मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वादळ

अरुण मनोहर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
वादळ आल्यावर सगळेच उघडे पडले. कागदी मुखवटे तर लागलीच उडाले. वाटले आता खरे चेहरे दिसतील. डोळ्यातील धूळ झटकल्यावर मात्र, दिसले नागडे सत्य . वादळाने मुखवट्या बरोबरच चेहरे देखील ओरबाडून नेले होते ......... समोर उभ्या होत्या अमानवी कवट्या अजूनही स्वत:ला माणूस म्हणवणाऱ्या! ........... ........... मी देखील त्यांतच होतो काय? हे कळणे शक्यच नव्हते! माणसांनी सगळे आरसे वादळाआधीच फोडून टाकले होते.... ....

वाचने 1723 वाचनखूण प्रतिक्रिया 5

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 22/06/2016 - 19:48
मस्त हो मनोहर साहेब. आवडली कविता. -दिलीप बिरुटे