Skip to main content

मिपा लंडन कट्टा- ग्रिनीच

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 23/06/2016 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा लंडन कट्टा सालाबाद प्रअमाणे ठरला एकदा कट्टा करायचे ठरले की ठरले. मिपाकर अडचणींकडे क्षुल्लक महणून पहातात. कट्टा करायचे ठरले मात्र स्थळ ठरत नव्हते. वर्‍हाडी जमा झाले मात्र कार्यालयाचा पत्ता ठाउक नाही असे काहीसे सुरवातीला झाले. त्याचे काय झाले. विजुभाउ लंडन मधे आले याची आदुबाळाला कुणकुण लागली. त्याने व्यनीफीनी तुन फोनाफोनी करुन विजुभाऊना सम्पर्क केला. आणि कट्टा करायचअ घात घातला. स्वाती राजेश या अनाहिता मधील जबरदस्त सदस्यानी ती आयडिया उचलून धरली.

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 22/06/2016 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!

उडता पंजाब - एक रखरखीत वास्तव!

लेखक शान्तिप्रिय यांनी बुधवार, 22/06/2016 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिला मी काल "उडता पंजाब" चित्रपट. सतत पंजाबला चित्रपटात " खेतो का खलीहानो का " "सोनी सोनी कुडीयों का आणि आदरातिथ्यात उत्तम असणारा असे (हे खरे असो वा नसो) सादर करणाऱ्या चित्रपटसृष्टीने पंजाबच्या खेडोपाड्यातील भयाण वास्तव दाखवण्याचे केलेले धाडस स्वागतार्ह आहे. मला व्यक्तीश: वाटते की असा चित्रपट दोन तीन वर्षांपूर्वीच आला पाहिजे होता. असो "बेटर लेट देन नेव्हर". चित्रपट पंजाबचे भयाण वास्तव दाखवतो. आलिया भटला अभिनयाची उत्तम जाण आहे. पैशाच्या आणि प्रसिध्धीच्या हव्यासापायी नकळत ड्रग कडे ओढली जाणारी एक खेळाडू तिने वठवली आहे. एक नंबर अभिनय तिचाच.

वादळ

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 22/06/2016 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
वादळ आल्यावर सगळेच उघडे पडले. कागदी मुखवटे तर लागलीच उडाले. वाटले आता खरे चेहरे दिसतील. डोळ्यातील धूळ झटकल्यावर मात्र, दिसले नागडे सत्य . वादळाने मुखवट्या बरोबरच चेहरे देखील ओरबाडून नेले होते ......... समोर उभ्या होत्या अमानवी कवट्या अजूनही स्वत:ला माणूस म्हणवणाऱ्या! ........... ........... मी देखील त्यांतच होतो काय? हे कळणे शक्यच नव्हते! माणसांनी सगळे आरसे वादळाआधीच फोडून टाकले होते.... ....

बंद पडलं..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 22/06/2016 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
बंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या प्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या! गवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही डिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच "ह्ही ह्ही!" सोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत. "काय लागलं हाती? ", तर म्हणे-" बसलो असाच चरत. " येऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून. लिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून. कस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू? कैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू??? (दुत्त दुत्त!

बाप हाय मी - भाग 2

लेखक रातराणी यांनी बुधवार, 22/06/2016 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या तुमी कसं हायसा? तुमची लय आठवण यिती मला. लहानपणापासन तुमी मला कायबी कमी नाय केलं. ज्ये मागितलं त्ये दिलं. तवाचं तुमी मला शिकिवल आसत का नाय सम्द्या गोष्टी नाय मिळत, कवा कवा हराया बी लागतंय तर आज ह्यो दिसचं नसता दिसला. तुमची तरी काय चुक म्हणा. तात्या ह्या पाटलांच्या रक्तातच हाय ओ जिगर. त्ये प्रिन्सदादा बगा. कशात काय न्हाय तरी तुमच्या जिवावर उधळतय कडू. तेला म्हणाव जरा फाटक्या खिशान दोन दिस जगून तरी दाकीव. तात्या परश्या गरीब हाये पर मनान लय चांगला हाये तो. तेच्या ग्वाड मिट्ट सोभवान आमची सारखी भांडणं हूत्यात. पर तो लय खरा हाये ओ. आपल्या घरात कोण सुदीक नाय तेच्या एवढं चांगल आई सोडली तर.

दुर्गराज ते दुर्गदुर्गेश्वर मार्गे अग्याची नाळ. - एक थरारक प्रवास.

लेखक योगेश आलेकरी यांनी बुधवार, 22/06/2016 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
राजगड ते रायगड मार्गे अग्याची नाळ. - एक थरारक प्रवास. खूप दिवसापासूनची इच्छा पूर्ण होणार होती, राजगड ते रायगड हा ट्रेक पूर्णत्वास जातोय. तारीख ठरली १-२-३ ऑक्टो. प्रचंड उत्सुकता होती उत्साह शिगेला पोहोचला होता. मानसिक शारीरक तयारीही झाली होती, फक्त राजगड ते रायगड बाकी होत. ओंकार नायगांवकर या उस्मानाबाद च्या अवलियाच्या प्रयत्नातून खर तर हा योग जुळून आला होता. ३ महिने आधीच ग्रुप तयार झाला चिक्कार भरणा झाला, नियोजन झाले, राजगडच्या पायथ्याशी पाली गावात नाना धुमाळ देशमुख यांच्या घरी भेटण्याचे नक्की झाले. २३ उत्साही तरुण प्रत्यक्ष सहभागी झाले.

( एका पावसात सगळ्यानी अडकायचं )

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 22/06/2016 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी आमची जीवन वाहिनी अडकली आणि आम्ही या गाण्यात कसे अडकलो कळलंच नाही ( चाल: एका पावसात दोघांनी भिजायचं) ---------------------------------------- मध्य पश्चिम हार्बरने जायायच एका पावसात सर्वानी अडकायचं तशी दिसेना लोकल केंव्हा पासून गर्दी जाहली ठाण्याला तेंव्हापासून आता तिकीट कशाला काढायचं एका पावसात सर्वानी अडकायचं वाशी लोकल लागेल स्टेशनाला तेंव्हा शोधूया जागा शिरायला हात सोडून तसेच सावरायचं एका पावसात सर्वानी अडकायचं गाडी हळूहळू वाशीला जाईल निघून माझ्यानोकरीच ठिकाण येईल दिसून टाइम टेबल नवीन करायचं एका पावसात सगळ्यानी अडकायचं संकल्पना: अमोल केळकर ------------------------