Skip to main content

स्वर-गंध - कॅनडा

लेखक सुमीत भातखंडे यांनी रविवार, 14/02/2010 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, आज यूट्यूबवर फिरता-फिरता काही व्हिडिओज सापडले. २००८ मधे टोरँटो येथे झालेल्या स्वर-गंध या कार्यक्रमाचे हे काही विडिओज आहेत. १) समिधा जोगळेकर - युवती मना http://www.youtube.com/watch?v=h4G12bXuS8o&feature=PlayList&p=838ED0E1D… २) रवि दातार - श्रीरंगा कमलाकांता http://www.youtube.com/watch?v=0CLjVMU_m4k&feature=related अजूनही काही लिंक्स आहेत.

माध्यमांनो असे हताश होऊ नका.....

लेखक अभिज्ञ यांनी शनिवार, 13/02/2010 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
निखील वागळे,राजीव खांडेकर,राजदीप सरदेसाई ह्यांच्या सह सागरीका घोष व अभिग्यान प्रकाश ह्या सर्वच मंडळींना जाहीर विनंती कि त्यांनी कृपया करून पुणे बॊम्बस्फ़ोट वगैरे सारख्या दुय्यम घटनांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करावे व MNIK , मराठी माणसाची निंदानालस्ती करणारे टॉक शोज, शिवसेनेच्या नावाने बोम्बाबोम्ब, छा गये राहुल यांसारखे महत्वाचे कार्यक्र्म दाखविण्याची त्वरीत व्यवस्था करावी. देशाच्या द्रृष्टीने ते सर्वात महत्वाचे विषय आहेत हे ध्यानात असावे म्हणजे झाले व त्याहि पेक्षा महत्वाचे म्हणजे आपली टी आर पी आहे हे फ़क्त विसरू नका.

कडकलक्ष्मी

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 13/02/2010 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
ढोलकी गळ्यात नि डोक्यावर देव्हारा आधार नसुनही सावरते डोलारा विटलेले हिरवे लुगडे, मळवट भाळी, अंगात खणाची ठिगळांची काचोळी काखेत पिरपिरे एक, एक धरि हाती, अन् अंश आणखी एक उपाशी पोटी सावळ्या मुखावर गर्भतेज सुकलेले, ओढीत चालते माय पाय थकलेले पदपथी सावली हेरुन बसली खाली, टेकले देव, पोरांना खाऊ घाली तो तिचा सोबती, राकट, कभिन्न काळा हळदीचा मळवट, टिळा तांबडा भाळा कमरेस झोळणा चिंध्यांचा कसलेला, केसांचा बुचडा मानेवर रुळलेला चाबूक वाजवी, गळा कवडिची माळ, अनवाणी पायी छमछमणारे चाळ दगडांचा मांडुन खेळ चिमुरडी रमली, लक्ष्मीच्या हाती तशी ढोलकी घुमली हातीचा चाबुक पुजुन सज्ज तो झाला, घातले साकडे, कौल लावि देवाला हा
काव्यरस

पुण्यात बाँबस्फोट

लेखक बाबुराव यांनी शनिवार, 13/02/2010 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात कोरेगाव पार्क मधे असलेल्या जर्मन बेकरी मधे स्फोट होवून दहा लोक मरण पावल्याची आन अनेक जखमी झाल्याची बातमी हाय. काय खबर ?

अभुतपूर्व संकट!

लेखक फास्टरफेणे यांनी शनिवार, 13/02/2010 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
भारत नावाचं एक राज्य होतं...तिथं इटलीराणी राज्य करीत होती...तिच्या राज्यात एक महाराष्ट्र नावाचा प्रांत होता. त्या प्रांतातले सगळे सरदार इमानदार होते. एकही जण राणीच्या शब्दाबाहेर नव्हता. राजधानीतून बोलावणं आलं कि सगळे सरदार चळ्चळ कापायचे. राणीचा दराराच असा होता! ते सरदार इतके इमानदार होते कि राजपुत्राचे जोडेसुद्धा ते डोक्यावर घ्यायचे! भारत राज्यात सगळं कसं आलबेल चाललं होतं. महाराष्ट्र प्रांतात एक खान रहायचा. या खानाचं काम म्हणजे भारत राज्याच्या नागरिकांना "जीवनावश्यक" चित्रपटरस पुरवायचा. एकही आठवडा असा गेला नाही कि भारताच्या नागरिकांनी चित्रपटरस पिला नाही.

शिव-वडा

लेखक पॅपिलॉन यांनी शनिवार, 13/02/2010 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
राहुल आला अन् टोपी घालून गेला! खान आला अन् टपली मारून गेला!! ढाण्या वाघाचा पार शिव-वडा झाला!!!
काव्यरस

रेशीमगाठी..

लेखक राधा१ यांनी शनिवार, 13/02/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रसन्न सकाळ... सगळे रोजच्या सारखेच सुरु होते. धडधड...रोजचेच स्टेशन..रोजचीच गाडी...वेळ एकदम सकाळची म्हणुन फारशी गर्दी नाहीच.. लेडीजचा पहिला दर्जाचा डबा..एक रोजचा ग्रुप दारात गप्पा मारत उभा आहे... बाजुच्या जेन्ट्सच्या डब्याच्या दारात दोन मुलं निसर्ग सौंदर्य (???) बघत इकडे तिकडे बघत उभे आहेत. एका मुलाच लक्ष सहज(?) मुलींच्या डब्याकडे जातं..आणि एका मुली बरोबर नजरानजर होते. आणि मग येथे सुरू होतो...

माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..३ (आठवणींतले वसंतराव)

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 13/02/2010 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..१ माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..२ आठवणीतले वसंतराव! १) कुमारांसोबत..दोघंही अगदी तरूण दिसताहेत.. २) गोरेगावमधली कुठलीशी मैफल..

काही जुनी टिपणे.

लेखक रामदास यांनी शनिवार, 13/02/2010 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
आता, आपण मोठं होऊ या. तू जा घरी. मला वाळवणं घालायची आहेत. मग, माझा उभा जन्म उन्हातच. --------------------------- माझं इवलंस मन घे तुझ्याकडे ठेवून. बाकी सगळं लागेल मला उरलेल्या आयुष्यासाठी. ----------------------- तू जा रे माघारी नको भेटूस रे वेळी अवेळी. बोभाटा होतो पाय घसरल्याचा. मग ? मग ? स्सालं ... आख्खं आयुष्य स्किड झालं जळल्या रबराचा वास न येता. ---------------------- हॅपी व्हॅलेंटाईन डे.

मॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 13/02/2010 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास. त्यांचे अनुभव दुसऱ्या दिवशी ऐकून हे जाणवले की, हे शहरी लोक नुसता हौशी उत्साह न दाखवता शर्यत पुर्ण करु शकले हा काही योगायोग नव्हे. शहरातील आजचे जगणे पाहता - त्यात रोज बाहेरील खाणे आले, कामाचा व इतर सगळा ताण आला, रोजचा प्रवास, ह्याची गोळाबेरीज केली तर शहरी लोकांची शारीरीक क्षमता कशी टिकून राहील असा प्रश्न पडेल.