Skip to main content

नेते

लेखक आनंद कांबीकर यांनी शनिवार, 04/06/2016 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक तर तो कधेमधेच कॉलेजला येतो आणि दुसरं म्हणजे वर्गात आल्यावर तो एखाद्या राजकीय पक्ष्याच्या कार्यालयात आल्यासारखा वागतो. म्हणजे त्याची एंट्रीच कशी जबरदस्त असते पहा; वर्ग चालु होऊन चांगला अर्धा तास झालेला असणार, एखादा पॉइंट घेऊन शिक्षक रंगात आलेले असणार, आणि तेवढ्यात हा उपटतो; "आत येऊ, सर" खरं तर त्याचे विचारणे कधी प्रश्नार्थक नसतेच कारण हे वाक्य संपेपर्यंत त्याचा संबंध देह वर्गात घुसलेला असतो. आणि शिक्षकांना "या! या! या!" म्हनुस्तव्हर याने पहिल्या बेंचवरच्या पोराच्या हातात हात देऊन, कोपऱ्यात बसलेल्या पोराला डावा हात उंचावून 'सलाम' करत, पहिला बेंच मागे टाकलेला असतो.

उपनिषदे (४)

लेखक शरद यांनी शुक्रवार, 03/06/2016 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

मी एकटा आहेच कुठे?, , , , , "खरे सुपरमॅन - आमचे आप्पा" या लेखात नमूद केलेला लेख.

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शुक्रवार, 03/06/2016 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात मी आप्पांच्या या लेखाचा उल्लेख केला होता आणि तुम्ही मंडळींनी तो लेख इथे टाकावा अशी इच्छा व्यक्त केली होती. तो हा लेखः माझी पत्नी प्रतिभा सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन पावली. त्या वेळेपसून मी एकट्याचे जीवन जगत आहे. सुरवातीला हा एकटेपणा खूप त्रासदायक वाटत असे. विशेषतः ‘या परिस्थितीत आता फरक पडणार नाही’ या जाणीवेने अतिशय त्रास होई. पण मी सतत विचार करीत राहिलो. आता या परिस्थितीत जर फरक पडणार नाही तर त्या परिस्थितीशी लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जुळवून घेणं हे श्रेयस्कर नाही का? विचार पटला तरी हे करणं सोपं नसतं आणि सोपं नव्हतंच! अनेक वेळा खूप वैताग येई.

सापडला पठ्ठ्या एकदाचा!!

लेखक बाजीप्रभू यांनी शुक्रवार, 03/06/2016 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
Yamato सापडला पठ्ठ्या एकदाचा!! आई-बाप, अख्खा जपान आणि थायलंडमध्ये माझ्या सारख्याच्या जिवाला घोर लाऊन तब्बल ६ दिवसांनी एका मिल्ट्री कॅम्पच्या शेल्टरमधे सापडला. असल्या प्रकरणात माझे बाबा असते तर कानाखाली एक जाळ काढला असता आणि एका सेकंदात मॅटर क्लोज केला असता, पण इकडे जपानमधे आपल्या भारतातल्या सारखं मुलाच्या कानपटवायची सोय/मानसिकता नसल्यामुळे 'ताकायुकी तानुका' नावाच्या जापनीस बापाने मध्यम मार्ग स्वीकारला.

एक संघ मैदानातला - भाग १२

लेखक शि बि आय यांनी शुक्रवार, 03/06/2016 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
केक खाताना दादाचं सेंटी होण उगाच मनात घर करून बसलं होत. बाप आपल्या मुलीचा किती विचार करत असतो ते जाणवलं. थोड्यावेळाने मँच होती त्या दृष्टीने मानसिक तयारी करण गरजेचं होत पण काही केल्या पुढचा गियर पडत नव्हता. मँचसाठी लागणारा अर्लटनेस, अँग्रेशन मला माझ्यात कुठेच दिसत नव्हत. ह्या टुर्नामेण्टला मी कॅप्टन होते. त्यामुळे माझा मेंदू घोडयापुढे धावण अपेक्षित होत पण इथे तर मन आणि मेंदू कम्फर्ट झोन मधून बाहेर निघत नव्हते. "देवा… आता काय करू? " मी बाथरूमला जाऊन आले. उगाच तोंडावर भरपूर पाणी मारलं. ग्राउंडमध्ये जाऊन अंदाज घेतला तर तिसरी मँच आत्ता सुरु झाली होती.

आंब्याचे सासम/सासव

लेखक उल्का यांनी शुक्रवार, 03/06/2016 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर आंबा पाकृचा पाऊस पडतोच आहे तर आपण पण थोडे भिजवुया या प्रांजळ विचाराने प्रेरित होउन ही पाकृ देते आहे. ही पारंपारिक सारस्वत पा़कृ आहे. ह्या पाकृसाठी खास रायवळ आंबे उत्तम. कोकणात, गोव्यात ह्या जातीचे आकाराने मोठे आंबे पहावयास मिळतात. मुंबईत मात्र लहान लहान असतात. पण चवीला गोड असले की झाले.

तो प्रवाही प्रवास…!

लेखक अश्विनी वैद्य यांनी शुक्रवार, 03/06/2016 05:02 या दिवशी प्रकाशित केले.
नदीकिनारी चालत जाताना उन्हाची ऊब जरा जास्तच जाणवत होती. तळपायांना थोडा गारवा मिळावा म्हणून किनाऱ्यावर लांबच लांब पसरलेल्या हिरव्या, थंडगार लुसलुशीत गालिच्यावर शूज काढून पाय टेकवत एका झाडाखाली बसले. तिथल्या नीरव शांततेचाही एक वेगळाच आवाज कानांना जाणवत होता. थोड्यावेळाने सहजच लक्ष गेलं. माझ्यापासून अगदी दोन पावलांवरच मुंग्याची चाललेली एक लांबच लांब रांग दिसली…एक एक मुंगी अगदी ओळीने पुढचीच्या बरोबर मागे जात होती…मध्ये येणारे छोटे छोटे दगड, खळगे एका मागोमाग एक सहज ओलांडून पुढे चालली होती.

किल्ला चित्रपटाच्या निमित्ताने

लेखक पैसा यांनी गुरुवार, 02/06/2016 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
1 रविवारी "किल्ला" (२०१५) पाहिला. अतिशय सुंदर अनुभव देणारा चित्रपट. १०/११ वर्षांचा चिनू आणि त्याची आई चिनूचे वडील नुकतेच गेल्यावर आयुष्याशी तडजोड करत आहे ती परिस्थिती स्वीकारायला शिकतात, त्यांच्या आयुष्यातल्या साधारण एका वर्षातल्या घडामोडीं या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात.

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -८

लेखक मेघना मन्दार यांनी गुरुवार, 02/06/2016 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
भाग आठवा - आज माझा पहिला थांबा होता कोवेण्ट गार्डन. हे गार्डन नाहीये. हे एक शॉपिंग सेंटर म्हणता येईल अशी जागा आहे. कोवेण्ट गार्डन हे ट्युब स्टेशन आहे इथून उतरून चालत जाता येतं या छोट्याश्या मॉल मध्ये. इथे सगळ्या आंतरराष्ट्रीय ब्रांड ची छोटी दुकाने आहेत त्याचबरोबर लोकल ब्रांड ची सुद्धा दुकानं आहेत. सौंदर्य प्रसाधने , कपडे , दागिने , गृहोपयोगी वस्तू सुवेनिअर्स असं बरच काय काय मिळतं इथे. तसं स्वस्त इथे काहीच नाही पण इथे जरा किमती एकंदरीतच कमी वाटल्या मला.