
सापडला पठ्ठ्या एकदाचा!!
आई-बाप, अख्खा जपान आणि थायलंडमध्ये माझ्या सारख्याच्या जिवाला घोर लाऊन तब्बल ६ दिवसांनी एका मिल्ट्री कॅम्पच्या शेल्टरमधे सापडला.
असल्या प्रकरणात माझे बाबा असते तर कानाखाली एक जाळ काढला असता आणि एका सेकंदात मॅटर क्लोज केला असता, पण इकडे जपानमधे आपल्या भारतातल्या सारखं मुलाच्या कानपटवायची सोय/मानसिकता नसल्यामुळे 'ताकायुकी तानुका' नावाच्या जापनीस बापाने मध्यम मार्ग स्वीकारला. ट्रेकिंगला जातांना खूप दंगा करत होता म्हणून आपल्या 'यामाटो' नावाच्या खोडकर मुलाला म्हणाले, "मस्ती करायची असेल तर चालता हो गाडीतुन"!! आणि चक्क दरवाजा उघडून हाथ धरून बाहेर काढलं, बाहेर काढायच्या आधी 'नालायका, राक्षसा, भxxx, रांडेच्या' वैगरे बोल्ला कि माहित नाही पण अतिव भडकलेल्या त्या बाबाला भान राहिलं नाही कि आजूबाजूला किर्र जंगल आहे.
पंधरा-विस मिनिटाने राग शांत झाल्यावर परत आले तर ते अतरंगी पोरगं गायब!! इकडे-तिकडे शोधत हाका मारूनहि रिस्पॉन्स नाही पाहिल्यावर बापाच्या पोटात भितीचा गोळा आला कारण त्या जंगलात होती रानटी अस्वलं. पोलिसांना फोन गेले. सुरवातीच्या मिसगाईड नंतर कबूल केलं कि मिच मुलाला जंगलात एकटं सोडलं म्हणून. अख्या जपानमधे हि गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. वडिलांची हजामत झाली, माफी मागून मागून बिचारा कमरेतून पार मोडला.
२०० पोलिस, अख्खं 'होकैडो' गाव आणि तितक्याच संख्येने हौशी लोकं, सात वर्षाच्या 'यामाटो' ला शोधायला निघाले. तब्बल सहा दिवस जंगल परिसर पिंजून काढला पण पठ्या सापडेल तर शपथ.
इकडे बाबा लोकांच्या शिव्या तर आई देव पाण्यात ठेवून बसली होती. तिकडे शिंचान अंगात शिरलेला आपला नायक, तब्बल ३ नद्या पार करत जवळजवळ ३५ किलोमीटर अंतर कापत उत्तर जपान मधल्या एका मिल्ट्री कॅम्पमधे पोहोचला होता. तिथे एका अर्धवर्तुळाकार शेल्टर हाउसमधे चिंतन करत फक्त पाणी पिऊन दिवस काढत होता. शिकाबेमधल्या एका आर्मी ऑफिसरला हा पोट्ट्या सापडला आणि अख्या जपानमधे दिवाळी साजरी झाली. 'यामाटो'च्या नसलेल्या वाढदिवसाचे केक लोकांनी बापाला शिव्या देत खाल्ले. बिच्चारा बाबा!!
खूप वर्षांपूर्वी बोअरवेल मधे पडलेल्या आपल्या 'प्रिन्स' ची आठवण करून देणारी जपान मधली हि साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण झाली हे बरं झालं.
प्रतिक्रिया
हा सापडल्यानंतरचा फोटो आहे?
होय! सापडल्या नंतरचा फोटो आहे .
In reply to हा सापडल्यानंतरचा फोटो आहे? by किसन शिंदे
सापडल्यानंतरचा फोटो नसावा.
In reply to हा सापडल्यानंतरचा फोटो आहे? by किसन शिंदे
काय आगाव कार्ट आहे राव
वैतागून बाप गाडीतुन हाकलून
In reply to काय आगाव कार्ट आहे राव by कैलासवासी सोन्याबापु
च्या आयला....
ही बातमी आठवडाभर फॉलो करुन
हुश्श
मुलगा चांगला धीट आहे
बापाने मुलाला धडा
सापडला हे वाचुन बरे वाटले.
तो मुलगा मिळाल्याची बातमी
मी तर बापालाच दोष देईन.
काय टारगट पोरगं आहे!
सगळेच मूर्ख
+११
In reply to सगळेच मूर्ख by पैसा
म्हणून मौनातला नाखु
बरं झालं बाबा सापडला. मी पण
बाबा तर मूर्ख निघालाच पण,
लै अवलादी दिसतंय पोरगं!
काल आमच्या वाट्सअॅप गृपवर
हे घ्या
मग मी किनि पुढे चालतच गेल
In reply to हे घ्या by इरसाल