Skip to main content

राम...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 20/04/2010 10:07 या दिवशी प्रकाशित केले.

अताशा मनाच्या पसार्‍यात राम नाही,
बहाणे मनाचे…, दिलाशात राम नाही !

सुखाचे जरी हे पुरावे हजार हाती,
मनाला कसा तो भुलाव्यात राम नाही !

इशारे फुलांचे…., अता भूलणार नाही,
फुलांच्या मनी राहिला आज राम नाही !

कशाला हवे चंद्र.., तार्‍यांचे चांदणेही,
अता चांदण्यांच्या लकाकीत राम नाही !

हसावे, रडावे, मना त्यात गुंतवावे,
उसासे फुकाचे.., खुलाशांत राम नाही !

विशाल.

लेखनविषय:

वाचने 1460
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

" इशारे फुलांचे…., अता भूलणार नाही,
फुलांच्या मनी राहिला आज राम नाही ! "
व्वा ! मजा आली ! ! ! मस्तच ! ! !