कालचं माझं एकीशी नातं जुळलं होतं का निरुत्तर पत्र धाडतो मी त्या पत्यावर तीने तर केव्हांच घर बदललं होतं का स्वातंत्र्याला मी स्वातंत्र म्हणू इथे इवल्याश्या फुलांना कालचं कुणी खुडलं होतं जरा हळू बोल असं साऱ्याने बजावलं मला बजावताना ते किती मोठ्याने किंचाळलं होतं का जिवापार संभाळ केलास माझ्या हृदयाचा कालचं मी माझं शरीर भंगारात काढलं होतं का माझ्यासाठी जमलात तुम्ही स्मशानात वेड्यांनो जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं @सनिल पांगे