Skip to main content

YZ (मराठी चित्रपट)

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 20/08/2016 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
YZ असे विचित्र टायटल का असा प्रश्न टायटल बघून रसिकांना पडू शकतो आणि ते योग्यही आहे कारण YZ हे दोन लेटर्स एका मराठी शिवीचा अपभ्रंश आहेत ज्याचा एक अर्थ साध्या शब्दांत होतो "बावळट". कल्पक लेखक क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांचे हि जगावेगळी हिंमत दाखवल्याबद्दल अभिनंदन आणि नंतर या टायटलचे समर्पक एक्सप्लेनेशन कथेत दिल्याबद्दल कौतुक. कधी कधी जाणवणारी एक मानसिक सणक जेंव्हा "किक" या नावाने हिंदीत येते आणि आमचेच मराठी लोक उचलून धरतात तेंव्हा आम्ही मराठी जनांनी असा प्रयत्न करायला काय हरकत आहे? असाच काहीसा विचार या जोडीने केला असेल आणि जन्माला आला YZ.

एका चिमण्याची गोष्ट

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 20/08/2016 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
(काही दिवसांपूर्वी वादळी वार्यासह झालेल्या पाऊसात एक झाड जमिनीवर उन्मळून पडलेले दिसले. सहज निरखून पहिले, एक चिमणा हि जमिनीवर पडलेला दिसला. मनात विचार आला, कसे गेले असेल त्याचे आयुष्य .... वासंतिक वार्यात एका अनामिक गंधाने बैचैन होऊन चिमण्याणे घरट्यातून उड्डाण भरली. आकाशात विहरताना त्याला त्याची चिवताई भेटली. दोघांनी एका दुसर्याकडे पहिले. चिमण्याला पाहून चिवताई गालात हसली. जणू जादूच झाली. क्षणभरातच ते जगाला विसरले. एका दुसर्याच्या पंखात पंख घालून आकाशात विहार करू लागले. आकाशात विहरताना त्यांना एक वडाचे झाड दिसले. वडाच्या झाडने हि पाने हलवीत त्यांचे स्वागत केले.

मनाचा एकांत - ब्लड

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 20/08/2016 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
'ब्लड आहे..... फास्ट सोडून नाही चालत!' मऊ शीर, तीक्ष्ण सुई लक्क काळीज, डोळ्यात पाणी थंड एसी, मंद दिवे पांढऱ्या भिंती, एकट रात्री! तासाला थेंबभर या गतीने ठि ब क ते रक्त रात्रभर.... जखडलेल्या शरीराने श्रमलेल्या डोळ्यांनी हुं कि चू न करता बघत राहतो आपण रक्ताची journey........ . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -- शिवकन्या

फक्त तू खचु नकोस...

लेखक कुणाल धस यांनी शनिवार, 20/08/2016 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
*|| फक्त तू खचू नकोस ||* एक डाव हरला तरी त्यात काय एवढं ..? कुणीतरी जिंकलंच की हे ही नसे थोड ... संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसु नकोस, आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त तू खचु नकोस... सूर्य रोजच उगवतो, त्याच नव्या तेजाने ... रोज मावळतीला जातो रोजच्याच् नेमाने ... येणे जाणे रितच् इथली, हे तू विसरु नकोस ... आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त तू खचु नकोस... प्रेम तुझ्यावर करणारे , कितीतरी लोक आहेत ... तुझ्यासाठी जोडणारे , खुप सारे हात आहेत ... अरे अशाच आपल्यांसाठी , तू ही थोड हसुन बघ ... आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त तू खचु नकोस... वाट तुझी बघत असतं, रोजच कुणीतरी ... तुझ्यासाठी जगत असतं , आस लावून प्रत्येक क्ष
काव्यरस

पाऊस

लेखक निलम बुचडे यांनी शनिवार, 20/08/2016 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
     कोपर्डी - आणखी एक 'निर्भया'... टीव्हीवरील बातमी बघून सगळं सुन्न झालं.. त्या ह्रदयद्रावक घटनेने माझ्यातल्या 'स्त्रीत्वावर' जो आघात झाला त्याचे पडसाद मनात उमटले.. त्यातूनच "ती" माझ्या मनातून लेखणीत झिरपत गेली..पण हे झालं गद्य...  हे लिहिताना माझ्यातली कवयित्री मला स्वस्थ बसू देईना...  अशा रितीने अवतरलेली ही तिची कविता...........   ----  पाऊस ---- असा वेडा हा पाऊस, करी उगाच वर्षाव.. मन गेलं हे सुकून, होतो खळखळाट फार... त्याच्या ढगांची ती शर्थ, येती दाटूनीया फार.. त्याला नव्हते माहित, येथे वारा नाही फार.. मन कुजूनी जाईल, तुझ्या अतिवृष्टीने...
काव्यरस

ओमरान दानीश

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 20/08/2016 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
dan dan फोटोत असलेला हा 5 वर्षाचा छोकरा, ओमरान दानीश बुधवारी सिरीयन आर्मी किंवा रशियन एयरफोर्स ने अलेप्पो शहरात एका इमारती वर केलेल्या हवाई हल्ल्यात हा सापडला होता. याला जेव्हा ऍम्ब्युलन्स मध्ये आणण्यात आलं तेव्हा याच्या चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता आणि अंग धुळीने भरलेले होते.

गावाकडची गोष्ट (भाग २ )

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 20/08/2016 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडची गोष्ट (भाग 1): http://www.misalpav.com/node/37022 मी बीड जिल्ह्यातल्या एका आड गावात नोकरीला होतो. मी काही फारसा शिकलेलो नाही. त्यामुळे मी कधीच मोठ्या शहराची, मोठ्या कंपनीतल्या मोठ्या पगाराची स्वप्न बघितली नाहीत. वडील लहानपणीच गेले होते. त्यामुळे आई बरोबर कष्ट करून जितकं शिकता आल तितक शिकलो आणि ती गेल्यावर गाव सोडून जिथे नोकरी मिळेल तिथे रहायचं अस ठरवून निघालो. बीडमध्ये नोकरी शोधताना मला कळल की जवळच्या एका गावात एक छोटासा लाकडाचा कारखाना आहे आणि तिथे मला नोकरी मिळू शकते.

एकटी - शतशब्दकथा

लेखक निओ यांनी शुक्रवार, 19/08/2016 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्टची लगबग. लेकीच्या हट्टासाठी ती शाळेत यायला तयार झालेली. लेकीचं देशभक्तीपर गाणं तिनं चांगलंच पाठ करून घेतलेले. पांढरा गणवेश, मामाने आणलेले पांढरे शूज घालून लेक डोईच्या शेंड्या उडवत फिरत होती. ********************** शाळेतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम शिस्तबद्धरीत्या पार पडत होता. पाहुण्यांनी तिरंगा फडकविला. हिने उजव्या हाताची सलामी दिली. तालात वाजणारा बँड. समूहाच्या धीरगंभीर आवाजातल्या ‘जन गण मन’ बरोबर तिने सूर मिसळले. मान आणि नजर वर रुबाबदारपणे फडकणाऱ्या तिरंग्यावर. पुढच्याच क्षणी तिचे डोळे डबडबले, पुढचं धूसर झाले. घशातून आवाज निघेना. अंग थरथरू लागले. . . . तोच तिरंगा!

गुलजार!

लेखक रुपी यांनी शुक्रवार, 19/08/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
महान कवी, गीतकार गुलजार यांचा १८ ऑगस्ट हा वाढदिवस! गुलजार यांच्या प्रतिभेबद्दल आणि शब्दप्रभूत्त्वाबद्दल मी काय लिहिणार? पण त्यांच्याबद्दल आधी धागा येऊन गेला की कसे याबद्दल माहिती नाही. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या गीतांबद्दल, त्यांच्या काही आठवणी प्रतिसादांमधूनही वाचायला मिळतील म्हणून हा धागा काढत आहे. खरे तर माझ्या बालपणातली बरीच वर्षे मी फक्त त्याच काळातली गाणी ऐकणे, पाठ करणे यातच रमले होते. आईबाबांना जुन्या गाण्यांची आवड असली तरी ठराविकच गाणी ऐकण्यात आली. केबल तर आमच्याकडे नव्हतीच, रेडिओही फार काही चालू नसायचा.