घ्या..... केळी..........
मराठी भाषेत बरेचदा शब्दार्थामुळे काय च्या काय अनर्थ होतात.
पण केवळ एखादा शब्दार्थ संप मोडून काढू शकतो हा अनुभव मात्र न भूतो भविष्यति.
सामान्यतः एखाद्याला नारळ देणे या वाक्प्रचाराचा अर्थ निरोप देणे काढून टाकणे असा होतो.
हात हलवत जाणे म्हणजे रिकाम्या हाताने परत येणे/पाठवणे असा होतो.
वाटाण्याच्या अक्षता कोणी पाहिल्यात कोण जाणे पण मराठी भाषेत त्या बरेच महत्वाचे स्थान मिळवुन आहेत.
नारळ ,वाटाणे, चणे ,अक्षता, हळद फुटाणे वगैरे कठीण पदार्थ सुद्धा वाक्प्रचारात आले की अनर्थ घडवतात.
मिरच्या या वाक्प्रचारातही तिखटपणा सोडत नाहीत. फक्त त्या तोंडाऐवजी नाकाला झोंबतात.
केळे हे फळ तसे निरुपद्रवी फळ गरीबांचे अन्न वगैरे वगैरे. असे फळ काही करु शकेल हे अशक्य . पण त्याने एकदा एक संप पूर्ण मोडून टाकला होता.
सातार्यात एकदा एम एस ई बी चा संप सुरु होता. काहितरी स्थानीक भानगड होती. पण चिघळली असती तर ती राज्य पातळीवर पसरली असती.
सातार्याच्या राजवाडा चौकातले एम एस ई बी चे ऑफीस हे त्या घडामोडींचे केंद्रस्थान होते.
राजवाडा चौक गावातले मध्यवर्ती ठीकाण सात आअठ रस्ते येथे एकत्र येतात आणि सर्वत्र पसरतात. फळ बाजार ,एस टी बसस्टॅन्ड, रीक्षास्टॅन्ड , नगर वाचनालय , शाळा, चित्रपटगृह, हॉटेले, राजकीय सभेसाठीचे गांधी मैदान.... सगळे काही इथेच. त्यामुळे नेहमीच एक गर्दीचे ठीकाण . आसपासच्या गावातू येणार्या जाणार्या लोकाना उतरण्याचे एक महत्वाचे ठीकाण. फेरीवाले,फळाच्या गाड्या यांच्यासाठी तर हा नेहमीचा धंद्याच्या अड्डा. आरडाओरडा करून गिर्हाईकाना बोलावणे हे नित्याचेच.
त्या दिवशी वातावरण तंग होते. एका कागाराला अपघात झाला , सरकारने त्याला काढून टाकले ...की काहीसे असेच कारण होते
सगळे अभियंते , कामगार ऑफीसच्या दारात उभे होते. संपाला सुरुवात करायचा मुहूर्त जवळ येत चालला होता.
उपोषणाला बसणार्या मंडळींचे वैद्यकीय चेक अप नुकतेच संपले होते. प्रमुख पाहुण्यानी नारळ फोडला. टाळ्या वाजल्या. कामगारानी/ अभियंत्यानी घोषणा दिल्या . आमच्या मागण्या मान्य करा. ...... कोन म्हणतो देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही.....
वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी फटाफटा फ्लॅश मारु लागले. हारतुरे वगैरे वाटले गेले.....
समारंभ पार पडला. फोटोत येणारे नेहमीचे यशस्वी आज फोटो झाल्यावर पांगले नाहीत. खूपच महत्वाचे कारण होते संपाचे. घोषणा ऐकून गर्दी जमा होऊ लागली.
बघ्यांची गर्दी जमा झाली तसा घोषणावाल्याना चेव चढला. ते मोठमोठ्याने घोषणा देऊ लागले.
अमूक तमूक की ........जय....... अमूक तमूक कामगार संघाचा ........विजय असो.....
जय ...विजय असो म्हणणारे सुद्धा; बघे आहेत श्रोते आहेत हे पाहुन उत्साहाने घोषणादेउ लागले.
आमच्या मागण्या मान्य करा....... एका अभियंत्याने हात उंचावून मुठी वळून बेंबीच्या देठापासून घोषणा दिली.
घोषणेला काही उत्तर येण्या अगोदरच एका कोपर्यातून आवाज आला ...." घ्या ...केळी..." गर्दी शेजारीच उभ्या असलेला एक केळी विक्रेता ओरडला.
गर्दी हसली...घोषणा देणारा चपापला..त्याने इकडे तिकडे पाहिले. थोडेसे ओशाळून त्याने पुन्हा एकदा घोषणा दिली
"आमच्या मागण्या मान्य करा....."
"घा केळी...." आता कोरस मध्ये आवाज आला.... नक्की काय गंमत झाली असावी हे कळल्यामुळे इतर केळी विक्रेत्यानी त्या केळी विक्रेत्याच्या आवाजात आपला आवाज मिसळला होता .
अभियंत्याने पुन्हा एकदा घोषणा दिली....आमच्या मागण्या मान्य करा........
घ्या केळी.........
आमच्या मागण्या मान्य करा....
घ्या केळी.....
आमच्या मागण्या मान्य करा....
घ्या केळी.....
आमच्या मागण्या मान्य करा.... हे वाक्य आले की लेगेचच उत्तर यायचे
घ्या केळी.....
गर्दी या घोषणा युद्धाची मजा लुटत होती.
लोक पोटधरून हसत होते. आणि संपकरणारे वैतागले होते.
थोड्या वेळ हे घोषणायुद्ध चालूच राहिले.
आमच्या मागण्या मान्य करा..............याला समर्पक उत्तर मिळत होते...घ्या केळी....
आता तर जमलेली गर्दीच ओरडत होती
आमच्या मागण्या मान्य करा..............घ्या केळी....
या गडबडीत उपोषण करणारे वैतागले . त्यातल्या एकाने चिडून केळेवाल्याच्या गाड्यावरून केळ्याचा घड उचलला आणि सहकार्यात वाटून टाकला....
या सगळ्या गोंधळात संप / उपोषण सगळेच विसरले......
एका संपाचा मॅनेजमेंटच्या प्रयत्नाशिवाय बीमोड झाला होता.....
याद्या
6879
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
कुठल्या काळातली ?
घ्या
विजुभाऊ::::::::
घ्या केळी
श्री रा रा
कोळंबी
In reply to श्री रा रा by अवलिया
विजुभौ .....
चुचु
हं घ्या केळी
In reply to चुचु by पर्नल नेने मराठे
(विषय दिलेला नाही)
थन्क्स
In reply to (विषय दिलेला नाही) by माधुरी दिक्षित
केळ्याने
हा किस्सा
In reply to केळ्याने by टुकुल
वा, संपाचं विडंबन आवडलं!! ;)
हा हा हा
In reply to वा, संपाचं विडंबन आवडलं!! ;) by चतुरंग
घ्या बनाना
घ्या घंटा.........
मस्त च ....