Skip to main content

वणवा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 29/06/2016 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाचा संसार फुलवु नये कुणी एखाद्याच आयुष्य माती मोल करुन . . नर्सरीत सुरक्षित जीवन जगण्या-या गुलाबाला काय तमा? जंगलातल्या वणव्यात भाजणा-या रान फुलांची

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -16 अंतिम

लेखक मेघना मन्दार यांनी बुधवार, 29/06/2016 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
भाग - सोळावा (अंतिम) धन्यवाद मिपाकरांनो !! मला तुमचे सर्वांचे आभार मानायचे आहेत. ते अशासाठी की वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही लेखमाला वाचलीत आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिलात आणि माझा लिहिण्याचा उत्साह वाढवलात त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. मी हाडाची लेखिका नाही त्यामुळे माझं लिखाण थोडं घरगुती स्वरूपाचं वाटलं असेलही पण माझ्या मनात जे आल ते मे लिहिलं. माझं लिहिण्यात काही चुकलं असेल तर माफ करा. आणि हो मला सांगा की माझ्या लिखाणात मी काय दुरुस्ती करू शकते. व्यनि केलात तरी चालेल. कोणाला लंडन मध्ये फिरण्याबद्दल काही माहिती हवी असेल तर जरूर व्यनि करा.

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पुणे ते रोहतक

लेखक मोदक यांनी मंगळवार, 28/06/2016 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - तयारी सगळी तयारी झाल्यानंतरकी काही किरकोळ कामे राहिलीच होती म्हणून पहिल्या दिवशी फक्त पुणे ते ठाणे असा पल्ला मारायचे ठरले. दुपारी दोन वाजता सर्वजण रोहितच्या घरी जमलो.. पुन्हा बॅगा नीट बांधल्या.

कर…!!!

लेखक वटवट यांनी मंगळवार, 28/06/2016 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
कर…! काजळलेल्या राती.. पाजळलेली स्वप्नं.. कातरवेळी डोळ्यामधुनी.. पाझरलेली रत्नं.. मग, रत्नांच्या त्या गर्दीमध्ये.. गुरफटलेली धुंदी.. तू मी असता दुःख गं कसलं??... सारे काही आनंदी.. तू असताना दुःख सुद्धा गं रूप बदलते राणी.. वणव्याच्याही ओठी फुलती.. नाजूक फुलांची गाणी.. ऐक गं राणी, फुले सुद्धा ही नाहीत अगदी साधी… ह्याच फुलांनी बरी होते, शतजन्मांची व्याधी… शतजन्माची माझी व्याधी, बरी कराया ये ना… नक्षत्रांवर आपुली नावे, कोराया ये ना… चंद्र चंद्र मी.. रात्र रात्र तू.. होऊन होऊन जाशील… रोज सकाळी .. संध्याकाळी ...

उडता पंजाब....

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 28/06/2016 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट हा समाजमनाचा आरसा आहे वगैरे एक समज आहे, निदान भारतात तरी. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट इतकी आणि इतकीच व्याख्या असलेल्या आपल्याकडच्या अनेक दिग्दर्शकांमुळे आपल्यालाही हिच सवय लागली आहे, कि चित्रपट हे फक्त वेळ घालवण्याचं माध्यम आहे. आपला एक गोड समज झाला आहे जो समज आहे कि गैरसमज हे ज्याने त्याने ठरवावं. परंतु या सगळ्यात बर्‍याच गोष्टी दुर्लक्षीत होतात. बरेच उत्तम प्रयत्न नजरेआड जातात. अन चुकुन एखादं वास्तव जर चित्रपट माध्यमातुन समोर आलच तर ते बहुतांश वेळा नाकारलं जातं. कलाक्रुती हा या नाण्याचा दुसरा मुद्दा पण मानसिकता अजुन पक्वतेकडे पोचली नाही हे नक्की.

विरह.....2

लेखक Bhagyashri satish vasane यांनी मंगळवार, 28/06/2016 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी बसलो ती खालच्या स्वरात म्हणाली, सॅारी मी म्हटले का? ती म्हणाली,"मी तुझ्याशी त्या दिवशी फार रागात बोलले, म्हणून मी तीला म्हणालो अंग ते विसरुन जा मी ते कधीच विसरलो ती म्हणाली मी तुला सम्यंक म्हटंल तर चालेल, मी म्हटंल हो का नाही.

सुरज (हिंदी-उर्दू रचना आणि तिचा अनुवाद)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 28/06/2016 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
न जाने क्या है वहाँ जो सुरज रोज सुबह उठकर बिना थके दिन के चारो पहर की सारी सीढीया चढ के ऊपर चला जाता है --- फिर कुछ देर दुनिया की जानिब घूरता रहता है मानो कोई जंग जित ली हो --- कभी कभी लगता है अपने परछाई को हराने का जूनून सवार है उसपे --- ओ सुरज, तुम बडे कब होगे? |-मिसळलेला काव्यप्रेमी-| (२७/०६/२०१६) जानिब = दिशा ---------------------------------------------------------------------- (अनुवाद) असं काय ठेवलंय त्या तिथं, की हा सूर्य रोज म्हणजे अगदी रोज सकाळीसकाळी उठून जराही न थांबता, दिवसाच्या चारी प्रहरांचे जिने चढून हा असा जाऊन बसतो वरती. --- आणि मग थोडा वेळ बघत बसतो एकटक दुनियेच्या पसार्‍या
काव्यरस