पुरुष आणी स्त्री यांच्या व्हर्च्युअल लढाईत अण्णांसारख्या महापुरुषाच्या धाग्याला लागलेली जाळी थोडीफार सारण्याचा प्रयत्न करतो आहे....
आणी इतक्या मोठ्या व्यासपीठावर चालु असलेल्या चर्चेबाबत उदासीन सरकार व उदासीन मिपाकरांचा निषेध....
अजोनही उच्छृंखल धाग्यांच्याच मागे धावणारे मिपाकर लौकरात लौकर या विषयात लक्ष देतील ही भाबडी आशा बाळगणारा सामान्य, भारतीय, माणुसकीची जाण असणारा, मिपाकर नागरिक....
अण्णा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.....
इतर या पर्यायाला मत दिले आहे.
कोणीच मागे न हटल्याने व अण्णांची प्रकृती नाजुक झाल्याने त्यांना हॉस्पिटलमधे हलवले जाईल. त्यानंतर आपल्या अनेक वर्षांच्या अनुभवावरुन, यातूनही काँग्रेस तरुन जाईल. (असे व्हावे ही माझी अजिबात इच्छा नाही, पण भावनेच्या आहारी न जाता विचार केला तर ही शक्यताच जास्त वाटते.)
तडजोड - होईल (किंवा व्हावी) असं वाटतं..
नेगोशिएशन करताना अगदी १०० रुपयाच्या वस्तुसाठी ५० पासून घासाघिस करायला सुरवात करतात आणि शेवटी ७५-८० मधे सौदा तुटतो तसं काहिसं होईल असं वाटतंय.
जनलोकपाल'मधील तीनही मुद्द्यावर चर्चा होऊन. दोन्ही सभागृहांनी जनलोकपाल विधेयक स्थायी समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तडजोड - अण्णा आणि सरकार दोघेही दोन-दोन पावले मागे येणारला मत टाकले आहे. :)
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
पुरुष आणी स्त्री यांच्या
इतर
तडजोड - होईल (किंवा व्हावी)
तडजोडीला मत दिले
सरकार अण्णांच्या सर्व मागण्या मान्य करणार
जनलोकपाल'मधील तीनही
सरकारने तीन मागण्या मान्य केल्या तर अण्णा
In reply to जनलोकपाल'मधील तीनही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे