Skip to main content

पहाटे पहाटे फिरायला ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 27/10/2011 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे पहाटे फिरायला जाताना मला ह्या पोरी ,बाया दिसतात पाठीवर झोळी नि हातात तारेचा हूक [वारसाहक्काने त्याना मिळाला असतो हा ठेवा ] कचरा कुंडीत काहीतरी शोधीत बसतात ह्या शोधत असतात प्ल्यास्टिकच्या बाटल्या , कसली कसली फेकलेली खोकी विजेची वायर काय नि काय काहीतरी निराळेच मिळाले तर आनंदात असतात मी चालत असतो खरपूस वेगाने वाढलेली चरबी ,पोट संतुलित ठेवण्यास आणि घरी जाऊन मला चहा प्यायचाय हे देखील विसरत नसतो [!!] आणि ह्या माझ्या मागून पुढे जातात भन्नाट वेगाने दुसर्या कचरा कुंडीच्या शोधांत कचरा चिवडित बसतात विस्कटून टाकतात सगळा कचरा रस्त्यावर घाण करून जातात काहीतरी मिळेल ह्या आशेने खूप क
काव्यरस

मन....

लेखक लीलाधर यांनी गुरुवार, 27/10/2011 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
मन म्हणजे मन म्हणजे मन असते, तुमचे आमचे सगळ्या॑चे जीवन असते, लग्नाचे मु॑जीचे केळवण असते, ह्या सोहळ्या॑चे औचीत्य साधून केलेली आठवण असते, मन म्हणजे मन म्हणजे मन असते, तुमचे आमचे सगळ्या॑चे हेवन (स्वर्ग) असते, मनाचा मनाला नाही लागत मेळ, हीच तर खरी आहे जीवनाची भेळ, कशाला करताय फूकाचा त्रागा..... मनाने मनाशी बा॑धू मैत्रीचा धागा...... मान्य आहे की मन हे च॑चल असते, तरीही ते जीवनातील अमुल्य असे पवीत्र ग॑गाजल असते.......... म्हणून म्हणतो मन म्हणजे मन म्हणजे मन असते, तुमचे आमचे सगळ्या॑चे हेवन (स्वर्ग) असते, मन म्हणजे मन म्हणजे मन असते..............
काव्यरस

बागेमधला फेरफटका -

लेखक विदेश यांनी गुरुवार, 27/10/2011 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
बागेमधली विविध फुले रांगामधुनी कशी बहरती रंग लेऊनी मोहक अंगी वाऱ्यावरती गंध पसरती ! वातावरणी रम्य रंगती मुलामुलींचे ढंग वेगळे कोलांटउड्या मर्कटलीला पळापळीचे खेळ आगळे ! बाबागाडी निवांत फिरते चिवचिवणारी छोटी बाळे विश्वाला सामावून घेती लुकलुकणारे त्यांचे डोळे ! खुषीत नातू आणि आजोबा बागेमध्ये फिरून येती कोण सान नि कोण तो मोठा देहभान विसरून जाती !
काव्यरस

दिवाळीचा फराळ : बेसन आणि खोबर्‍याचे लाडू

लेखक गणपा यांनी गुरुवार, 27/10/2011 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!! दिवाळी म्हटलं की रांगोळी, दिव्यांच्या रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजी सोबत आठवतो तो दिवाळीचा फराळ. तसा मी लहानअसल्या पासून तिखटखाऊ. फराळातल गोडं धोड सहसा आवडत नाही. अपवाद म्हणजे बेसनाचे लाडू. तर आजची सुरवातच या आपल्या लाडक्या बेसनलांडूंनीच करु.

मिसळपावचा ई-दिवाळी अंक कधी प्रकाशित झाला ? :)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 27/10/2011 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपले एक जेष्ठ मिपाकर आणि आमचे जेष्ठ मित्र श्री प्रमोद देव यांनी मला फेसबूकवरुन एक चित्र पाठवलं आणि दिव्य मराठीची बातमीही पाठवली त्या बातमीत ई-दिवाळी अंकाची बातमी आहे. विविध मराठी संकेतस्थळांच्या ई-दिवाळी अंकाच्या वैशिष्ट्यांबाबत छापून आले आहे. तसेच न निघालेल्या आपल्या मिसळपावच्या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्येही छापून आले आहे.