Skip to main content

......आणि मग

लेखक मन यांनी शनिवार, 12/12/2009 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
......आणि मग शुभ कार्याची तुझ्या उडेल लगिन घाई,येइल तुझ्या वसंत आयुष्यी- पहाटपालवी तिच्या अवखळ ,अल्लड, सोनपावलांनी. तिच्या ओल्-स्वभावी बनेल माझी पुत्री. जोडुन नाती ,रचुन नवी प्रेमबंधनं घर बनविल ती प्रेमनिवास. येताच माहेर आल्हाद आठवणी,जोडिल ती -घडवील सासर तशाच साठवणी ..... लागेल लळा,जुळतील मने ,नर्म प्रसन्न दर्शानाची तिच्या सवय होइल . रामप्रहरी दोघांचा सुहास्य दिनारंभ होइल. दिस जातिल, स्वर एक होतिल. सासु-सुनेची स्पर्धा न राहता माय्-लेकिची मेणमउ माया बनेल . चौघांच्या आपला मित्र मैफिली जमतील.

अहो पाव्हनं, अंमळ घ्या विसावा ,

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 12/12/2009 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
सूत्रधार :- सळसळ नागावानी डौलदार चाल हिची झळझळ सोन्यावानी झळकते काया हिची .. खाण रुपाची, नार गुणाची , कुण्या गावची, कुण्या रावाची, कुण्या नावाची, ही नार कोण ... गुलाब मोगरा शेवंतीला , तुझा चेहरा हाय भारी रूप देखणं, चतुर बोलणं , लाखा मधे तू भारी नटी : मी नार लई भारी , गार होती बघणारी माझी कीरत ही न्यारी , माझी प्रीत तुम्हावरी---- अहो पाव्हनं ... अहो पाव्हनं ... अहो पाव्हनं, अंमळ घ्या विसावा , विडा हातून, माझ्या हा घ्यावा .. बघा सांज, ही येई दाटून , हूर हूर, मनात भरून, अश्या वेळी, कशाला दुरावा विडा हातून, माझ्या हा घ्यावा .. शिणगार, माझा हा पहावा, संगतीत , शीण घालवावा, चंद्रापार, म
काव्यरस

मुंबईतील हॉटेलमधील नवीन नियम

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 12/12/2009 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील हॉटेल संघटनेने लागू केलेल्या नव्या नियमापासून ताटात घेतलेले अन्न टाकल्यास पाच रू. दंड आकारण्यात येणार आहे. वाढती महागाई व अन्न धान्याची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे सांगत आहेत. तसेच ग्लासातील वाढलेल्या पाण्याचाही अपव्यव टा़ळण्यात येणार आहे. (स्टार माझावरील बातमी येथे वाचा. व्हिडीयोचा नेमका दुवा मिळाला नाही.

बदक आणि राजहंस

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी शनिवार, 12/12/2009 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
"नको लाजवु बदकास राजहंसा पुरे आता लटकी तुझी प्रशंसा दैवयोगे तू हंस जाहलासी मित्र बदकाला परी विसरलासी लाभली तुजला मान डौलदार मानसात तुझा त्यामुळे विहार रसिकजन ते भाळले मानसाला राजहंसाचा होय बोलबाला." राजहंसाला बदक वदे ऐसे हंसमन ते जाहले हरवलेसे आठवे त्याते बाल्य लोपलेले कुरूपाला तै लोक हासलेले मित्र बदकाला राजहंस बोले "स्मृती बाल्यातिल आठवू नको रे जरी मैत्री दृढ आपुली असे रे भेटता दोघां यातना किती रे! कटू बाल्यावर सोडिले जळासी रसिकजन मी रिझविले मानसासी जाणतो मी, लटकी असे प्रशंसा मानसास्तव पाहती राजहंसा जोवरी माझी डौलदार मान तोवरी माझा मानसात मान लोपता हे सौंदर्य विसरतील बदकरूपाते कोण भाळती

गेले आडवे मांजर!

लेखक मानस६ यांनी शनिवार, 12/12/2009 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेले आडवे मांजर, चुके ठोका काळजाचा, मांजर बी हळू बोले, गेला उंदीर हातचा! आज हाये अमावस्या, वाटे धाक-धुक फार, झाला पोरगा वकील, आली दारावर तार ! कसंनुसं वाटे मले, लेक दारात शिंकली, परं माह्या येड्या मना, तिले सर्दी भाय झाली ! पडे हातातुन खाली , कुंकवाचा ग करंडा, पर धनी आने घरी, भरलेला बैलगाडा! जाता तिघे जन संगे, म्हने कामे बिघडती, पर लेकरु आजारी, संगे माय-बाप जाती ! जीव वरती खालती, विझे देवाचा ह्यो दिवा, कर थोडा त ईचार, आली जोरात ही हवा ! भारी लवे डावा डोळा, काय वाईट आनखी? पर आली दारावर, बगा साईची पालखी ! -मानस६

(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ?

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 12/12/2009 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ? डिस्क्लेमर : या काथ्याकूटात मिपावर असणार्‍या फोटोग्राफरांना व कलादालनात फोटो टाकणार्‍यांना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. या बाबत मागेच मी एका धाग्यात या बद्दल चर्चा करण्याबाबत विचारले होते. साधा फिल्मवरचा फोटो घ्या किंवा आताचे डिजीटल कॅमेरॅवरचे काढलेले फोटो घ्या, फायनल रिझल्ट (फोटो) तुमच्या हातात येईपर्यंत तुम्हाला कोणतेतरी तांत्रीक हत्यार वापरावी लागते किंवा त्या हत्यारांद्वारे केलेली क्रिया वापरावी लागते.

फोटो संपादन

लेखक विनायक रानडे यांनी शनिवार, 12/12/2009 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या जिफ चित्राद्वारे मी प्रतिमा ग्राहकाने - प्रग्रा - कॅमेराने घेतलेल्या छाया चित्राचे कसे संपादन केले ह्याचा एक नमूना.

शनिवारचा ऊतारा.. अजुन एक दुविधा

लेखक हर्षद आनंदी यांनी शनिवार, 12/12/2009 03:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे असं का? ते तसं का? या द्विधा मनस्थितीत, एक कोणीतरी जगत असतो कधी नाक मुरडत, कधी शिव्या घालत, कधी तोडफोड करत, माजोरड्यांविरुद्ध लढत राहतो, उंबर्याची बंधने झुगारुन, समाजाची चौकट ओलांडुन, नवे नवे पायंडे पाडत राहतो कारण.... हाडांच्या काड्या करुन, आयुष्याचे मातेरे करुन लाखोंच्या जगण्याचे मोल चुकविण्यासाठी टाकीचे घाव सोसणं सटवाईने कोरलेलं असत.........
काव्यरस

शनिवारचा उतारा - दुविधा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 12/12/2009 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक फुलपाखरू दुविधेत टाकून गेलं... हे असं का? ते तसं का? या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध धुडगूस करत, विडंबन पाडत रहावं लागतं कंपूविरुद्ध लिहीताना, आणिबाणीची बंधनं झुगारून, शुद्धलेखनाची चौकट ओलांडून पुढची लाईन पाडावीच लागते, कारण.... कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं............
काव्यरस