'गिंप' सोबत खेळण्याचा एक प्रयत्न.
माझ्याकडे हे जास्वंदीच्या फुलाचे साधारण छायाचित्र होते. फारसे काही आकर्षक वाटत नव्हते. त्याच्यासोबत गिंप वापरून थोडी छेडछाड केली आहे.
कसे वाटते ते कळवावे.
(हे फूल स्वेटर घातलेल्या गणपतीबाप्पाच्या चरणी अर्पण!)
- भटोबा
उणीदुणी वाचा
जगभराची उणीदुणी काढणाऱ्या पत्रकारांची उणीदुणी वाचा येथे
http://www.batmidar.blogspot.com/
" गजरा "
स्वप्नात येऊन माझ्या रंगतो
आणि पापण्यावर भिरभिरतो " गजरा "
माझे गीत घेऊनी ओठात
तुझ्या केसात शिरतो " गजरा "
तुझ्या भावना, तुझे दु:ख
न विचारता मज सांगतो " गजरा "
तुझेच स्वप्न या जीवनात
मला सखे, देतो हा " गजरा "
आकाशातल्या चांदण्यासम
तुझ्या केसात वाटतो " गजरा "
पूजा करावी जशी रतीची
तसा तुज मी वाहतो " गजरा "
आरत प्रीतीची हाक त्यात
म्हणून कसा फुलतो " गजरा "
प्रेमाखातर तुझीयासाठी
म्हणून मी आणतो " गजरा "
तू कळि मोहक जशी फुलाफुला त
तसा तसा, तो खुलतो " गजरा "
तुझाच सुगंध घेऊन सखे,
आसंम ती दरवळतो " गजरा "
पाहती तेव्हा सारेजन तुलाच
माझ्या मनी तव मोहर तो " गजरा "
माझी प्रीत घेऊन कुशीत
केसात तुझ्या श
Taxonomy upgrade extras
मदत
नमस्कार
माझे शि़क्षण बि.कॉम पर्यत झाले आहे
सध्या मी private firm मधे काम करतो आहे
मला External MBA करन्याची इच्छा आहे
पण त्या बद्दल मला काहिच माहिती नाही
कृपया कोनी माहिती देउ शकत असेल तर फार मदत होईल
धन्यवाद
इच्छेच्या पाऊलवाटा
माझी मामेबहिण सुमती कोकणातल्या एका खेड्यात रहाते.ती, तिचा नवरा आणि मुलं घराच्या मागे शेती करतात.घर मोठं आहे आणि मागे मांगर,विहीर आणि गाईबैलांचा गोठापण आहे.एक दिवस मी तिच्या घरी गेलो असताना मला ती तिच्या घराच्या मागच्या परड्यातून गाईगुरं दाखवीत खोल विहिरीची आणि आजूबाजूच्या शेतीची माहिती देत देत आपला अनुभव सांगत होती.एका जागेतून दुसर्या जागेत जाताना लहान लहान पाऊलवाटा झाल्या होत्या.ह्या पाऊलवाटावरून विषय निघाला.
मी तिला विचारलं,
"सुमती प्रत्येक पाऊलवाटांच्या टोकाला तू आखांडे घातले आहेस.हे अटकाव कशासाठी ?"
सुमती खेड्यात रहात असली तरी तिने कॉलेजचं शिक्षण पूरं केलं होतं.काही दिवस ती त्याच कॉलेजात
करकरे व ओम्बळे : वेगळ्या भूमिका
नुकतेच सामनाने एक वादळ उठवले. हेमन्त करकरे यान्च्या पत्नीने असे विधान केले की त्यान्च्या कन्येला (जी लन्डनला रहाते) असे वाटते की कसाबाला फाशी देऊ नये. त्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊ द्या (कशी बुवा?).
याउलट ज्या वीराने आपले बलिदान करून त्या कसाब नामक नराधमाला जिवन्त पकडून दिले तो हुतात्मा तुकाराम ओम्बळे, त्याची कन्या वैशाली हिने ठासून सान्गितले की ज्याने तिच्या वडिलान्ना आणि अनेक निरपराधाना निष्कारण ठार मारले त्या नीचाला गेटवे वर जाहीर फाशी द्या. हीच एक योग्य शिक्षा आहे.
सामनाने करकरे कुटुम्बाशी आपण सहमत नाही असे अत्यन्त सुसन्स्कृतपणे एका अग्रलेखात लिहिले.
सत्यमच्या निमित्याने
एक मर्यादित कंपनी जेवढा नफा कमावते त्याच्या प्रमाणात तिला कर भरावा लागतो आणि तिचे सममूल्यधारक उरलेल्या संपत्तीचे वाटेकरी बनतात. सरकार आणि सममूल्यधारक यांना त्यांचा न्याय्य वाटा द्यावा लागू नये या उद्देशाने कांही स्वार्थी संचालक हिशोबाच्या वहीत लिहिलेल्या आकडेवारीत कंपनीला झालेला नफा कमी दिसेल अशी तरतूद करून नफ्याचा कांही भाग स्वत:च्या घशात घालतात असे यापूर्वी ऐकले होते. पण या राजू महाशयांनी याच्या विपरीत जाऊन कंपनीला न झालेला फायदा झाला असे दाखवले असे दिसते. न झालेल्या नफ्यातून त्यांनी सरकारला कर कसा भरला आणि सममूल्यधारकांना परतावा कसा दिला ? अखेर तसे केल्याने त्यांनी काय साध्य केले असेल?
जिवासवे जन्मे मृत्यू
स्वर्गामधे देवांची वार्षिक सभा व स्नेहसम्मेलन भरले होते. कोट्यवधी देवांनी यंदाच्या सम्मेलनाला उपस्थिती लावली होती. संध्याकाळी नित्याप्रमाणे सौंदर्यावलोकन करायला विविध मार्गिकांतून आज सर्वजण बाहेर पडले होते. गर्दी टाळून यमदेव एकटेच नंदनवनाकडे वळले.
अतिशय सुंदर हवा पडली होती. नंदनवनात अनेक लतापल्लवी, लक्षावधी वल्लरी, रंगीबेरंगी आणि सुगंधी फुले बहरली होती, मोहक सडा पडला होता. सुगंधी वायू वाहात होता. पक्षी सुरेल सुस्वरामधे कूजन करत आनंदात विहरत होते. क्षणभर यमदेवांना परिपूर्ण शांतीचा आस्वाद घेता आला. समाधानाने त्यांचा ऊर भरून आला.
इतक्यात गरुडाचे तिथे आगमन झाले.
मराठी माणूस.. आणि स्टॉक मार्केट.
सत्यम चा घोटाळा... ८५ % फ्री - फॉल.
सेन्सेक्स गोईंग स्टीपर डाऊन...
म्युच्युअल फंडस् किरकोळीत गेलेले...
मराठी माणसाचा टक्का बाजारात जरा कुठे दिसतोय न दिसतोय तोवर एक महाघोटाळा होतोच... मग आपण बाजारातून पळून जाणार का?
शेअर्स चे भाव गडगडतात हे आपलं लाडकं मत... धोका आहेच...
ब्लू चिप.. मेगा-जायंट कॉर्पोरेट अशी चालवली जाते तर विश्वास कुणावर ठेवायचा? असे धोके आपल्याला बाजारा पासून दूर नेतील का?
सत्यम् च्या धक्क्याचा तुमच्या आर्थिक धोरणावर बदल झाला का? आणि कसा?
नसल्यास का झाला नाही?
बिट कन्फ्युज बावत ऑल.
-रेझर
मिसळपाव