Skip to main content

गेले आडवे मांजर!

गेले आडवे मांजर!

Published on 12/12/2009 - 14:35 प्रकाशित मुखपृष्ठ
गेले आडवे मांजर, चुके ठोका काळजाचा, मांजर बी हळू बोले, गेला उंदीर हातचा! आज हाये अमावस्या, वाटे धाक-धुक फार, झाला पोरगा वकील, आली दारावर तार ! कसंनुसं वाटे मले, लेक दारात शिंकली, परं माह्या येड्या मना, तिले सर्दी भाय झाली ! पडे हातातुन खाली , कुंकवाचा ग करंडा, पर धनी आने घरी, भरलेला बैलगाडा! जाता तिघे जन संगे, म्हने कामे बिघडती, पर लेकरु आजारी, संगे माय-बाप जाती ! जीव वरती खालती, विझे देवाचा ह्यो दिवा, कर थोडा त ईचार, आली जोरात ही हवा ! भारी लवे डावा डोळा, काय वाईट आनखी? पर आली दारावर, बगा साईची पालखी ! -मानस६
लेखनविषय:

याद्या 1519
प्रतिक्रिया 2

छान. आवडली. आपला, (बोकोबा) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई