Skip to main content

बुचाची फुले..

लेखक पर्नल नेने मराठे यांनी शनिवार, 09/05/2009 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
बुचाची फुले कोणाला महित असल्यास महिती द्या व फोटो टाका. 8> हि फुले मी चिन्चवडला पहिलि होति. दुबइत पण गरुद ब्रिज जवल १ झाड पहिले. पण उतरता नहि आले :SS .

मी......

लेखक उमेश__ यांनी शनिवार, 09/05/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
होत्या तशाच आहे,जखमा मला दिलेल्या दुसराच घाव आता शोधीत चाललो मी दावीत पाठ गेले,सारेच ते बिचारे तलवार हीच माझी रोखीत चाललो मी देईन सूर आता , माझ्याच यातनाना हे शोकगीत माझे गाईत चाललो मी कैदेतल्या सुखाची , का आस मी धरावी दु:खाताही सुखाला शोधीत चाललो मी ज्याच्यासावे निघाली, माझी सुमार स्वप्ने आभास तो सुखाचा शोधीत चाललो मी आहे फितूर स्वप्ने , माझ्या मनातली ही वेड्या मनास माझ्या फसवीत चाललो मी व्हावे अबोल आता , सार्‍याच आसवांनी श्वासात हुन्दक्याना दाबीत चाललो मी
Taxonomy upgrade extras

II बुद्ध वंदना II

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 09/05/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज बुद्धपोर्णिमा , महाकारुणी भगवान गौतमबुद्धांचा जन्मदिवस त्या महान तत्ववेत्त्यास त्रिवार वंदन...!! तणाने नष्ट होते शेत तशी द्वेषाने मानव जात प्रेमानेच प्रेम वाढते हाच अमृतपाथ कामासारखा नाही अग्नि घृणा लक्ष्यविहीन लोभ कारण दु:खाचे करे जीवन अपुले कठीण गौतम म्हणे बा मानवा हो जरासा स्मृतिमान सद् धम्माचे मर्म जाणुनी कर जीवन प्रज्ञा

अस्तित्व

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 08/05/2009 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्याच प्रश्नांना उत्तरे व्यर्थ शोधु नकोस, सगळेच संदर्भ नाकारायचा वेडेपणा करु नकोस्, उमलणारं प्रत्येक फूल हारातच गुंफलं जाईल, असंही नाही. काही धुळीतदेखील मिसळ्तील तो सार्वभौम सूर्यसुध्दा आयुष्याच्या प्रत्येक संध्याकाळी, समुद्रात आत्महत्या करतो, नि:शब्दपणे !!! आयुष्यभर फुले मिळाली, असे भाग्यवान थोडेच!!!!! बहुतेक आपल्यासारखेच, ऊन सावल्यातुन प्रवास करणारे, तू स्वतःला कमळाच्या पानासारखं अलिप्त करुन जगावसं असही नाही, फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवलसं तरी खुप झालं. स्वप्नयोगी

सांज स्वीकारली

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 08/05/2009 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभाती किरण नवे, रात्री चांदण्यांचे दिवे पुसता तू, 'काय हवे?' मीच सांज स्वीकारली! उषा रम्य लावण्याची, निशा धुंद तारुण्याची उदासीन, कारुण्याची, मीच सांज स्वीकारली! उषा भूपाळीचे सूर, निशा अंगाई मधूर मनी जागवी काहूर, मीच सांज स्वीकारली! उषा प्रभूच्या कटाक्षी, निशा मीलनाची साक्षी उभी एकली गवाक्षी, मीच सांज स्वीकारली! उषा किलबिलणारी, निशा दरवळणारी मागे घुटमळणारी, मीच सांज स्वीकारली! उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते, माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली! नको किरण कोवळे, नको चांदणसोहळे माझे आभाळ वेगळे, मीच सांज स्वीकारली!
Taxonomy upgrade extras

(एका वृद्धाचे मनोगत)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 08/05/2009 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
वृद्धांच्या समस्यांचे चित्रण करणारी 'एका वृद्धाचे मनोगत' ही जागु ह्यांची कविता वाचली आणि आमच्या डोळ्यासमोर काही बेरकी म्हातारे तरळले! म्हटलं ताणलेल्या मनाला जरा विसावा देऊयात! ;) 'साठी बुद्धी नाठी' व्रत घेतले आहे कांगाव्याने आजाराच्या भंडावले आहे जेवणापेक्षा चटकमटक पोट भरत आहे सल्ले कुणाला देऊ?

गुलाब

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 08/05/2009 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
या जगात सगळच , बाहेरून सुंदर दिसत प्रत्यक्षात मात्र गुणी ,फारच थोड असत सुंदर आणि गुणी अस , जगात एकच असत ते म्हणजे सुंदर , गुलाबाच फुल असत काट्यावर उभ राहूनही, सतत सारख हसत असत दुसर्‍याच्या आनंदासाठी , खुप खुप फुलत असत निस्वार्थी निरागस अस , मोहक त्याच रूप असत 'प्रेम ' व्यक्त करताना , म्हणुनच ते प्रतिक असत सर्वांमध्ये त्याला , राजाच स्थान असत म्हणुनच डौलात ते , वार्‍यावरती डोलत असत जितक सुंदर जितक मोहक , तितकच ते खट्याळ असत काट्याशिवाय हाताला , सहज अस लाभत नसत देवाच्या देव्हारयात त्याला , मानाच स्थान असत आपल्याजवळ असत तेंव्हा , आपला ते मान राखत एक दिवसाच्या आयुष्यात , खुप काही श