पुढाऱ्याचे प्रेम
प्रेम या थिम वर एक गद्य-पद्य लिहायचे होते त्यात मी ' पुढाऱ्याचे प्रेम ' वर लिहायचे ठरवले.
काव्यरस
वळण...
दुपारची वेळ. मी बसची वाट पहात स्टॉपवर उभा होतो. बाजूने वाहनांची भरधाव वर्दळ सुरु होती.
एक आलीशान गाडी उजवीकडून भर वेगात आली. समोरून तितक्याच वेगात पुढे गेली.
पाचपन्नास फूट गेल्यावर करकचून ब्रेक लागला. गाडी हळुहळू पुढे गेली आणि जागा मिळताच यू टर्न मारून वळली.
पुन्हा काही फूटावर वेगात गेली आणि तिथेही गाडीने यू टर्न घेतला.
मी काहीशा रागाने, काहीशा उत्सुकतेनं त्या महागड्या गाडीच्या कसरती पाहात होतो. सत्तरएक लाखाची असावी!
आता ती गाडी संथ गतीने माझ्या दिशेने येत होती.
अगदी माझ्यासमोर येताच थांबली.
डावीकडची काच खाली लयदारपणे खाली गेली...
'नमस्ते साब'...
सिंहलव्दीपाची सहल : १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...
लढा
ते आले आणि वार केले
मी धडपडलो पण भ्यालो नाही
अपमान पचवु कसा म्हणत
उगा मद्य प्यालो नाही
केली त्यांनी अफाट निंदा
मी मुळीच बधलो नाही
दिखाव्याच्या प्रतिष्ठेसाठी
दिखाऊपणे वदलो नाही
उष्ण झळा येत गेल्या
कोमेजलो पण हरलो नाही
मनाला चटके बसले तरी
काळजामधे झुरलो नाही
सोसुन सारा ऊन-वारा
नियतीशीही झुंजत राहीन
खंबीरपणे उभा राहुन
पहाडाशीही टक्कर घेईन
आघात तर होतच राहतील
लोक हसुन मजा पाहतील
पाहणाऱ्यांना पाहु द्यावे
आपण पुढे चालत राहावे
रडणार नाही कुढणार नाही
त्याचाच भाव चढा असेल
आणि बेडरपणे पुढे जाणे
हाच खरा लढा असेल
- शार्दुल हातोळकर
काव्यरस
SLB चा बाजीराव-मस्तानी
अगदी बालपणापासून चित्रपटाचे संस्कार प्यालेला असल्याने, लोकांनी कितीही चिखलफेक केली तरीही, SLB चा "बाजीराव-मस्तानी" पाहायला जाणार ह्यात काही तिळमात्रदेखील शंका नव्हती. पण काही इतर कामात व्यग्र असले कारणाने पंधरा दिवस लागले. एकतर चित्रपटाचा फ्यान अन त्यात प्रेमरंगमहर्षी SLB म्हणजे आनंदाला पारावर उरला नाही माझ्या. आजही रामलीला-देवदास थेटरात लागल्यास ५ वेळा पाहून यीन इतकं प्रेम केलंय ह्याच्या कलाकृतीवर.
कुंकवाचा भार ना होतो कपाळी ...
तू तरी कोठे तशी हसतेस आता
बोलक्या मौनासही जपतेस आता
पालखी माथ्यावरी रुतलीच आहे
जोखडांना सौख्य तू म्हणतेस आता
कुंकवाचा भार ना होतो कपाळी
'भाग्य' म्हणुनी त्यास का फसतेस आता
कोडगा तो उंबरा हसतो मुक्याने
का स्वतःची वंचना करतेस आता
दांभिकांचे दंभ तू नाकार वेडे
तूच दुर्गा, कालिका असतेस आता
विशाल
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी!
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं
हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं
ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं
आता फक्त ऑफिस की हो उरलं!
मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर.
कोण नाही पर्वा करायला
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला!
रात्रभर एकटा बसू कसा?
क्लायंटला अडचण सांगू कसा?
बाकीचे सारे, प्रोफेशनल खरे
जातात टायमात ते घरला!
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
जमेल तेवढं खेचून मी काम
नाही केला आजिबात आराम
सकाळ
राणीच्या बागेत - झाडांच्या सावलीत
(फोटो नोकिया ६३० मोबाइलचे.)
१) पत्रक

२ ) वेगळ्या कोनातून मनोरा

३ ) जमलेले इच्छुक गाइड उषाकडून माहिती ऐकताना-

४) जमलेले इच्छुक रिनी व्यास'कडून माहिती ऐकताना-

५ ) कैलास्पतीचे फळ

२ ) वेगळ्या कोनातून मनोरा

३ ) जमलेले इच्छुक गाइड उषाकडून माहिती ऐकताना-

४) जमलेले इच्छुक रिनी व्यास'कडून माहिती ऐकताना-

५ ) कैलास्पतीचे फळ
"तू"
मी कितीही विखुरलो
छिन्न भिन्न जाहलो
तू मला गोळा करतेस
लहान मुलाने चित्रकोडे
एकत्र करावे तसे ......................!
मी इतुका अवघडलेला
तु मला सहज मोकळा करतेस !
सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ?
मी नेहमीच फाटलेल्या
वस्त्रासारखा अलगथलग
तु सगळा मला जोडुन
आईच्या मायेने,
माझ्या फाटलेल्या वस्त्रांची गोधडी करतेस
उबदार, आश्वस्त...................
सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ?
थंडी इतुकी कडाक्याची
झाडांचे ही खराटे होतात
गिळुनी सगळा उबदारपणा
रात्रीही गारठ्तात
तु मात्र............
मला बाहुपाशात घेऊन
विश्वाची उब माझ्या शरीरात भरतेस !
सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ?
तुझ्या स्तनातून वाहणारे दूध
नाकारून
तु
मिसळपाव