('वाढ'दिवस)
हा वाढदिवस वाचून आम्हाला आमचा प्रत्येक 'वाढदिवस' आठवला! :D
हे रोजचेच फुगणे, बघण्यात वेळ गेला
गजरास भर पहाटे कळण्यात वेळ गेला
पळलो किती किती मी, वळलो किती किती मी
ढळल्या न वळकट्या ह्या जपण्यात वेळ गेला
अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना
सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला
अजमावुनी बळाला वजनास उचलताना
घटलो असा किती मी? कळण्यात वेळ गेला
"रंग्यास" वाढदिवशी ये भान वाढल्याचे
पोटामुळेच काटा दिसण्यात वेळ गेला!!
चतुरंग
काव्यरस
मिसळपाव
