भारत नावाचं एक राज्य होतं...तिथं इटलीराणी राज्य करीत होती...तिच्या राज्यात एक महाराष्ट्र नावाचा प्रांत होता. त्या प्रांतातले सगळे सरदार इमानदार होते. एकही जण राणीच्या शब्दाबाहेर नव्हता. राजधानीतून बोलावणं आलं कि सगळे सरदार चळ्चळ कापायचे. राणीचा दराराच असा होता! ते सरदार इतके इमानदार होते कि राजपुत्राचे जोडेसुद्धा ते डोक्यावर घ्यायचे! भारत राज्यात सगळं कसं आलबेल चाललं होतं.
महाराष्ट्र प्रांतात एक खान रहायचा. या खानाचं काम म्हणजे भारत राज्याच्या नागरिकांना "जीवनावश्यक" चित्रपटरस पुरवायचा. एकही आठवडा असा गेला नाही कि भारताच्या नागरिकांनी चित्रपटरस पिला नाही. एकदा मात्र एका टोळक्यानं बंड पुकारलं आणि खानाची वाट अडवली. नागरिक चित्रपटरसाची आतुरतेने वाट बघत होते. महाराष्ट्र प्रांताचा प्रमुख चिंताग्रस्त झाला. काहीही झालं तरी नागरिकांना त्यांच्या जीवनावश्यक गरजा पुरवल्याच पाहिजेत आणि त्या टोळक्याचा कायमचा बंदोबस्त केलाच पाहिजे असा पण त्यानं केला. (हा पण करण्याचं एकमेव कारण - इटलीराणीसमोर "मला नागरिकांची काळजी आहे" हे दाखवणं). त्यानं खानाला सैनिकी बंदोबस्त दिला. खानही सुखावला. नागरिकांनी जल्लोष केला आणि चित्रपटरस पिण्यासाठी अभुतपूर्व गर्दी केली.
सगळ्या "नारदांच्याही" तोंडी हीच बातमी होती...
तर अशा या महाराष्ट्र प्रांतप्रमुखाने नागरिकांच्या प्राणावरचे संकट मोठ्या धीराने टाळले!
वाचने
2007
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
लघुकथा
अरे ! इतके
सुंदर जोडे
त्रागा
खुप