Skip to main content

पाचक व मादक

लेखक सहज यांनी गुरुवार, 26/11/2009 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः सदर लेखात उल्लेखलेल्या चवी या लेखकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत. वाचकांची मते त्यांच्याशी जुळतील असे नाही. तसा आग्रहही नाही. Cheers! ;-) मित्रांनो, एकंदरीत मिपाकरांना मसालेदार खाणे व पिणे आवडते असे दिसते आहे. मसाल्याचा वापर करुन वेगळ्या वेगळ्या प्रकारची मादक द्रव्ये म्हणाले की सर्वप्रथम बेनेडिक्टाइन डोम (Benedictine D.O.M.) हे नाव बर्‍याच जणांना माहीत असेलच. आज माझ्या कपाटातील एका पेयाशी तुमच्याशी भेट करुन देतो. (ह्म्म एक लेखमाला होउ शकेल ;-)) ह्या पाचक व मादक द्रव्याचे नाव आहे "पास्टीस" [Pastis liqueur] हे एक "अ‍ॅपेरिटिफ" (Aperitif ) प्रकारचे पेय आहे.

गुलमोहोर असा

लेखक नेहमी आनंदी यांनी गुरुवार, 26/11/2009 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
लाल टपोऱ्या त्या फुलांचा रंग चटकदार ऐसा शोभतो वाळक्या त्या जंगलामधे गुलमोहोर ऐटीत मिरवतो बहर आला असा फुलांना लाल दहकत्या रंगाला वैशाखात ही दिमाखाने सजत डोलत उभा राहिला बहरला गुलमोहोर तरी प्रिया माझी का येईना वैशाख वणावा अंतरीचा उरातुनी त्याचा दाह जाईना प्रसन्ना जीके

(मदतः- अंगातले बाळस् कसे घालवु?)

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 26/11/2009 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी हुशार आहे. (कोइ शक?) हल्ली अंगातले बाळस् फारच वाढत चाललेले आहे. सारखे काहीतरी करावेसे वाटते. मध्यंतराचा सुद्धा अगदी कंटाळा येतो आहे. क्रिकेट आवडत नाही. सिरियल्स बद्दल पॅथॉलॉजिकल नावड आहे. चॅलेन्स वर जे काही चाललेले आहे त्याने संताप होतो आहे. काय करावे सुचवाल काय?

जय जवान जय किसान !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 26/11/2009 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
२६/११ च्या निमित्ताने.... !!जय जवान जय किसान!!
चला , २६/११ ला एक वर्ष झालं नको त्या आठवणी म्हटलं तरी , जरा रक्त ओघळ्लं हुतात्म्यांच बलिदान अगदीच फुकट नाही गेलं वर्षभरात तसं काहीच नाही घडलं देशात कुठे कुठे थोडफार झालं पण आमच्या बापाच , त्यात काय गेलं...? (बडे बडे शहरोंमे ऐसे छोटे छोटे हादसे होतेही है !

(वार्धक्य)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 26/11/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गिरीश भाउंचं वार्धक्य पाहुन मिपावर काहिजणांना अचानक आलेल्या वार्धक्याबद्दल वाईट वाटलं तरी ते लवक परत तरुण व्हावेत ही संत तात्याबा चरणी प्रार्थना ;) असो.. ************************ ************************ नडलो तुला पिळुन, राजरोस मनुष्या हे तुला विडंबन, आता सोस मनुष्या बुधवारचा अन् शनिवारचा उतारा झाला टंकलेस शब्द किती भरघोस मनुष्या वाचक टवाळ 'बनले', झिंगुन नाचले घातला प्रतिसादांचा ऐसा हैदोस मनुष्या टेकले सगळ्यांनी हात, अन निर्ढावलेही सह्या विडंबयचास, आता नुसतेच +१ मनुष्या आता कुजकेच उरले, मालक ओळखुन आहे सह्यांचे झमेले, झाले रे, ओस मनुष्

(आळस घालवायला) एक कोडे

लेखक सुनील यांनी गुरुवार, 26/11/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - एक आणि दोन. कोडे - एका व्यक्तीस आज एक ढकलपत्र मिळाले ज्यात, ते ढकलपत्र आणखी आठ जणांना पाठवून देण्याबाबत विनंती केली होती. त्या व्यक्तीने दुसर्‍या दिवशी ते ढकलपत्र आपल्या आठ मित्रांस पाठवून दिले. त्या आठही जणांनी, त्यांना मिळाल्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी ते ढकलपत्र आपापल्या आणखी आठ मित्रांना पाठवून दिले. ढकलपत्र मिळालेल्या प्रत्येकाने ते ढकलपत्र दुसर्‍या दिवशी आपल्या आठ मित्रांना पाठवले. कुणालाही ढकलपत्र दुसर्‍यांदा मिळाले नाही.

व्यर्थ न हो बलिदान...

लेखक अभिजा यांनी गुरुवार, 26/11/2009 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
व्यर्थ न हो बलिदान... २६/११ च्या शहीदांना आणि अकारण प्राण गमवाव्या लागणा-या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!

अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन -

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 26/11/2009 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
श्री दत्त ज्योतिष विद्यालय, मुंबई यांच्या विद्यमाने दादर येथे रविवार दि. २४ जानेवारी २०१० रोजी ' ज्योतिष -अध्यात्म व साधना ' या विषयावर एक दिवसाचे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. सदर अधिवेशनामध्ये खालील मान्यवरांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत. १) रामायण व महाभारतकालीन ग्रहस्थिती - डॉ. प. वि. वर्तक २) ज्योतिष व साधना - विद्या वाचस्पती, श्री. आदिनाथ साळवी ३) कर्म सिध्दांत व नियतीचे संकेत - श्री. विजय हजारी ४) ज्योतिष व अंधश्रध्दा निर्मुलन - श्री.

सागरतिरी उसळती लाटा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 26/11/2009 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
सागरतिरी उसळती लाटा सागरतिरी उसळती लाटा भान मजला नाही माझे दु:ख ऐकण्या जवळ तू नाही || ध्रु || बोललीस तू ऐकले मी कधी बोललो मी ऐकले तू कधी बोलण्याऐकण्याला समोर आपण नाही || १ || माझे दु:ख ऐकण्या जवळ तू नाही || ध्रु || आपल्या प्रितीचे दु:ख मनी दाटे खरेच तसे होते का? खोटे मला वाटे मजपाशी फक्त आठवण ती राही || २ || माझे दु:ख ऐकण्या जवळ तू नाही || ध्रु || - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
काव्यरस

(माझाच माज)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 26/11/2009 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
अदितीबै, रंगाशेठ, चेतन यासारख्या यशस्वी विडंबकांच्या पावलावर पाऊल टाकून आमचाही लडखडत पावले टाकण्याचा एक प्रयत्न. चालक उडवे , न थांबे धाग्यांचा पाऊस मार खाऊन लिहीतो त्याला फारच हौस तिची प्रतिक्षा मनास, काही सदस्य फितूर +१ फक्त देती प्रतिक्रियांचा ना येई पूर उगाच-टुकार भिकार कौल पाडीतसे सखा चिकटू नको तू कंपूत नाहीस रे मख्खा मिरवितो 'माझ्या रचना' कोणी नवा हो 'पारवा' प्रतिक्रियेस विडंबून टार्‍या पाडी त्या आडवा धारा उडती हास्याच्या टाके परा 'सल्ला'लेख आयडी सारेच थिजती,सल्ले वाचण्या नाजुक लांब राहूनीया पाही, एकला अलिप्त राहून पाडे बुधवारी काव्य राही पेशव्या हसून पुण्या
काव्यरस