स्टफ्ड बन्स
ही पाकृ मी अंतरजालावर पाहिली आणी लगेच करुन बघितली :)
अगदी सोप्पी आणी महत्वाचे म्हण्जे बिनअंड्याची पाकृ आहे.
साहित्य बन्ससाठी:
११/२ कप मैदा
१/४ कप पाणी
१/४ कप दुध
३/४ टेस्पून ड्राईड यीस्ट
१ टेस्पून साखर
३/४ टीस्पून मीठ
३ टेस्पून ऑल्हिव ऑईल
बन मधे भरण्यासाठी तुमच्या आवडीची कुठली ही सुकी भाजी, उदा; उकड्लेल्या बटाटयाची, बटाटा-मटार सुकी भाजी .इ.
पाकृ:
दुध कोमट गरम करावे व त्यात साखर आणी ड्राईड यीस्ट नीट मिक्स करुन बाजुला ठेवावे.
दुसर्या भांड्यात मैदा घ्यावा व मधे खळगा करुन त्यात मीठ, पाणी, तेल व यीस्ट्+दुधाचे मिश्रण घालावे.
सगळं नीट एकत्र करुन सैलसर पीठ मळून घ्यावे.सुरुवातीला थोडे चिकट पीठ वाटेल पण नीट मळले की छान मऊसुत पीठ तयार होईल.
तेल लावलेल्या भांड्यात पीठाचा गोळा ठेवून , वरून क्लिंग फॉईल लावून उबदार ठिकाणी १ तासभर ठेवावे .
एका तासानंतर पीठ फुगून दुप्पट झालेले असेल.
फुगलेले पीठ चांगले मळून घेणे व त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून परत १० मिनिटे उबदार ठिकाणी ठेवणे.
पुन्हा गोळे फुगतील.
फुगलेल्या गोळ्यांना चांगले मळून त्याचे वाटी /पारी तयार करुन त्यात तुमच्या आवडीचे सारण भरून नीट बंद करणे.
वरून तयार बन्संना मिल्क वॉश / एग वॉश देणे (दुध / अंड कुकिंग ब्रश ने लावणे).
प्री-हिट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्री सेंटीग्रेड वर १५-२० मिनिटे भाजणे.
गरमा-गरम स्टफ्ड बन्स तयार...वरून थोडे बटर लावावे...मस्तपैकी चहासोबत खाण्याचा आनंद लुटा :)

वाचन
4922
प्रतिक्रिया
0