तुझ्या विना ...
क्षण एक हा जरासे आज हसून घेईन म्हणतो
हसता हसता नकळत थोडे, रडून घेईन म्हणतो...!
सुख-दु:खाच्या फूटपट्टीचे निकष लावुनी आयुष्या
सरणावर जाण्यापूर्वी, थोडे जगून घेईन म्हणतो...!
आयुष्याच्या या रंगपटावर खोटे खोटे जगताना
फसवुनी सत्यास, स्वप्नात रंगून घेईन म्हणतो...!
गेले ते दिन गेले सये तव सहवासाचे सोनसळी
साजिरे तव सहवासाचे, क्षण गुंफून घेईन म्हणतो...!
हा प्रवास युगा युगांचा तुजवीण नको नकोसा
तव आठवणींना सार्या, संगे बांधून घेईन म्हणतो...!
विशाल.
लेखनविषय:
याद्या
2885
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
व्वा...
धन्स रे
गेले ते
मस्त...!
In reply to गेले ते by फ्रॅक्चर बंड्या
+१
In reply to मस्त...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान...!
छान...!
धन्यवाद...
सुंदर!! खूप
प्राजुतै....
वि. कु. मस्त
सुंदर कविता
विषाल
आभारी आहे.