Skip to main content

मी......

लेखक उमेश__ यांनी शनिवार, 09/05/2009 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
होत्या तशाच आहे,जखमा मला दिलेल्या दुसराच घाव आता शोधीत चाललो मी दावीत पाठ गेले,सारेच ते बिचारे तलवार हीच माझी रोखीत चाललो मी देईन सूर आता , माझ्याच यातनाना हे शोकगीत माझे गाईत चाललो मी कैदेतल्या सुखाची , का आस मी धरावी दु:खाताही सुखाला शोधीत चाललो मी ज्याच्यासावे निघाली, माझी सुमार स्वप्ने आभास तो सुखाचा शोधीत चाललो मी आहे फितूर स्वप्ने , माझ्या मनातली ही वेड्या मनास माझ्या फसवीत चाललो मी व्हावे अबोल आता , सार्‍याच आसवांनी श्वासात हुन्दक्याना दाबीत चाललो मी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1108
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

आहे फितूर स्वप्ने , माझ्या मनातली ही वेड्या मनास माझ्या फसवीत चाललो मी व्हावे अबोल आता , सार्‍याच आसवांनी श्वासात हुन्दक्याना दाबीत चाललो मी हे विशेष आवडले.! भावस्पर्शी कविता !!