देशांच्या राजकारणांतील स्त्रीयांचे योगदान
कोरी अॅक्विनो ह्या फिलिपिन्सच्या एकेकाळच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या स्त्रीचे काल निधन झाले. फर्दिनांद मार्कोस ह्या हुकुमशहाची राजवट उलथून टाकून लोकशाही सरकार प्रस्थापित करण्याचे श्रेय (१९८६) ह्या स्त्रीकडे जाते. मार्कोस ह्या जुलुमशहाने १९७२ सालापासून फिलिपीन्समधे अनिर्बंध सत्ता उपभोगली. 'निनो' अॅक्विनो ह्या तरूणाने त्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ ठरला व अॅक्विनोस त्याच्या कुटुंबासह परागंदा व्हावे लागले. १९८३ साली निनो लष्कराच्या देखरेखीखाली देशात परतताच मनिला विमानतळावरच त्याची हत्या करण्यात आली. ह्यामुळे तेथे जनक्षोभ उसळला.
मिसळपाव

