Skip to main content

कृष्णानुराग संकीर्तन

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 22/08/2011 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णानुराग संकीर्तन -- श्रीकृष्ण मोहन, सर्वज्ञान घन, भक्त पूजित, श्याम मोहन | रास-क्रीडा , रचित वल्लभ, गोप गोपी जन, प्रिय मोहन || सर्व तुष्टीकर, सर्व पुष्टीकर, धेनु वत्सल, गोप मोहन | जगत चालक, भक्त भावन, जगत पोषण, मुरली मोहन || भवताप भंजन, लोक रंजन पाप नाशन, प्रेम मोहन | कृष्ण कृपाकर, मोक्ष दायक वैकुंठ नायक, विश्व मोहन || -- सागर लहरी २२-८-२०११
काव्यरस

देवा मला परत एकदा लहान व्हायचं आहे...

लेखक प्रिया ब यांनी सोमवार, 22/08/2011 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
देवा मला परत एकदा लहान व्हायचं आहे... रोज सकाळी आईच्या गजराने उठायचं आहे... नाक मुरडत दूध पिऊन time table भरायचं आहे... सायकल वरून मैत्रीणींबरोबर रस्ता अडवत शाळेला जायचं आहे... रांगेत उभं राहून प्रार्थनेनंतर वर्गात शिराय्चं आहे... पहिल्याच तासाच्या टीचरांना attendance द्यायचा आहे... घरी न केलेला home work free period मध्ये संपवायचा आहे... art craft च्या lecture मध्ये रंगी बेरंगी कागद, टिकल्यांशी खेळायचं आहे... डब्यात आणलेली नावडती भाजी recess मध्ये दुसरीशी share करायची आहे... संध्याकाळी घरी पोचताच दप्तर ठेऊन बाहेर खेळायला जायचं आहे... दिवे लागणीच्या वेळी परत येऊन 'शुभंकरोती' म्हणायचं आहे... आ

राधाराणी जरा सावर

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 22/08/2011 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
कालिंदीच्या तीरी वाजते पावरी प्रवाहात बुडे घागर राधाराणी जरा सावर || नंदाचा नंदन सावळा श्रीहरी भलता खट्याळ बाई गोधने डोलवी, गोपिका भुलवी, गोजिरा, वेल्हाळ बाई सूरमोहिनीत जाशील विरून वेळीच मनाला आवर राधाराणी जरा सावर || दहीदूधलोणी भरलेले माठ फोडून करतो चोरी गोपसखे जमवून हा छेडतो, किती याची शिरजोरी तक्रारी कृष्णाच्या किती ग कराव्या, यशोदेला नाही पाझर राधाराणी जरा सावर || कशाला फुकाच्या कागाळ्या, रुसवे? खेळ हा हवासा वाटे जरा होता कान्हा नजरेच्या आड, उरात काहूर दाटे जागता छेडतो, स्वप्नात वेढतो चोहिकडे याचा वावर राधाराणी जरा सावर ||
काव्यरस

देहदशा

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 22/08/2011 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
ओठांवर मुकेच नांव तुझे पापणीत दडल्या आठवणी हृदयात रमलरत गहन तळे कांठावर गहिवरते पाणी वाटेत मावळे देहदशा भेटे स्वप्नी तरिही कोणी रंध्रांत घोर आणीबाणी दाटून दग्ध वाग्विलासिनी रममाण रमण तन मन ध्यानी जन्मात जन्म झाले आणी पायांत शृंखला जडलेल्या चाललो एकला अनवाणी ...................अज्ञात
काव्यरस

अण्णा, प्लीज जपा..!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 22/08/2011 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अण्णा, सर्वप्रथम तुमच्याबद्दल अत्यंत आदर व्यक्त करतो. तुमचं स्वच्छ चारित्र्य, तुमची साधी राहणी, तुमची सात्त्विकता, तुमच्यातली सादगी, तुमच्यातली निरागसता, तुमचं सेवाव्रत या सर्वांना माझा सलाम. अगदी मनापासून. अण्णा, खूप भावता तुम्ही मला.. आता काही मुद्दे - १) काही दिसांपूर्वी तुम्ही आणि तुमची टीम असं म्हणत होतात की सरकारनं त्यांच्या लोकपालपदासोबत तुमचंही जनलोकपाल बील संसेदेपुढे किमान सादर तरी करावं; मग संसद त्यावर जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य असेल.

तू लिहिलेस नि मला सुचून गेले. ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 22/08/2011 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
[एका मित्राला सहज म्हणून डॉलरचा हिशेब पैशात सांगितला नि एका डॉलरमध्ये कमीत कमीत ३ किलो कांदे आले असते असे म्हणालो .नि येथे फक्त ३ कांदे आले. त्यावरून त्याने गमतीशीर पत्र लिहिले .त्यावरून खालील सुचले ] ह्या डॉलरच्या देशात रुपया चालत नाय आनंद घ्यायला पैसा लागत नाय . . मी एकडे तिकडे बघत चालतो पोरगाच खिशातून कार्ड काढतो काय करतो..? किती देतो..?
काव्यरस

विदुषक

लेखक अभिजीत राजवाडे यांनी सोमवार, 22/08/2011 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
बदल होतोय कित्येक दशक होत आहे अनुभवांचे लेणे आता विदुषक होत आहे. कळले हे कि "काळाचा महिमा अगाध", मद्याचा प्यालाही मानाचा चषक होत आहे आंधळ्या राजाची ही आंधळी प्रजा आहे चक्क मुकाही इथे उदघोषक होत आहे तिला हि सवय अन त्याला सवय आहे नजरेने ठार करणे बेलाशक होत आहे नम्र मांजरी माना झुकवत आहे आता घंटा गळ्यात बांधणारा मुषक होत आहे

पालक गोश्त

लेखक गणपा यांनी रविवार, 21/08/2011 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २ मध्यम कांदे बारीक चिरलेले. २ जुड्या पालक बारीक चिरुन घेतलेला. ५०० ग्रॅम.

माहिती अधिकार कायदा : अण्णा

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 21/08/2011 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांच्या आंदोलानाच्या निमित्ताने काही चर्चा ऐकल्या आणि काही शंका मनात आल्या माहिती अधिकार कायदा काय आहे ? RTI Activist म्हणजे काय ? अण्णांना या कायद्याचे जनक म्हणतात ते का ? त्यांचे यामधे योगदान काय. दुसरी बात गेल्या आठवड्यात भोपाळला एका RTI Activist ची हत्या झाली मागील वर्षी पुण्यातही एकाची हत्या झाली असं काय आहे या कायद्यात की ज्याला एवढे घाबरावे ? माहिती मिळाली तर आनंद होइल टीप - ज्यांना माहिती असेल त्यांनीच इथे माहितीची भर घालावी बाकीच्यांनी इथे सकाळची कामे करू नयेत, ती इतरत्र उरकावीत)