Skip to main content

मला पुरते कळले....

लेखक झुम्बर यांनी मंगळवार, 20/04/2010 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे ९ वाजता कसेबसे डोळे उघडले आणि घाबरत घाबरत मी बाथरूम गाठले मातृदेवातेची बडबड चिडचिड नेहमीसारखी आज कानावर माझ्या कशी ती पडलीच नाही उशिरा उठूनही कोणी माझ्यावर तोफ डागली नाही टेबला वरती आई ने पोहे काढून होते ठेवले कसेबसे कोंबून तोंडी धावत पळत कॉलेज गाठले प्रवेश द्वारी पाहुनिया सरांची रागीट स्वारी परत मुकाट्याने फिरवली मी माझी बापुडी सवारी थेट मग मी लाडक्या fashion street वरी शिरले मनसोक्त कपड्यांच्या खरेदीत बुडुनी गेले गम्मत अशी घडली की मला सगळे फुकट मिळाले कारण अस्तित्व माझे कुणाच्याही खिजगणितही नवते नंतर मग मलाच माझी भीती वाटू लागली आणि मग आईची मऊ कुशी मला आठवली वाटल
काव्यरस

कोडे प्राणायमाचे

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 20/04/2010 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
काही काही कोडी सुटायला अनेक वर्षे जावी लागतात. मला एक खोड आहे ती अशी की एखादा उपचार किंवा एखादे औषध कसे काम करते हे जोपर्यंत कळत नाही तो पर्यंत मी बेचैन असतो. त्यामुळे न बोलणार्‍या किंवा कमी बोलणार्‍या डॉक्टरांबरोबर माझे जुळत नाही. प्राणायमाच्या उपयुक्ततेबद्द्ल पण माझे असेच काहीसे झाले होते. प्राणायमाची महती लहानपणापासून अनेक वर्षे कानावर ऐकू येत आहे. अनेक योगी आणि देशी विदेशी डॉक्टर प्राणायमाचे महत्त्व गाताना ऐकले आहेत. हृद्रोग निवारणासाठी प्रसिद्ध असलेला अमेरीकन डॉक्टर डीन ऑर्निश देखिल प्राणायमाचा पुरस्कार करताना आढळतो.

आभाळ फुटलं !! (Cloud Burst)

लेखक जयवी यांनी मंगळवार, 20/04/2010 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
“आभाळ फुटणं” म्हणजे काय हे आम्ही त्या दिवशी अनुभवलं. आतापर्यंत हा एक फक्त वाक्प्रचार म्हणूनच ऐकला होता. पण त्या दिवशी त्याचा तो भयंकर अर्थ कळला. १७ एप्रिल ! सकाळ नेहेमीसारखीच उगवली. आमची सकाळ ६ वाजता सुरु झाली. पिल्लू क्रिकेट कोचिंगला जायला निघालं. त्याची तयारी झाली……..आणि मी कामं आटपायला सुरवात केली कारण आज हे सेऊलहून येणार होते. Emirates ची फ्लाइट होती. दुबईला थांबून मग इथे कुवेतला ८.२५ ला पोचणार होती. मी त्यांना घ्यायला साधारण सव्वा आठला निघणार होते. आठ वाजले. मी देवाजवळ दिवा लावला. मी दिवा लावला तेव्हा सकाळचा प्रकाश होता.

(भांडणशब्द २)

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 20/04/2010 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा शुचि यांची सुंदर कविता चांदणशब्द, व नामप्रेरणा ३_१४_अदिती यांची (न कळलेली) भांडणशब्द. शुचिंच्या शृंगारिक कवितेचं समाजात दिसणाऱ्या झुंडशाहीच्या संदर्भातल्या कवितेत रूपांतर करायला मजा आली. भांडणशब्द प्रक्षुब्ध वाणी॥१॥ नग्न प्रतीके ठायीठायी॥२॥ स्नायुप्रतापी टवाळभाषा॥३॥ गरम माथा केविल चडफड॥४॥ शब्द प्रसूती हीन व हिणकस॥५॥ उसना आवेश व्यर्थ हि धडपड॥६॥ कोण त्रुटीचे कांपेन्सेशन?॥७॥ 'सही' विडंबना- सही विटंबन||८||
काव्यरस

मागणं

लेखक चिर्कुट यांनी मंगळवार, 20/04/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम कर माझ्यावर किंवा माझा द्वेष कर मागणं मात्र एक मान्य कर जे करशील ते मनापासून कर तुझ्या प्रेमाने मला मढव आणि प्रीतिने जडव अथवा रस्त्यात अडव आणि सँडलने तुझ्या बडव कॄपा मात्र एक माझ्यावर कर जे करशील ते मनापासून कर हात तुझा दे माझ्या हातात अथवा दे श्रीमुखात आयुष्यात दे मला साथ अथवा पेकाटात घाल लाथ धन्य होईल प्रेम माझं ऐकलंस तू जर जे करशील ते मनापासून कर
काव्यरस

लक्षद्वीप फिरायला जाण्यासाठी मार्गदर्शन पाहिजे....

लेखक श्रीराजे यांनी मंगळवार, 20/04/2010 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो..! मला लक्षद्वीप फिरायला जाण्यासाठी माहिती हवी आहे.. जरी कोणाला याबद्दल माहिती असेल तर मार्गदर्शन करावे.... धन्यावाद..!

(भांडणशब्द)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 20/04/2010 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द आणि सत्तांतर भांडणशब्द थंडावलेला॥१॥ भग्न प्रतिसाद काहीबाही॥२॥ क्षयाधिकार मवाळभाषा॥३॥ गरम माथा अखेर फडफड॥४॥ दीर्घ बतावणी हलकल्लोळ॥५॥ बधीर आवेश ओहोटी संचय॥६॥ विकल भ्रांत चिंताक्लांत॥७॥
काव्यरस

राम...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 20/04/2010 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
अताशा मनाच्या पसार्‍यात राम नाही, बहाणे मनाचे…, दिलाशात राम नाही ! सुखाचे जरी हे पुरावे हजार हाती, मनाला कसा तो भुलाव्यात राम नाही ! इशारे फुलांचे…., अता भूलणार नाही, फुलांच्या मनी राहिला आज राम नाही ! कशाला हवे चंद्र.., तार्‍यांचे चांदणेही, अता चांदण्यांच्या लकाकीत राम नाही ! हसावे, रडावे, मना त्यात गुंतवावे, उसासे फुकाचे.., खुलाशांत राम नाही ! विशाल.

कारणे....!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 20/04/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
वाहणे खांद्यावरी ते, गर्भ …. कोवळ्या वासनांचे, रक्ताळलेल्या जाणीवा अन.. व्याकूळता ओल्या स्पंदनांची ! पेलणे ओझे सदाचे, माथ्यावरी संवेदनांचे.. गुंजती रंध्रात सार्‍या, गुढगर्भित कंपने… तृषार्त मुक्या शब्दांची ! सोसणे नकोसे अताशा, पराभव वेदनांचे… लढतो आहे जीव कधीचा, लढाई आपुल्याच… जिर्ण ओल्या जखमांची ! प्रश्न..प्रश्न ?; उत्तर नाही.., शोधणे नेहमीचे… शोधतो आहे आरंभापासुन कारणे … माझ्याच पराभवाची ! विशाल.

वंगणबद्ध

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 20/04/2010 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द वंगणबद्ध ही सकाळ इसबगोल थॅन्क्स हिरव्या मिरच्या गरम मसाला दीर्घपार्ट्या अ‍ॅसिडीटी गरम घशाशी गुरगुर जरा तरी बाटली बूचबंद किंचित कळ बंद दार सुलभ सुलभ अतिआनंद