Skip to main content

हे 'असं' कसं?

लेखक वेणू
गुरुवार, 19/05/2011 या दिवशी प्रकाशित केले.
घट्ट विण असलेली नातीही, कधी ढिली पडतात... कळवळतो, विव्हळतो जीव! सतत शस्त्र खाली टाकून 'गरज' आहे, असं सांगण्याची सवय आडवी येते!! 'आपलचं माणूस' आहे ना? असा आवाज पुन्हा येतो... मनाला समजावणं, की भुलावणं? वरच्यालाच ठाऊक....! मग एक 'अस्फूटसं' हास्य, मन हारल्याची आपली जाणिव... अन् जग जिंकल्याचा 'विजयी' भाव त्याच्या चेहर्‍यावर..... नाती अशी टिकतात का? 'एकाच्याच' गरजेखातर?? कळत नाही... पण; दरवेळी असंच घडतं खरं.......!!
लेखनविषय:

वाचने 939
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मुक्तक सुंदर .... अवांतर : "गरज ही नविन नात्याची जन्मदात्री असु शकते, परंतु नात्यामध्ये फक्त गरज उरली की समजावे नात्याचा अंत झाला आहे" - गणेशा

धन्यवाद आपले..... "गरज ही नविन नात्याची जन्मदात्री असु शकते, परंतु नात्यामध्ये फक्त गरज उरली की समजावे नात्याचा अंत झाला आहे" - ह्म्म्म! पटतयं!!