Skip to main content

लढाऊ विमाने - मिग-२१

लेखक निनाद यांनी गुरुवार, 19/05/2011 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
लढाऊ विमाने यावर मराठीमध्ये फारशी माहिती दिसत नाही. ही माहितीची भर विकीवर घालत आहे. पण ती येथेही यावी म्हणून काही लेख देत आहे. आशा आहे ते आवडतील. या विमानाची चित्रे पाहण्यासाठी विकीवर जरूर भेट द्या! मिग-२१ मिकोयान मिग-२१ हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे, रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाला बालालैका या टोपण नावानेही ओळखतात कारण हे त्या सदृष दिसणार्‍या रशियन वाद्या सारखे दिसते. या विमानाच्या आकारामुळे त्याला पेन्सिल म्हणूनही ओळखले जाते.

नखरा नाही इतका बरा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 19/05/2011 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
नखरा नाही इतका बरा
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून नखरा नाही इतका बरा ठेव हातचं थोडं राखून ||धृ|| अगदी सकाळी इतकी सजली नाही कसर तू ठेवली कसली मोगर्‍याची फुले वेणीत माळली सुगंधी मन माझे कसे ठेवू मी झाकून ||१|| कुणी रंभा म्हणू की अप्सरा स्वर्गाची तूला बघताच होई तगमग जीवाची दागदागीने घालून रस्त्याने चालली मागे नको ग पाहू अशी मान वळवून ||२|| तुझ्या नजरेला माझी नजर भिडली पिवळ्या केवडी रंगानं जादू केली प्रित दोन जीवांची जुळू लागली नको झुरवू आता दुर उभी राहून
काव्यरस

स्टफ्ड बन्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी गुरुवार, 19/05/2011 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
ही पाकृ मी अंतरजालावर पाहिली आणी लगेच करुन बघितली :) अगदी सोप्पी आणी महत्वाचे म्हण्जे बिनअंड्याची पाकृ आहे. . साहित्य बन्ससाठी: ११/२ कप मैदा १/४ कप पाणी १/४ कप दुध ३/४ टेस्पून ड्राईड यीस्ट १ टेस्पून साखर ३/४ टीस्पून मीठ ३ टेस्पून ऑल्हिव ऑईल .

"आदर्श " सुंदर हाच आमचा बंगला

लेखक विदेश यांनी गुरुवार, 19/05/2011 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : असावा सुंदर चॉकलेटचा बंगला -) "आदर्श " सुंदर हाच आमचा बंगला सरकारी दरबारी 'कुणकुण 'ता चांगला ! ह्या आमच्या बंगल्याला संधीचं दार - भेसळींच्या पोत्यातनं तिथून वसूल फार ! रोज रोज नोटांच्या ' पेटया ' दोन - ' आल्या आल्या ! '- म्हणायला, छोटासा फोन ! ' बिस्किटां'च्या प्राप्तीवर जोर छानदार - ' परमिटां'च्या भांडणात फुल्ल हाल हाल !

आयुष्य पार सरलेले

लेखक स्वानंद मारुलकर यांनी गुरुवार, 19/05/2011 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
तडजोडी करता करता आयुष्य पार सरलेले स्वप्नांची वाफ उडाली कोरडे-शुष्क उरलेले आता न वळे पाऊल वाटेवरती गाण्यांच्या कंठात रुते आवाज ओठही बंद शिवलेले हे दुःख आत ना मावे बाहेर येतही नाही पाहून पोरकी स्वप्ने डोळ्यांशी डबडबलेले माझे मन मोठे कोडे सुटता न सुटे थोडेही बाहेर दिसे स्वच्छंदी आतूनी बुरसटलेले खांद्याला घेऊन ओझी मसणात रोजची वारी एकेका दगडा खाली एकेक स्वप्न पुरलेले - स्वानंद
काव्यरस

हे 'असं' कसं?

लेखक वेणू यांनी गुरुवार, 19/05/2011 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
घट्ट विण असलेली नातीही, कधी ढिली पडतात... कळवळतो, विव्हळतो जीव! सतत शस्त्र खाली टाकून 'गरज' आहे, असं सांगण्याची सवय आडवी येते!! 'आपलचं माणूस' आहे ना? असा आवाज पुन्हा येतो... मनाला समजावणं, की भुलावणं? वरच्यालाच ठाऊक....! मग एक 'अस्फूटसं' हास्य, मन हारल्याची आपली जाणिव... अन् जग जिंकल्याचा 'विजयी' भाव त्याच्या चेहर्‍यावर..... नाती अशी टिकतात का? 'एकाच्याच' गरजेखातर?? कळत नाही... पण; दरवेळी असंच घडतं खरं.......!!

मुलास पत्र.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 19/05/2011 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
बबडूस, सद्या चि. आशिर्वाद असं लिवलं तर लई राग येतो लेकरांना म्हनूनशान हे असं लिवलय. लई दिवसापासून तुला पत्र लिवीन लिवीन म्हनतोय, पण हिकड येळच मिळत नाही काय करनार ! साहेबांची तुरुंगातसुधा शेवा करावी लागती बाबा ! आणि साहेबबी कसं हायती.. स्वत:च्या दाढीचं केसबी कापत नाय साला. असो पण आपल्याला काय करायचं हाय ? पैसे मिळत्यात ना? मग झाल तर. ग्वाड मान्हून रहायच. पैक्यापूढ मान अपमान सगळ झूट असतय बाबा. परवाच तुझ्याआयचा फोन आला होता. (तिच्यायलाहिच्या) तिला आता भिकंच डोहाळं लागल्यालं दिसत्यात. मला सांगत व्हती की बबड्याला आता शिक्षाण पूर्न कर म्हनाव.

(बापाचे) मुलास पत्र.

लेखक नगरीनिरंजन यांनी गुरुवार, 19/05/2011 06:56 या दिवशी प्रकाशित केले.
बाळ्या, "बघता बघता तू किती मोठा झालास. माझा अजूनही विश्वास बसत नाही की कालपरवा पर्यंत अंगणात खेळणारं माझं बछडं आज नोकरीनिमित्ताने दुसरीकडे भुर्र उडून गेलं आहे.", असं बोलत डोळे टिपून तुझी आई मला बोर करत असते. पण होईल नीट हळूहळू. तुझा प्रवास चांगला झाला असेलच. जायच्या आधी तुझ्या आईच्या बडबडीमुळे काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या त्या लिहितोय. मानापमान - नोकरीत बॉसच्या मानापमानाच्या भावना फार तीव्र असतात, पण बॉसने दिलेल्या शिव्यांनी आपला अपमान होत नसतो हे लक्षात ठेव.

व्यवसाय सुरू करण्याआधी

लेखक निनाद यांनी गुरुवार, 19/05/2011 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी काही सरकारी नोंदण्या आवश्यक असतात. मला आजवर सापडलेल्या नोंदण्या पुढे देत आहे. मात्र या शिवायही अजून काही महत्त्वाच्या नोंदण्या असू शकतात. नवीन व्यवसाय कसा सुरू करावा ही चर्चा येथे व्हावी ही अपेक्षा. खालील माहिती मध्यम व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोगी पडेल असे वाटते. १. पॅन नंबर - कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे पर्मनंट अकाऊंट नंबर असणे आवश्यक आहे. हा नंबर युनिट ऑनलाईन अप्लाय करता येतो. मात्र कागदपत्रे छाननीसाठी प्रत्यक्ष जावेच लागते. यासाठी बहुदा युनिट ट्रस्टच्या शाखेत जाता येते.