ओला कॅब्जचा नवा फंडा : रायडींग चार्जेस
परवा ओलाची कॅब बुक केली तेंव्हा बिलात किलोमीटर चार्जेस बरोबर रायडींग चार्जेस लावून बील आलं. हे चार्जेस म्हणजे तुम्ही जितका वेळ प्रवास केला तितक्या मिनीटांसाठी एक रुपया प्रती मिनीट इतकी रक्कम.
मी तक्रार दाखल केली आणि त्यांना कळवलं की एकतर तुम्ही किलोमीटर्सप्रमाणे चार्ज करा किंवा ट्रॅवल टाईमप्रमाणे चार्ज करा. खरं तर किलोमीटर्स प्रमाणे चार्ज केल्यावर रायडींग टाईमचा प्रश्नच येत नाही. वेटींग चार्जेस वेगळे लावले जातात ते मान्य आहेत कारण तेवढा वेळ तुमची कॅब डिटेन झालेली असते पण रायडींग टाईम हा सर्वस्वी ट्रॅफिक सिच्युएशनवर अवलंबून आहे आणि त्यात कस्टमर्सचा काहीएक हात नाही.
ए टी एम केंद्राची सुरक्षितता कुणाची जबाबदारी ?
पार्ल्याच्या श्री. प्रकाश जोशींचे युनियन बँकेच्या पार्ले पूर्व येथील शाखेत खाते आहे. १ मे २०१५ रोजी बँकेच्या ए टी एम केंद्रातून पैसे काढत असतांना एक माणूस आत शिरला. “मदत करू का ?” असे विचारू लागला. श्री. जोशींनी त्याला हटकलं. त्यावर मी सुरक्षा रक्षक आहे असे त्याने सांगितले. त्याचा गणवेष आणि ओळखपत्र कुठे असे विचारता त्याने अजून गणवेष मिळाला नाही असे सांगितले. जोशींनी त्याला बाहेर काढला. पण केंद्राच्या दाराला आतून कडी लावायची सोय नव्हती. पैसे काढून बाहेर आल्यावर २ मिनिटे थांबून इकडे-तिकडे कानोसा घेतला. ‘तो’ माणूस कुठे दिसला नाही.
दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)
१२ डिसेंबर १९८८. आमची बोट ‘जग विवेक’ हजारो टन गहू घेऊन व्हॅन्कूव्हर (कॅनडा) हून सिंगापूरमार्गे भारताकडे येत होती. जगांतल्या सगळ्यात मोठ्या, पॅसिफिक महासागराच्या मधोमध होतो. अमेरिकेच्या ‘हवाई’ बेटांपासून दोनशे मैल दूर. शांत समुद्र, निरभ्र आकाश. बोट बंदरात असताना कितीही महाकाय दिसली तरी समुद्रात ती एखाद्या छोट्याश्या खेळण्यासारखीच असते. बोटीवरच्या आयुष्याची मजा काही औरच. जेव्हां वातावरण शांत असतं तेव्हां अंधार पडल्यावर डेकवर आरामखुर्ची टाकून आकाशाकडे पाहात पहुडणं म्हणजे पर्वणीच ! राजा-महाराजांच्या देखील नशिबात नाही अशी स्वच्छ हवा अन् नीरव शांतता.
आंतरजातीय विवाह
काल एका मैत्रीनीचा मेसेज आला. एक कविता पाठवली होती. "चुक कोणाची? माझी का त्याची?". खोदुन विचारल्यावर तीने सांगितल. एका मुलावर तीच प्रेम होत अजूनही आहे. दोघही एकमेकावर मनापासुन प्रेम करत होते, अजुनही करतात. एकमेकांनी घरी सगळ काही घरी सांगितलं. पण घरच्यांनी विरोध केला.
कारण एकच दोघांची जात वेगळी म्हणुन. पळुन लग्न करण्याचा सल्ला मी दिला पण घरच्यांना दुखवुन लग्न न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. जो कोणत्याही संस्कारी मुलाला आणि मुलीला शोभणारा होता. त्यांची गोष्ट ऐकताना १८५० च्या काळ चालु असल्या सारख मला वाटत होत. लग्नासाठी अजुनही मुलगा आणि मुलगी एकच जातीची असायला पाहिजे हे मला माहितच नव्हत.
अनाचे दोडोबा.. (शिमगा पेश्शल)
उंच गुढीतच तपशीलाची गाठी
सकस धाग्यात अनाचे दोडोबा..
संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट
न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा..
विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत
संदर्भाचा तर खजिना अबाबा...
धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो
प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा
मालोजींकडे जातो घेऊन साथी
शिवकालीन चीजा आणि शिवबा..
त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार
चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा..
जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा)
प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा ..
.........
काय घेतलं, काय राहिलं?
हे लिखाण पर-प्रकाशितच. कुणी अनामिकाने* लिहिल्यानंतर WhatsApp वर आलेल्या एका स्फुटाला मुक्तकाचं रुप द्यावंसं वाटलं, दिलं.
काय घेतलं, काय राहिलं?
पर्स, फोन, किल्ल्या हाती
आई निघे पोटासाठी
पगार मिळेल हातात
कसे यावे शब्द ओठी
'सगळं घेतलंय दिवसासाठी',
तान्हं बाळ घरात!
दहशत - एका नव्या रूपात!
त्याने असं काय विचारल तिला की आतापावेतो गप्पांमध्ये सहभागी असणारी ऑफिसातली मंडळी अचानकपणे सुन्न झाली. आमावस्येच्या रात्री गावाबाहेरच्या जुन्या पडक्या देवळामागच्या काळोखात बुडून गेलेल्या झुडूपांमध्ये असते तशी भेदक कळा त्या झगमगत्या फॉल्स सिलींगमधल्या रोषणाईला आली होती. शांततेचा पारा तर उणे शेकड्यात जाऊन गुरफटून बसला. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता इतकी दाटली की त्या ऑफिसातल प्रत्येक क्युबिकल आयसीयू वार्ड प्रमाणे भासू लागल.
सरकार...- मलाबी दयाना
गावाकडच्या मित्रा सोबत गप्पा सुरु होत्या. मित्राने सुरुवात केली. सरकारनं मल्ल्यांची मालमत्ता जप्त केली तरी त्याने बुडविलेल्या अशा किती कर्जाची वसुली होईल. मी म्हटलं ..जेवढे वसूल होईल तेवढे होईल ..पण सरकारनं ठरवलं तर त्याच्या जप्त केलेल्या मालमत्तेतून सरकारला गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणता येतील....पैसा हि कमवता येईल. हे काय नवीन..मित्राने मधेच प्रश्न केला. मी सुद्धा मग योजना काय असू शकते हे सांगण्यास सुरुवात केली...
आता हे बघ..जप्त केलेली मालमत्ता विकून आलेल्या पैशात "तुला बी घेना"सारखी कर्ज योजना आणता येईल. कर्ज घेणा-यासाठी अट एकच...
पाणी बचत काळाची गरज
पाणी बचत हा कळीचा मुद्दा बनलाय.सर्वत्र पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे खेड्यातील असो वा शहरातील प्रत्येक बायकांना या समस्येला सामोरे जाव लागत आहे.तास् न तास् टँकरची वाट पाहत लांबलचक रांगेत तीव्र उन्हात उभ टाकाव लागत आहे.या सर्व परीस्थीतीने सामान्य माणुस हातबल झालाय.
त्या मुळे या परीस्थीतिशी सामना करण्यासाठी पाण्याचे कटाक्षाने नियोजन करणे अत्यंत गरजेते आहे.''पाण्याची बचत करा''.हे एेकुन किंवा बोलुन चालत नाही तर ते प्रत्यक्षात आनाव लागेल.प्रत्येकाला पाणी बचत ही सवय बनवावी लागेल तरच हे शक्य आहेे. गावा गावात महिला पाण्यासाठी वणवण भटकतांना दिसून येत आहेत .
मिसळपाव