Skip to main content

कारणे....!

कारणे....!

Published on मंगळवार, 20/04/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
वाहणे खांद्यावरी ते, गर्भ …. कोवळ्या वासनांचे, रक्ताळलेल्या जाणीवा अन.. व्याकूळता ओल्या स्पंदनांची ! पेलणे ओझे सदाचे, माथ्यावरी संवेदनांचे.. गुंजती रंध्रात सार्‍या, गुढगर्भित कंपने… तृषार्त मुक्या शब्दांची ! सोसणे नकोसे अताशा, पराभव वेदनांचे… लढतो आहे जीव कधीचा, लढाई आपुल्याच… जिर्ण ओल्या जखमांची ! प्रश्न..प्रश्न ?; उत्तर नाही.., शोधणे नेहमीचे… शोधतो आहे आरंभापासुन कारणे … माझ्याच पराभवाची ! विशाल.
लेखनविषय:

याद्या 1606
प्रतिक्रिया 7

शोधतो आहे आरंभापासुन कारणे … माझ्याच पराभवाची ! छान आहे ... binarybandya™

एक वेगळीच ... परंतु हळवी कविता :) - पाडेश काव्यहळवी

शोधतो आहे आरंभापासुन कारणे … माझ्याच पराभवाची ! - --------------------------------- आता लंगडं हो, कस उडुन मारतय तंगडं. //भावश्या\\

पेलणे ओझे सदाचे, माथ्यावरी संवेदनांचे.. गुंजती रंध्रात सार्‍या, गुढगर्भित कंपने… तृषार्त मुक्या शब्दांची ! छान आहे कविता... आवडली !

खानोलकर touch आहे कवितेला.>>>> नाही हो, मी खुप छोटा आणि तोकडा माणुस आहे. धन्यवाद ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"