गुडबाय एट हंड्रेड..
युरो ४ वा भारत ४ मानक पूर्ण करू शकत नसल्याने मारूती ८०० हे मॉडेल भारतातील प्रमूख शहरांतून बंद
करण्यात आले आहे. लवकरच तिची निर्मितीही थांबवण्यात येईल असे मला वाटते.
१९८४ पासून अतिशय लोकप्रिय असलेल्या ह्या गाडीचा प्रवास आता थांबत आहे. भारतातील चार-चाकी वाहनविश्वात
क्रांतीचा अग्रदूत असलेली ही कार एकेकाळी अनेक लोकांची ड्रीम्-कार होती. त्याअगोदर सर्वसामान्यांना उपलब्ध असलेल्या गाड्या म्हणजे
प्रिमियर पद्मिनी, अॅम्बॅसिडर, कॉन्टेसा व जीप.
मिसळपाव